आश्चर्य! पृथ्वीवरच्या या १० ठिकाणी कधीच पाऊस पडत नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे आपल्या भारतातील पावसाळा ऋतूचे चार महिने आहेत. एप्रिल मे मध्ये वळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जूनमध्ये पावसाला सुरुवात होते.

InMarathi Android App

अलीकडील काही वर्षांत जून महिनासुद्धा पाऊस पडत नाही, मग आपली चर्चा सुरू होते,

‘‘अरे देवा, जूनमध्येसुद्धा किती गरम होतंय. जून निम्मा संपत आला तरी पावसाचा थेंब नाही.’’

मग आठवण होते, ‘झाडं लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे.’’ मग जूनच्या शेवटी वगैरे रीतसर पावसाला सुरुवात झाली की, आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेले संकल्प विसरून आपल्या कामाला जातो.

पाऊस पडला नाही की, आपण अगदी हवालदिल होतो, पण तुम्हाला आश्‍चर्य वाटेल की जगात अशी दहा ठिकाणं आहेत की जिथे अजिबात पाऊस पडत नाही.

 

www.ready.gov/drought

पावसाशिवाय तिथलं वातावरण कसं असेल आणि त्याचा तेथील लोकांना किती त्रास होत असेल याचा विचार करूनच भयंकर वाटतं. पाहुया ही कोणती ठिकाणं आहेत?

पृथ्वीवर अनेक कोरडी, निर्जन ठिकाणे आहेत, त्यांना आपण वाळवंट म्हणतो. पण सगळीच वाळवंट काही एकसारखी नाहीत. प्रत्येक वाळवंटात काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे. या भागात अगदी कमी किंवा अजिबात पाऊस पडत नाही.

१. असवान, इजिप्त

 

www.inc.com

इजिप्तच्या दक्षिणेला आसवान हे असे स्थान आहे की जिथे फार कमी पाऊस पडतो. या क्षेत्रा इतका कमी पाऊस पडतो की, इथली लोकं छप्पर नसलेल्या घरात राहतात. ते चांदण्यांच्या प्रकाशात झोपण्याचा आनंद नेहमीच घेऊ शकतात.

आसवान धरण, नील नदी आणि त्या परिसरात अनेक तलाव असलेतरी आसवानची सरासरी सापेक्ष आर्द्रता ३१ टक्क्यांपर्यंत कमी आहे.

दरवर्षी इथे केवळ १ मि. मि. पावसाचा अनुभव येतो बाकीचे महिने कोरडेच जातात. इथे अतिशय उकाडा असतो. २२ मे १९७३ हा तिथला सर्वांत जास्त गरमीचा दिवस म्हणून नोंदवला गेला.

तेव्हा तिथे ५१ डिग्री सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं होतं. थोडक्यात इथे एकच ऋतू उन्हाळा आणि कडक उन्हाळा.

२. अटाकामा वाळवंट, चिली

 

edition.cnn.com

चिलीमधील अटाकामा वाळवंट हा जगातील सर्वांत जास्त कोरडा प्रदेश आहे. समुद्रपातळीपेक्षा ४ किलोमीटर म्हणजे जवळजवळ १३,००० फूट उंच असा हा पृथ्वीवरील सर्वांत जास्त उंचीचा वाळवंट आहे.

या त्याच्या वैशिष्ट्यांमुळे दक्षिण युरोपमधील खगोलशास्त्रज्ञांच्या संघटनांमध्ये या वाळवंटाबद्दल रुची वाढली आहे.

या अटाकामा वाळवंटात आर्द्रता कमी असल्याने खगोलशास्त्रज्ञांना दुर्बिणीतून आकाशाकडे पाहण्यासाठी सोपे होते कारण येथे ऑप्टिकल उपकरणांमध्ये बिघाड होण्याचं प्रमाण कमी होते.

दुसर्‍या शब्दांत सांगायचं झालं पातळ वातावरणामुळे तारे कमी चमकतात ज्याचा खगोल शास्त्रज्ञांना अभ्यास करण्यासाठी चांगला उपयोग होतो.

अटाकामा वाळवंट इतका इतका शुष्क आणि निर्जंतुकीकरण आहे की, नासा त्यांच्या आंतरखंडीय रोव्हर्सच्या चाचणीसाठी या क्षेत्राचा वापर करतो कारण ही पृथ्वीवरील मंगलच्या पृष्ठभागासारखीच सर्वांत मोठी जागा आहे.

तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे दरवर्षी सरासरी फक्त १ मिमि पेक्षा कमी पाऊस नोंदवला जातो, तरी त्या प्रदेशात अटाकामा वाळवंटाने शंभर वर्षांत फकत दोन ते चार वेळा पावसाचा अनुभव घेतला तर काही भागात ५०० वर्षांत एकही पाण्याचा थेंबही ही लोकं अनुभवत नाहीत.

३. मॅकमुर्दा ड्राय व्हॅलीज,

 

nsf.gov/new

अंटार्कटिका मधील मुक्मुर्डा हा जगातील एक नंबरचा वाळवंट समजला जातो. वाळवंट म्हणून आपण जे ओळखतो त्यापेक्षा हे वाळवंट वेगळं आहे. इथे गोठलेला महासागर आणि कोरड्या व्हॅली आपल्याला आढळतात.

या परिसरात दरवर्षी ६ मि. मि. पेक्षा कमी पाऊस पडतो. ज्यामुळे आसपासच्या घाटातून होणारा हिमवर्षाव कमी होतो. इथे आपल्याला सील, पेंग्विन, हिमव्हॅली आणि हिमनद्या दिसतील.

