नास्त्रेदमसच्या ह्या भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या, आता “ट्रम्प” भाकिताची वेळ आलीये!

===

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भविष्यवाणी म्हणजे काय तर एखादी गोष्ट होण्यापूर्वीच त्याचं भाकीत सांगणं.

InMarathi Android App

देवाधीकांच्या कथांमध्ये अश्या भविष्यवाण्या आपण अनेकवेळा ऐकल्याच आहेत. उदा. कृष्ण कंसाचा वध करणार ही भविष्यवाणी! अश्या या भविष्यवाण्यांबद्दल एक गोष्ट म्हणजे भविष्यवाणी बद्दल जे सांगितलंय ते होणारच.

आपण आता ज्या युगात वावरतो आहे त्या युगामध्ये भविष्यवाणीसारख्या तर्कहीन गोष्टींवर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. पण आज आम्ही तुम्हाला अश्या एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो पाश्चात्य देशांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. फारच कमी भारतीयांना त्याबद्दल ठावूक आहे.

या मनुष्याने देखील अनेक भविष्यवाण्या करून ठेवल्या होता आणि मुख्य म्हणजे त्यापैकी अनेक तंतोतन खऱ्या ठरल्या.

===
===

त्या व्यक्तीचे नाव म्हणजे – फ्रांसचा महान भविष्यवेत्ता नास्त्रेदमस!

 

nostradamus-marathipizza01
topcount.co

एखाद्याच्या अंगात अलौकिक शक्ती असल्याशिवाय त्याला भविष्यात काय घडणार आहे ते कळूच शकत नाही असे मत अनेकांनी नास्त्रेदमसबद्दल मांडले आहे. त्यामुळेच त्याच्याबद्दल अनेक अफवा देखील प्रचलित आहेत.

पण त्याच्याजवळ असा कोणता फॉर्म्युला होता ज्याचा वापर करून त्याने भविष्यातील घटना आधीच लिहून ठेवल्या होता हे मात्र एकालाही न उलगडलेलं कोडं आहे. १५ व्या शतकात या मनुष्याने जेवढ्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्यापैकी तब्बल १० भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या हे विशेष!

१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रान्सच्या लहानग्या सेंट रेमी गावात नास्त्रेदमसचा जन्म झाला. लहानपणापासूनच नास्त्रेदमसला भविष्यवाणी करण्याची सवय होती असे ऐकिवात आहे. पण त्याला ज्या घटनेमुळे भविष्यकार म्हणून ओळख मिळाली ती अशी-

इटलीच्या रस्त्यावर भटकत असताना एका तरूणाला पाहून नास्त्रेदमसने त्याला मुजरा केला. नास्त्रेदमसच्या मित्राने त्याला विचारले हा काय प्रकार आहे. तेव्हा नास्त्रेदमस म्हणाला हा भविष्यात ‘पोप’ होणार आहे. काही वर्षांतच १५८५ मध्ये ती व्यक्ती पोप म्हणून विराजमान झाली.

तापमानवाढ, भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासह हिमवृष्टीचेही भाकीत नास्त्रेदमसने ‘द प्रोफेसीज’ या आपल्या जगप्रसिद्ध ग्रंथात नोंदवून ठेवले होते. १५५० मध्ये नास्त्रेदमसने स्वत:चे पंचाग काढायला सुरूवात केली.

यामध्ये ग्रहांची स्थिती, हवामान आणि पिक पद्धतीवर अंदाज वर्तवण्यास त्याने सुरुवात केली. त्यापैकी बहुतांश अंदाज खरे ठरतं. त्यामुळे नास्त्रेदमसबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण होऊ लागला. मुख्य गोष्ट म्हणजे स्वत:च्या मृत्यूबाबत केलेलीही त्याची भविष्यवाणी खरी ठरली.

नास्त्रेदमसची भविष्यवाणी त्याने रचलेल्या कविता आणि सांकेतिक भाषेत असतं.

 

The princes and lords are held captive in prisons
In the future by such headless idiots
These will be taken as divine utterances.

Before the war comes,
The great wall will fall,
The King will be executed, his death coming too soon will be lamented.
(The guards) will swim in blood,
Near the River Seine the soil will be bloodied.

 

nostradamus-marathipizza02
theimaginativeconservative.org

या कवितेमध्ये नास्त्रेदमसने केलेलं फ्रेंच राज्यक्रांतीचे तंतोतंत भाकीत आढळून येते.

१७८९-९९ मध्ये यूरोपच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना म्‍हणून फ्रेंच राज्यक्रांती ओळखले जाते. सरंजामशाहीला कंटाळून फ्रेंचमधील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली आणि तिने सत्ता परिर्वतन केल्यामुळे या क्रांतीला फ्रेंच क्रांती म्हणून ओळखले जाऊ लागले.

 

To swim in praise,
the great one to flee to the confluence.
He will refuse entry to the Piuses,
The depraved ones and the Durance will keep them imprisoned.

 

nostradamus-marathipizza03
lookandlearn.com

फ्रान्सच्या इतिहासातील आणखी एक मोठी घटना म्हणजे नेपोलियनचा बंदिवास होय. नास्त्रेदमस याने या कवितेमध्ये नेपोलियनला बंदी बनवले जाईल अशी भविष्यवाणी केली आहे. जी पुढे खरी ठरली.

 

A young child will be born of poor people,
He who by his tongue will seduce a great troop;
His fame will increase towards the realm of the East.
Beasts ferocious from hunger will swim across rivers:
The greater one will cause it to be dragged in an iron cage
When the Germany child will observe nothing.

 

nostradamus-marathipizza04
jewishvirtuallibrary.org

ही कविता नास्त्रेदमसने जणू खास हिटलरला डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती का असा प्रश्न पडावा,  इतकी यामध्ये सत्यता आहे आणि पुढे जर्मनीच्या राजकारणात काय घडले हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

 

The blood of the just will commit a fault at London,
burnt through lighting of twenty threes the six:
The ancient lady will fall from her high place,
several of the same sect will be killed.

 

nostradamus-marathipizza05
telegraph.co.uk

ही कविता नास्त्रेदमस यांनी लिहिलेली आहे. या कवितेची प्रचिती २ डिसेंबर १९६६ मध्ये थॉमस फॅरिनरच्या बेकरीला आग लागल्यानंतर आली. या आगीमुळे ८०००० हजार लोक बेघर झाले होते.

 

There will be two scourges the like of which was never seen,
famine within plague, people put out by steel,
crying to the great immortal God for relief.

 

nostradamus-marathipizza06
kickassfacts.com

जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर झालेला अणुबॉम्ब हल्ला याचा उल्लेख देखील नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीत आढळतो.

 

An evil deed foretold by the bearer of a petition.
Another falls at night time.
Conflict at Reins, London and a pestilence in Tuscany.

 

nostradamus-marathipizza07
pinterest.com

अमेरिकेचे ३५ वे राष्‍ट्रपती जॉन एफ कॅनेडी आणि त्यांच्या भावाच्या मृत्यूचे भाकीत जे नास्त्रेदमसने या कवितेद्वारे सांगितले होते, तेही खरे ठरले. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली होती.

 

Will cause trembling around the new city:
Two great rocks will make war for a long time.
Then Arethusa will redden a new river.
“In the year 1999, in the seventh month,
from the sky will come the great King of Terror,
bringing back to life the great King of the Mongols.
Before and after, Mars to reign by good fortune.

 

nostradamus-marathipizza08
world-visits.com

या कवितेमधून नास्त्रेदमसने जणू जागतिक इतिहासातील अमेरिकेवरील सर्वात मोठ्या वर्ल्ड ट्रेंड सेंटवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याची चेतावणी होती असे म्हटले तर वावगे ठरू नये.

 

Will take Diana [Thursday] for his day and rest:
He will wander because of a frantic head,
And delivering a great people from subjection.

 

===
===
nostradamus-marathipizza09
criminal.mn

नास्त्रेदमसने वर्तवलेले हे भाकीत १९९७ मध्ये राजकुमारी डायनाच्या कार अपघाताशी मिळतेजुळते ठरले.

एवढेच नाही तर १९३९-१९४५ या काळात जगाला हादरवून सोडणा-या दुस-या महायुद्धाची भविष्यवाणी नास्त्रेदमसने आधीच करून ठेवली होती, असे सांगितले जाते. या युद्धात पाच ते सात कोटी लोक मारले गेले होते.

 

The false trumpet concealing madness
will cause Byzantium to change its laws.
From Egypt there will go forth a man who wants
the edict withdrawn, changing money and standards.

The false trumpet concealing madness
will cause Byzantium to change its laws.
From Egypt there will go forth a man who wants
the edict withdrawn, changing money and standards.

The republic of the great city
Will not want to consent to the great severity:
King summoned by trumpet to go out,
The ladder at the wall, the city will repent.

The republic of the great city
Will not want to consent to the great severity:
King summoned by trumpet to go out,
The ladder at the wall, the city will repent.

 

nostradamus-marathipizza00

 

नास्त्रेदमसची सदर कविता म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीची भविष्यवाणी असल्याचे सांगण्यात येत आहे. या कवितेमध्ये नास्त्रेदमस असं भाकीत करतोय की ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेमध्ये खूप उलथापालथ होणार असून त्याचे जगावर देखील परिणाम होणार आहेत.

अश्या या नास्त्रेदमसच्या भविष्यवाण्या ज्यांनी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून सोडले आहे. आता ही “ट्रम्प” भविष्यवाणी कितपत खरी ठरते ते येणारा काळच सांगेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “नास्त्रेदमसच्या ह्या भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या, आता “ट्रम्प” भाकिताची वेळ आलीये!

  • July 2, 2017 at 4:57 pm
    Permalink

    modinbaddal pn kahitari lihl hot na

    Reply
  • May 10, 2018 at 12:30 pm
    Permalink

    Nostrdemus ne ek bhavishya kele hote.
    Ki sampurn jag eka chatrakhali yeil aani tyanche netrutva Bharat Karel.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *