व्हायग्राचा हा असा वापर होऊ शकतो असं ह्याच्या निर्मात्यालासुद्धा कधी वाटलं नसेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

‘वायग्रा’ हे एक वेगळ्या प्रकारचे टॉनिक, अथवा औषध म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. चार चौघात उघडपणे वायग्रा हा शब्द सहजपणे कोणी उच्चारत नाही. थोडक्यात फक्त घरात बेडरूमच्या आतमध्ये त्याच्याबद्दल उच्चार केला जातो.

 

viagra-inmarathi
aboluowang.com

अजून तरी घरात आणि घरातल्या इतर सदस्यांसामोर हा शब्द कोणी मोठ्याने बोलत नाही. कारण ह्या गोळ्यांबद्दल माहिती असली तरी घरात चर्चा होत नाही. बाहेर मित्रांमध्ये ह्याबाबत बरीच चर्चा आजकाल इंटरनेट मुळे व्हायला लागली आहे.


आज बऱ्याच गोष्टींवर, औषधांवर संशोधन चालू आहे आणि हे सतत चालूच असते.

वायग्राचा शोध सुद्धा शास्त्रज्ञांनीच लावला असणार. अशा संशोधन झालेल्या रोजच्या जीवनात उपयोगी असणाऱ्या गोष्टींचा वापर लोक डोळे झाकून करायला सुरुवात करतात.

असेच पाश्चात्य देशात अनेक वर्षांपूर्वी ह्या वायग्राचे संशोधन झाले. पण हा जरा वेगळा संशोधनाचा विषय होता म्हणून आपल्याकडे त्याचे फार कौतुक झाले नव्हते. कारण आपल्याकडेही फार पुरातन काळापासून लैंगिक समाधान करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे प्रचलित होती.

 

india.com

पण त्याचा वापर सर्वसामान्य करत नव्हते तर, अनेक पत्नी असलेल्या भोग विलासी राजे राजवाड्यांचा तो दवा होता. सर्वसामान्यांना न परवडणारा असा तो दवा होता. त्यामुळे त्याचा कोणी वापर करू शकत नव्हते.


आताही वायग्राच्या गोळ्या आपल्याकडे प्रचलित आहेत. पण सर्वसामान्य ह्याचा वापर करत नाहीत. तर उच्चभ्रू लोक ह्याचा वापर करतात.

 संशोधकांनी वायग्राबद्दल नवीन शोध लावून त्याचा वेगळा उपयोग जाहीर केलाय.

न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत अंधत्वावर वायग्राचा उपचार म्हणून उपयोग होतो हे सिद्ध केले गेले आहे. हे त्यांच्या जर्नल ऑफ ऑपथालमोलॉजिस्ट्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

 

viagra-cure-blindness-inmarathi
thesun.co.uk

तसेच रॉयल कॉलेज ऑफ ऑपथलमोलॉजिका च्या मुख्य सोभा सिवप्रसाद यांनीही ह्या संशोधनावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ह्याचा आणखी प्रसार व्हावा आणि अंधत्वावर मात करण्यासाठी प्रयत्न व्हावा असे त्यांचे मत आहे.


“एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन” (AMD) म्हणजे डोळ्यांच्या रोगांचे प्रकार. ह्यात डोळ्यांचे दिसणे कमी कमी होत जाते किंवा पूर्ण अंधत्व किंवा डोळ्याच्या बुबुळाच्या मागील भागात एक पडदा तयार होऊन डोळ्यांना दिसेनासे होणे.

काही विकारांत डोळ्यांना जोडणाऱ्या अतिशय सूक्ष्म रक्तवाहिन्या लो ब्लड प्रेशरमुळे शिथिल होत जातात आणि रक्त पुरवठा कमी कमी होत जातो आणि अंधत्व येते.


हे वायग्रा नेमकं काय काम करतो हे जर जाणून घेतलं तर कळेल की त्याचा डोळ्यांना काय उपयोग होऊ शकतो.

वायग्रामुळे शिथिल झालेल्या सूक्ष्म नसा किंवा स्पंज सारख्या बारीक जाळीदार भागाला रक्त पुरवठा केला जातो आणि पुरुष थोडा जास्त वेळ समागम करू शकतो.

हाच वायग्राचा परिणाम डोळ्याच्या नसांनासुद्धा रक्त पुरवठा करतो. त्यामुळे शिथिल पडलेल्या नसा ताठरतात आणि चांगला रक्त पुरवठा होऊ लागतो. डोळ्याचेही कार्य व्यवस्थित व्हायला लागते आणि डोळ्यांना चांगले दिसायला लागते.

 

Viagra-can-cure-blindness-inmarathi
latestly.com

ज्यावेळी वायग्राचा गोळ्यांचे सेवन करायचे असते त्यावेळी पुरुषांनी डॉक्टरकडे तपासणी करून नंतरच ह्या वायग्राचे सेवन करणे योग्य ठरते. कारण काहींना त्या गोळ्यामुळे शारीरिक त्रास होतो तर काहींना त्याने काहीच त्रास होत नाही.


ज्यांना त्या गोळ्यांनी काहीच त्रास होत नाही त्यांनी ह्या गोळ्या सेवन केल्यावर फायदा होतो. जर डोळ्यांचे विकार असतील तर त्यावरही याचा चांगला उपयोग होतो.

पण ह्या गोळ्या कधी आणि किती घ्यायच्या असतात हे डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेणे जरुरीचे असते नाहीतर उलटा परिणाम होऊ शकतो. काही लोक स्वतः च्या मनाप्रमाणे वायग्राचे सेवन करतात त्यांना त्रास होण्याची भीती असते.

असा हा वायग्रा दृष्टीहीनांना दृष्टी देणारा एक चमत्कारच ठरणार आहे!

त्यामुळे इंग्लड, अमेरिकेत गेल्या मार्च महिन्यापासूनच सगळ्या दुकानांमध्ये वायग्राची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू केली गेली आहे.

 

viagra-pills-inmarathi
world-pharm.com

वायग्राची ओळख आता अंधांना दृष्टी देणारा ‘वायग्रा’ अशी होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “व्हायग्राचा हा असा वापर होऊ शकतो असं ह्याच्या निर्मात्यालासुद्धा कधी वाटलं नसेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?