जगाच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी अणू हल्ले आणि दुर्घटना

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जगामध्ये आतापर्यंत दोन महायुद्ध होऊन गेले, या दोन्ही महायुद्धांमध्ये खूप वित्तहानी आणि जीवितहानी झाली. या युद्धांमुळे खूप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यातच यामध्ये काही अणुहल्ले देखील काही देशांवर करण्यात आले, त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या देशांमध्ये दिसतात. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने केलेला अणुहल्ला हा देखील त्यातलाच एक भाग आहे. आज आम्ही तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये झालेल्या काही विनाशकारी अणु दुर्घटनांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या विनाशकारी अणु दुर्घटनांबद्दल..

१. हिरोशिमावरील अणु बॉम्ब हल्ला

 

Devastating-nuclear-disasters.Inmarathi.
wordpress.com

नाझी जर्मनीच्या शरणागतीनंतर, मित्र राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरीकेला निराश केले होते. त्यामुळे अमेरिकेने युनायटेड किंग्डमच्या संमतीने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन विभक्त शहरांवर अणु हल्ला करण्याचा निर्णय घेतला. ६ ऑगस्ट, १९४५ रोजी युरेनियम गनसारख्या प्रकारचे लिटील – बॉय नाव देण्यात आलेला बॉम हिरोशिमा टाकण्यात आला. जवळपास ९०००० ते १४६००० माणसे हिरोशिमामध्ये या हल्ल्यामुळे पहिल्या दोन ते चार महिन्यामध्ये मारली गेली. यातील बहुतेक लोक बर्न्सवर प्रभाव पडल्याने, विकिरण आजारामुळे आणि इतर जखमांमुळे मारले गेले. मरण पावलेल्या लोकांमधील बहुतेक लोक येथील रहिवाशी होते.

२. नागासाकी येथील शोकांतिका

 

Devastating nuclear disasters.Inmarathi1
signature-reads.com

जेव्हा हिरोशिमावर झालेल्या अणु बॉम्ब हल्ल्यानंतर देखील जपान शरण येण्यास तयार नव्हते, तेव्हा हिरोशिमा अणु हल्ल्याच्या तीन दिवसानंतर ९ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर प्लुटोनियम इम्प्लोजन प्रकारातील बॉम्ब टाकला. ज्याला फॅट मॅन नाव देण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये जवळपास ३९००० ते ८०००० लोकांचा बळी गेला होता. हिरोशिमा आणि नागासाकी या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या लोकांना हिबकुषा म्हणण्यात आले. हिबकुषा म्हणजे विस्फोटामध्ये प्रभावित झालेले लोक. ३१ मार्च २०१६ पर्यंत जपानमधील १७४०८० लोकांसहित सुमारे ६५०००० लोकांना हिबकुषा म्हणून ओळखले गेले. यापैकी १ टक्के लोकांमध्ये विकिरणांमुळे होणाऱ्या आजाराचे निदान झाले आहे.

३. थ्री मैल आयलंड अपघात

 

Devastating nuclear disasters.Inmarathi2
.wordpress.com

या अपघाताचे परिणाम काही मोठ्या प्रमाणावर झाले नाहीत. हा एक केवळ किरकोळ रेडिओएक्टिव्ह लिकेज होता. तरीही तीन मैल आयलंडमधील आंशिक मंदीमुळे अमेरीकेच्या इतिहासामधील ही सर्वात गंभीर अणु दुर्घटना समजली जाते. पण या दुर्घटनेमुळे अशा दुर्घटना परत होऊ नयेत आणि त्याचा सामान्य जनतेवर परिणाम होऊ नये, म्हणून सुरक्षाविषयक काही उपाययोजना न्युक्लियर इंडस्ट्रीने केल्या.

४. द चेर्नोबिल डिझास्टर

 

Devastating nuclear disasters.Inmarathi3
pinimg.com

चेर्नोबिल दुर्घटना ही २६ एप्रिल १९८६ रोजी युक्रेनियन शहर Pripyat येथे सुरु झालेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी झाली. या दुर्घटनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गी कण पश्चिम सेव्हिएत आणि युरोपच्या भागांमध्ये पसरले. ही दुर्घटना पूर्णपणे प्रशिक्षित नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात आलेल्या दोषपूर्ण अणुभट्टीमुळे झालेला होता. दुर्घटनेच्या रात्री दोन प्लांट कामगारांचा मृत्यू झाला, तर तीव्र विषारी विकिरणांमुळे पुढील काही आठवड्यांमध्ये अजून २८ जणांचा मृत्यू झाला. यातील जीवितहानी आणि वित्तहानीमुळे ही दुर्घटना इतिसातील सर्वात वाईट अणु अपघात मानला जातो.

५. द विंडस्केल फायर

 

Devastating nuclear disasters.Inmarathi4
kxcdn.com

द विंडस्केल फायर हा १९५७ चा अणू अपघात आहे, जो इंग्लंडच्या वायव्येच्या किनारपट्टीवर असलेल्या विंडस्केल आण्विक रिऍक्टर फॅसीलिटी आणि प्लुटोनियम प्रोडक्शन प्लांट येथे झाला होता. याला ग्रेट ब्रिटेनमधील सर्वात गंभीर अपघात म्हणून ओळखले जाते. हा अपघात ८ ऑक्टोबर रोजी घडला होता. जेव्हा मुख्य रिऍक्टरच्या ग्रेफाईट कंट्रोल ब्लॉगचा नियमित उष्णता ही आवाक्याच्या बाहेर गेली, तेव्हा त्याच्या बाजूच्या युरेनियम काडतुसांनी पेट घेतला. या अपघातामध्ये लागलेली आग तीन दिवस तशीचं होती. ब्रिटन आणि युरोप याच्या काही भागांना या दुषित आण्विक रेडीएशनचा फटका बसला. या आपत्तीमध्ये जवळपास २०० माणसे मृत्युमुखी पडले.

अशा या आणि इतर काही इतिहासातील दुर्घटना खूपच विनाशकारी आणि लोकांना धडकी भरवणाऱ्या होत्या. या दुर्घटनांमुळे काही देशांना खूप मोठी किंमत मोजावी लागली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?