इस्लामी अतिरेकी मानसिकता भेदकपणे दाखवणारा ओमर्टा : “त्यांना” आपली भीती कधी वाटणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक : हर्षल नाईक

===

Omerta चा अर्थ आहे (as practiced by the Mafia) a code of silence about criminal activity and a refusal to give evidence to authorities. चित्रपट आहे पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश आतंकवादी ओमर शेख बद्दल.


ओमर शेख तोच ज्याला भारत सरकारने कंदहार विमान अपहरणाच्या वेळी सोडून मोठी चूक केली होती.

 

Omerta Movie Rajkumar Rao InMarathi

 

१९९० च्या दशकात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकणारा ब्रिटिश नागरिक ओमर. याच वेळी सुरु होते युरोपमधील बॉस्नियातील अंतर्गत युद्ध ज्यामध्ये १ लाखाहून अधिक जनता मृत्युमुखी पडली होती. यात प्रामुख्याने बोस्नियन, सर्बियन, मुस्लिम, ख्रिश्चन असे सर्वच लोक होते.

लंडन मधील मुस्लिम समुदाय याविरुद्ध आंदोलन करत असतो ज्यात ओमर सामील होतो. तो यात भावनिक होऊन ओढला जातो.

यावेळी तिथला एक मुल्ला ओमरला भेटतो. हा मुल्ला ओमरच्या वडिलांना अनेक वर्षांपासून ओळखत असतो. ओमरला बोस्नियातील मुस्लिमांसाठी काहीतरी करायचे असते.


या मुल्लाच्या मदतीने ‘बोस्नियातील मुस्लिमांसाठी काहीतरी करण्यासाठी लंडनमधला ओमर येतो पाकिस्तान ला. वाह, काय जोक आहे हा?!

म्हणजे बघा – उच्चशिक्षण, डिग्री, वडिलांचे संस्कार इ. गोष्टी सहज बासनात गुंडाळून हा ओमर शून्य भविष्य, शून्य लायकी असलेल्या आणि अमेरिकेच्या भिकेवर जगणाऱ्या पाकिस्तानात येतो. कशासाठी? तर युरोपातील बोस्नियन मुस्लिमांच्या मदतीसाठी.

 

omerta-Inmarathi
Variety

बरं… तो पाक मधील कुठल्या शाळा, कॉलेज, संस्थेत नाही तर एका आतंकवादी संघटनेच्या ट्रेनिंग कॅम्प मध्ये येतो. चित्रपटात या ट्रेनिंग कॅम्प चे भयानक दृश्य दाखवले आहे.

तिथला कमांडर सांगत असतो “जिहाद केला तर तुम्हाला जन्नत मध्ये ७० हूर भेटतील”. हूर म्हणजे virgin girls. (७२ नाही हं! चित्रपटात ७० असा उल्लेख आहे).


हे दृश्य सुरु असताना कॅम्प मधील एक तरुण फ़िदायिन आतंकवादी पोरगा उंच डोंगरावरून खाली उडी मारून स्वतःचे जीवन संपवतो.

आणि हे बघणारी सर्व तरुण आतंकवादी मंडळी टाळ्या वाजवतात.

This is the extreme level of utmost brainwashing.

पाक, अफगाण मधील अशा कॅम्प्स मध्ये ट्रेनिंग घेत असताना या बेअक्कल ओमर ला मग समजते कि “त्याचे जिहादी करिअर काश्मीर मध्ये फुलू शकते”. मग त्याला बोस्नियाचा सहज विसर पडतो.

ओमरच्या मते “काश्मीर मध्ये हिंदू जनता मुस्लिमांवर क्रूर अत्याचार करीत आहे, म्हणून माझी तिथे गरज जास्त आहे”. म्हणजे या बिन्डोकला काश्मिरी पंडितांची तेथील मुस्लिमांनी केलेली कत्तल माहीत नाही का?

एवढी कत्तल होऊन, एवढे अत्याचार सहन करून आजवर एकतरी काश्मिरी पंडित आतंकवादी झालाय का?


 

kashmiri-pandit-family-in-kashmir marathipizza

 

ओमरला त्याचा म्होरक्या भारतात मिशन वर पाठवत असताना सांगतो “दिल्लीत जाऊन तुला अमेरिकन, युरोपिअन नागरिकांना किडनॅप करायचे आहे”.

ओमर विचारतो “इस्रायली (ज्यू) नको का?” मग आधी वाघासारखा भासणारा त्याचा म्होरक्या मांजर बनून म्हणतो

“नको. त्यांची मोसाद लै रानटी आहे. आपल्या सोबत आपल्या सर्व चळवळीला ते इस्रायली मोसाद वाले संपवून टाकतील. तू त्या भानगडीत नको पडू”.

आहाहा…एवढ्याश्या छोट्याश्या ज्यू देशाचा काय दरारा आहे…वाह, मस्तच.

ओमर जास्त कुप्रसिद्ध झाला तो अमेरिकन ज्यू पत्रकार डॅनिअल पर्ल याच्या अपहरण आणि हत्येमुळे.


२००१ च्या न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटर हल्ल्यानंतर अनेक मुस्लिमांना अमेरिकेने त्यांच्या ‘गौंटानामो बे’ या राक्षसी जेल मध्ये डांबवून ठेवले होते. हा जेल क्युबाच्या शेजारीच आहे. याचा प्रचंड राग ओमरला असतोच.

पत्रकार पर्ल हा मुंबईत येऊन पाकमधील काही आतंकवादी संघटनांचा अभ्यास करीत असतो. वर्ल्ड ट्रेंड सेंटर हल्ल्यासंदर्भात तो पाकमध्ये ओमर ला भेटतो. ओमर त्याला बशीर नावाने खोटी ओळख दाखवून फसवतो आणि त्याचे अपहरण करतो.

पर्ल हा एक निडर ज्यू पत्रकार असल्याने ओमर त्याची निर्घृण हत्या करतो. पर्लचे मुंडके तो चाकूने कराकरा कापतो. हा सिन बघवत नाही.

 

daniel pearl omar terrorist victim inmarathi
डॅनियल पर्ल

आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये ही बातमी झळकते. अर्थातच अमेरिकेच्या दबावामुळे पाक सरकार ओमरला जेल मध्ये टाकते आणि फाशीची शिक्षा सुनावते.


पण गम्मत ही आहे कि आज १६ वर्षे होऊनही हा ओमर अजून पाक मध्ये जिवंत आहे.

एवढेच नाही तर २६.११.२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर या ओमर ने भारत आणि पाकिस्तानच्या सरकारी कार्यालयात खोटे फोन कॉल्स करून दोन्ही देशांमध्ये तणाव खूप मोठ्या प्रमाणात वाढवला होता.

न्यूटन, बोस – डेड ऑर अलाइव्ह नंतर राजकुमार राव ने पुन्हा एकदा भन्नाट अभिनय ओमर्टा मध्ये केलाय. थंड डोक्याचा, जिहादी झॉम्बी आतंकवादी त्याने चांगला रंगवलाय.

एकंदरीत चित्रपटावरून यावरून एक लक्षात येते कि – शिक्षण, डिग्री या सर्व अंधश्रद्धा आहेत. अशा लोकांना सहज आतंकवादी बनवले जाऊ शकते. भारताला हे असले लोक कायमच सॉफ्ट टार्गेट करत आलेत.

तिकडे जगाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात कोणाचातरी नरसंहार होतो, मग यांची माथी भडकतात आणि हे भारतात येऊन दंगा करतात, हल्ले करतात. (आझाद मैदान मुंबईचा दंगा हा म्यानमार मधील कत्तलीनंतर झाला होता).


तुम्ही तिकडे जगभर काहीही करा नाहीतर मरा – इथे भारतात येऊन कशाला तुमची xxxxx…!

ज्याप्रमाणे या सर्व दहशतवाद्यांना इस्राएल आणि मोसाद ची भीती वाटते, तशीच भीती भारताबद्दल आणि रॉ बद्दल कधीतरी निर्माण होईल का?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
2 thoughts on “इस्लामी अतिरेकी मानसिकता भेदकपणे दाखवणारा ओमर्टा : “त्यांना” आपली भीती कधी वाटणार?

 • May 9, 2018 at 6:11 pm
  Permalink

  खूपच अभ्यासपूर्ण लेख पण कुठलंही सरकार अगदी आता असलेलं तथाकथीत हिंदूंच सरकार देखील या गोष्टींकडे कानाडोळा करत देवाने अवतार घेतले कुणी बघटले माहीत नाही पण नवं नवे गांधी मात्र रोजच्या रपज इथे अवतार घेत असतात

  Reply
  • September 14, 2018 at 8:26 pm
   Permalink

   होय,
   खरंच आहे,
   सोनिया गांधींच्या सरकार च्या काळातील ५ रुपयांचे वैश्नव देवीचं नाणं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोदी सरकार ने सर्वोच्च न्यायालयात त्या आदेशा विरुद्ध न जाता, ते मागे घेतले !
   तेच कॉंग्रेस ने नसते केले तर भा ज प ने टिका करुन कॉंग्रेस ला नावे ठेवली असती !

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?