मॅकमुर्दो आणि आसपासचा भाग किती सुखा आहे हे स्पष्टपणे समजण्यासाठी शास्त्रज्ञांनी बेरीलियम-१० ची उपस्थिती शोधत आहे, जो वातावरणात उच्च रेडिओएक्टिव आयसोटोप आहे आणि पावसाद्वारे जमिनीवर देतो.

कार्बन डेटींग प्रक्रियेसारख्या, त्याच्या अनुमानित क्षय दराने ऐतिहासिक पाऊस मोजण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. या आइसोटोपला क्षेत्राच्या खाली किंवा पृष्ठभागावर ६० सेटींमीटर पाऊस आढळून आला नाही.

शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, या विशिष्ट प्रदेशात १४ दशलक्ष वर्षांपर्यंत पृष्ठभागावर पाणी नसल्याचे आढळून आले आहे. इथे तुम्ही छत्री न घेता जाऊ शकता, पण स्कार्फ आणि गरम कपडे अत्यावश्यक आहेत.

४. मोजावे वाळवंट, कॅलिफोर्निया

 

en.wikipedia.org

कॅलिफोर्नियातील वाळवंट प्रदेश रेझन क्षेत्राच्या पश्‍चिमेकडील पर्वत रांगेच्या पावसामुळे कमी पावसाचा प्रदेश म्हणून दर्शविला जातो. मोझवे वाळवंटला दरवर्षी सुमारे ३ ते १० इंच (७६ ते २५४ मिमि) पाऊस होतो.

कोलाराडो वाळवंटात २ ते ६ इंच (५१ ते १५२ मिमि) पाऊस होतो. कॅलिफोर्नियातील सर्वांत वाईट स्थळ आहे डेथ व्हॅली जिथे दरवर्षी फक्त १.५ इंच (३८ मिमि) पाऊस होतो. त्यामुळे तिकडे दुष्काळ असतो. या वाळवंटाची उंची ३४०० मीटर आहे.

५. सहारा वाळवंट

 

www.lonelyplanet.com/africa

सहारा हे जगातील सर्वांत प्रसिद्ध मोठं उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहराने व्यापला आहे. सहारा हे वाळवंट मोठं आहे म्हणजे आफ्रिकन महाद्वीपावरील अनेक देशांत या वाळवंटातून प्रवेश केला जाऊ शकतो.

हे जगातील सर्वांत मोठे व कमी उंचीवरील वाळवंट आहे. वातावरणातील उष्णता व त्याची स्थिरता पावसाला निष्प्रभ बनवते त्यामुळे येथील हवामान उष्ण व कोरडे असते. त्यामुळे या भागात कमी पावसाची नोंद होते.

६. डेझर्ट सफारी, दुबई

 

www.viator.com/tours

दुबई मधील डेझर्ट वाळवंट हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. साधारण दुपारनंतर या सफरीची सुरुवात होते. दुबईची ट्रीप याच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे हे वाळवंट आहे.

वाळवंटातील सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन या डेझर्ट सफारीत होते. उंटावरून रपेट, वाळवंटातील मोटार बाईकचा थरार येथे अनुभवायला मिळतो, पण या भागात सुद्धा कमी पावसाची नोंद होते.

७. गोबी वाळवंट, मंगोलिया

 

www.nomadicexpeditions.com

गोबी वाळवंट हे आशियातील सर्वांत मोठे आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे वाळवंट. येथील हवा अतिशय कोरडी आहे आणि प्रतिकूलतेमुळे प्रदेश निर्जन आढळतो.

हिंदी महासागराकडून येणारे पावसाचे ढग हिमालय पर्वतामुळे अडले जातात. ज्यामुळे गोबी वाळवंटात पाऊस पडत नाही. तिथे तंबूची घरे असतात. तिथे सरासरी पावसाची नोंद अत्यल्प होते.

८. युमा डेझर्ट, अमेरिका

 

http://californiaherps.com/noncal

युमा हे युएसमधील वाळवंट आहे. इथे मोठ्या प्रमाणात कॅक्टस, निवडुंग या वनस्पती आढळतात. इथे वाळूच्या छोट्या छोट्या टेकड्याही आहेत. दरवर्षी इथे सरासरी ८ इंच (२०० मिमि) पेक्षा कमी पाऊस पडतो. उत्तर अमेरिकेतील सर्वांत कठीण वाळवंटापैकी हा एक आहे.

९. बोनेविले सॉल्ट फ्लॅट, यूएसए

 

www.1zoom.me/en

हे तिबेट मध्ये आहे. इथे खार्‍या पाण्याचे तलाव आहेत. येथील हवामान कोरडे आहे. त्यामुळे निर्जलीकरणामुळे पाण्याची पातळी कमी पातळीवर येऊ शकते आणि उच्च दाब वाढू शकतो. इथेही पावसाचे प्रमाण फार कमी असते.

१०. बोर्डिंग नामीबिया

 

www.flickr.com/photos

हा उपसहारा आफ्रिकेतील सर्वांत सूक्ष्म प्रदेश आहे.नामीबिया हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. दरवर्षी इथे सुमारे ३५० मिमि (१४ इंच) इतका पाऊस पडतो.

तर मंडळी, म्हणजेच काय की जगात अशीही काही ठिकाणे आहेत की, जिथे पाऊस पडतच नाही. पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे तिथे उष्णता प्रचंड आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *