‘ओके जानू’ येतोय! ट्रेलर तर छान वाटतंय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गेले अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या ‘ओके जानू’ चं ट्रेलर आज रिलीज झालं. इतकी उत्कंठा वाटण्याचं कारण हे की ‘ओके जानू’ हा प्रख्यात दिग्दर्शक मणीरत्नम ह्यांच्या ‘ओके कन्मनी’ ह्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शाद अली हिंदी रिमेक चं दिग्दर्शन करणार आहेत. मणीरत्नम आणि करण जोहर निर्माते आहेत.

आजच्या तरुण पिढीची No strings attached लाईफस्टईल, लिव्ह इन रिलेशनशिप, त्यातले वेगवेगळे इश्युज आणि ह्या सगळ्यातून फुलत जाणारी आदी आणि ताराची कहाणी असा इंटरेस्टिंग विषय ‘ओके जानू’ घेऊन येत आहे. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर ही तरुणाईची आवडती जोडी ‘ओके जानू’ च्या निमित्ताने पुन्हा आपल्याला एकत्र दिसणार आहेत.

ok-jaanu-marathipizza

चित्रपटाचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे ए आर रहमानचं संगीत…!

तमिळ अल्बम ‘ओके कन्मनी’ आधीच सुपरहिट झालाय आणि ‘ओके जानू’ कडून सुद्धा तशी अपेक्षा करायला हरकत नसावी.

‘ओके कन्मनी’ रिलीज होऊन वर्षंभरापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरी ‘कारा अटकारा’ , ‘ए सिनामिका’ , ‘मेंटल मनाधील’ सारखी गाणी अजूनही लोकप्रिय आहेत.

ok-jaanu-poster-marathipizza

आणि हो, मागल्या वेळी हे तिघे (मणीरत्नम, रहमान आणि शाद अली) एकत्र आले होते तेव्हा सुद्धा आपल्याला एक मस्त चित्रपट बघायला मिळाला होता. आठवतंय?
(नसेल आठवत तर आम्ही सांगतो , उत्तरं आहे साथीया, मूळ तमिळ ‘अलाईपयुथे’चा हिंदी रिमेक)
‘ओके जानू’ चं ट्रेलर बघायला इथे क्लिक करा.

 

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?