२८ वर्षांपासून एका निर्जन बेटावर राहात आहेत हे वृद्ध. पण का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

तुम्ही ह्रितिक रोषण आणि अमिषा पटेलचा “कहो ना प्यार है” हा चित्रपट बघितला असेलचं. त्यात जेव्हा ह्रितिक आणि अमिषा हे एका बेटावर पोहोचतात. त्यानंतर त्यांचा इतर जगाशी संबध तुटतो आणि त्यांना त्या बेटावर कुठल्याही सुविधेशिवाय राहावं लागतं. हे तर झालं चित्रपटाचं. पण खऱ्या आयुष्यात आपण असं काही होईल किंवा आपण स्वतःहून असं काही करण्याचा विचार देखील करणार नाही. म्हणजे कोण ह्या सर्व सुख-सोयी सोडून त्या बेटावर एकटा राहायला जाईल. नाही का?

 

mauro-budelli-island-inmarathi06

 

कारण माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. तो नेहेमी समूहात राहतो. एकटे राहण्याचा आपण विचार देखील करू शकत नाही. पण एक असे वृद्ध आहेत जे मागील २८ वर्षांपासून एका बेटावर एकटे राहत आहेत. तरीदेखील ती व्यक्ती आपल्या सर्वांच्या तुलनेत जास्त आनंदी आहे.

एखाद्या बेटावर एकट राहणे म्हणजे ना मोबाईल, ना टीव्ही, संचाराचे कुठलेही साधन नाही, करमणुकीचे साधन नाही, नीट खायला नाही, जवळपास माणसे नाहीत. कदाचित कुणीही असं राहणे पसंत करणार नाही.

 

mauro-budelli-island-inmarathi

 

पण Mauro Morandi नावाच्या एका व्यक्तीने हे करून दाखवलं आहे. हे वृद्ध १९८९ पासून Budelli ह्या बेटावर एकटे राहत आहेत. आणि ते अतिशय सुंदर जीवन जगत आहेत. Mauro ह्यांनी आताच्या आधुनिक जीवनशैलीपासून निराश होऊन ह्यापासून दूर Rosy-Sandy Beach ज्याला La Spiaggia Rosa देखील म्हणतात, तेथे वास्तव्यास राहण्याचा निर्णय घेतला.


 

mauro-budelli-island-inmarathi05

 

आता Mauro ह्यांच्या प्रत्येक दिवसाची सुरवात ही नैसर्गिक सुंदर देखाव्यांपासून होते. त्यांना रोज निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळते. समुद्राच्या लाटा, सूर्याचं कोवळं उन्ह, सर्वत्र हिरवळ, वाहणारा थंड वारा. जे आपण आपल्या सुट्ट्यांसाठी प्लॅन करतो. म्हणजे काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहायसाठी, जे अनुभावायसाठी जिथे आपल्याला व्हॅकेशन प्लॅन करावं लागतं, ते अनुभव Mauro हे रोज घेतात.

 

mauro-budelli-island-inmarathi09

 

एवढ्या वर्षांपासून Mauro हे आपलं हे जीवन अगदी गूढपणे जगत होते. पण मागील काही वर्षांआधी त्यांनी त्यांचे हे अनुभव सोशल मिडीयावर शेअर करण्याचा निर्णय घेतला.

 

mauro-budelli-island-inmarathi07

 

Mauro ह्यांची एक प्रेयसी देखील होती. जी वर्षातून १५ दिवस त्यांच्याकडे येऊन राहायची. पण नुकतच त्यांनी त्यांच्या प्रेयसीशीदेखील आपलं नातं तोडलं.

 

mauro-budelli-island-inmarathi04

 

येथे राहून त्यांनी आजवर ह्या बेटावरील १,३०० पर्यटक जागांचा फेरफटका मारला आहे. Mauro ह्यांच्या दोन मुली आहेत ज्यांना भेटण्यासाठी ते कधी-कधी Modena येथे जातात.

 

mauro-budelli-island-inmarathi03

 

ह्याबाबत डेली मेलशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,

“जर कधी मला ईथून जावे लागले तर कदाचित मी Sardinia येथे जाईल, आणि तिथल्या समुद्र किनारी राहायला मला आवडेल. पण मी आता पुन्हा शहरांकडे परतणार नाही.”

 

mauro-budelli-island-inmarathi08

 

तर रिपोर्टनुसार,२०१६ मध्ये सरकारने हे बेट हस्तगत करून त्याला La Maddalena National Park मध्ये समाविष्ट केले.

 

mauro-budelli-island-inmarathi01

 

आपण नेहेमी एक समाधानी, सुखी जीवन जगण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो. दिवसरात्र धावाधाव करत असतो. पण तरी आपण किती समाधानी जीवन जगतो ? आपण आधुनिकीकरणाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत की निसर्ग काय असतो, तो किती सुंदर असू शकतो आपण हेच विसरलो आहोत. पण Mauro ह्यांना कदाचित हे खुप चांगल्याने गवसले असावे…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *