एकाचे दोन्ही हात नाहीत, तर दुसऱ्याचे दोन्ही डोळे नाहीत, पण दोघांचं कार्य आपल्यालाही लाजवेल!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चीनच्या येली गावात राहणारे Jia Haixia आणि Jia Wenqi हे दोन मित्र. दुर्दैवाने दोघांच्या नशिबी अपंगत्व आले. एक दोन्ही हाताने अधू तर दुसरा दृष्टीने! पण अश्या परिस्थितीतही ते करत असलेले कार्य पाहून तुमच्याही तोंडून त्यांच्यासाठी नकळत गौरवोद्गार निघतील. गेल्या १३ वर्षांपासून या दोन मित्रांनी आपले जीवन पर्यावरणाला समर्पित केले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. या दोघांनी स्वत:च्या हिंमतीवर तब्बल ३ हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण केले आहे. यामागे त्यांचा एकाच उद्देश आहे तो म्हणजे आपले गाव नैसर्गिकदृष्ट्या संतुलित राहो आणि नेहमी ताजी हवा गावात खेळती राहो.

china-marathipizza01

 

Jia Wenqi चे दोन्हीही हात नाहीत, तर Jia Haixia हा दृष्टीने अंध आहे. पण गेल्या १३ वर्षापासून दोघे एकमेकांचे हात आणि डोळे म्हणून वावरत आहेत.

दोघेही रोज हातोडी आणि लोखंडी रॉड घेऊन जंगलात जातात. Jia Wenqi पुढे चालतो आणि त्यामागे Jia Haixia त्याचे शर्ट पकडून त्याच्या मागोमाग मार्गक्रमण करतो.

china-marathipizza02

त्यांना रस्त्यात एक नदी लागते, जेव्हा या नदीजवळ दोघे येतात तेव्हा Jia Wenqi हा Jia Haixia ला आपल्या पाठीवर उचलून घेतो, जेणेकरून Jia Haixia नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ नये.

china-marathipizza03
दोघांचा एक दुसऱ्यावर गाढ विश्वास आहे. त्यामुळेच दोघ एकमेकांना उत्तमरीत्या सांभाळतात. दोघे लहानपणापासून एकत्रच वाढले, परंतु शिक्षणामुळे त्यांची ताटातूट झाली. Jia Haixia हा लहानपणी एकाच डोळ्याने अधू होता, परंतु २००० साली तो ज्या कारखान्यात काम करत होतो, तेथे घडलेल्या एक दुर्घटनेमध्ये त्याला आपला दुसरा डोळाही गमवावा लागला.

तर Jia Wenqi ला वयाच्या ३ ऱ्या वर्षीच दोन्ही हातांना मुकावे लागले. त्याने चुकून एका विजेच्या तारेला दोन्ही हातांनी स्पर्श केला आणि त्या दुर्दैवी प्रसंगात त्याचे दोन्ही हात निकामी झाले, पण हार न मानता तेव्हापासूनच त्याने हातांशिवाय काम करण्यास सुरुवात केली, आणि आज तो बहुतेक गोष्टी हातांविना सहज करतो.

china-marathipizza04
पुन्हा जेव्हा ते एकत्र आले, तेव्हा दोघांच्या आयुष्यात काही खास सुरु नव्हतं, नोकरी कोणी देत नव्हतं, शेवटी वनविभागाने त्यांना लहान सहान गोष्टींसाठी मदत होईल म्हणून कामावर ठेवले.

हळूहळू दोघांनी वृक्षारोपण शिकून घेतले, त्यांना झाडांबद्दल प्रेम वाटायला लागले, पोटच्या पोराप्रमाणे दोघे झाडांची काळजी घेतात. याच प्रेमातून त्यांनी एक उजाड जमीन भाड्याने घेतली आणि त्यावर झाडे लावण्यास सुरुवात केली.

china-marathipizza05
मुख्य म्हणजे हि झाडेच पुढे भविष्यात आपल्याला आधार देतील अशी दोघांना अशा आहे. या झाडांच्या मार्फतच आपले अर्थार्जन सुखरूप चालेल असा विश्वास दोघ व्यक्त करतात.

त्यांच्या या वृक्षारोपण उपक्रमात गावकरी देखील सढळ हस्ते मदत करतायत. दोघांनी सुरु केलेल्या या कार्याने या गावाच्या आसपासच्या प्रांतात जणू चळवळ उभी केली आहे. या दोघांनी खऱ्या अर्थाने लोकांसमोर आदर्श उभा केला आहे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?