सिकंदर खरंच जगज्जेता होता? ह्या ९ गोष्टी सिकंदराबद्दल वेगळंच काहीतरी सांगतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

सिकंदरचा जन्म इसवीसन पूर्व ३५६ मध्ये ग्रीकच्या मकदूनिया येथे झाला होता. त्याचा पिता फिलीप हा मकदूनियाचा राजा होता आणि त्याच्या अनेक राण्या होत्या. सिकंदर हा इतिहासातील त्या राजांपैकी एक होता ज्याने ह्या संपूर्ण जगावर वर्चस्व गाजविण्याचं स्वप्न बघितलं होतं.

InMarathi Android App

ह्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याने ग्रीस ते मिस्र, सिरिया, बैक्ट्रिया, इराण, अफगाणिस्तान आणि सध्याचा पाकिस्तान जिंकला होता. एवढे राज्य जिंकत तो व्यास नदी पर्यंत येऊन पोहोचला.

इतिहासात सांगितल्यानुसार सिकंदरची सेना ही लागोपाठ युद्ध करून थकली होती म्हणून ते  परतले. पण ह्यागील कारण थोडं वेगळं आहे. व्यास नदीच्या पलीकडील हिंदू गणराज्य आणि जनपद ह्यांनी सिकंदराला पुढे येऊ दिले नाही.

त्यामुळे त्याला आणि त्याच्या सेनेला नाईलाजाने परत जावे लागले. सिकंदराच्या ह्या प्रवासात त्याचे इतिहासकार त्याच्या सोबत राहायचे जे त्याच्या यशाला चढवून लिहायचे आणि त्याच्या अत्याचारांना आणि अयशस्वी युद्धांना लपवायचे.

आज आपण ह्या विश्वविजेता म्हणवून घेणाऱ्या सिकंदर बाबत त्याचे काही असेच कुणालाही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

१. सिकंदर हा आपल्या भावांना मारून राजा बनला होता :

 

sikandar-inmarathi06
crawfordand.co

इसवीसन पूर्व ३३६ मध्ये जेव्हा सिकंदर १९-२० वर्षांचा होता तेव्हा त्याने त्याच्या पित्याची हत्या केली.

असे सांगितल्या जाते की, सिकंदरची आई ओलम्पियाने फिलीपला विष दिले होते. त्यानंतर राजगादीवर आपले अधिराज्य गाजविण्यासाठी त्याने आपल्या सर्व सावत्र आणि चुलत भावंडांचीदेखील हत्या केली. आणि त्यानंतर तो मकदूनियाचा राजा बनला.

२. सिकंदरला अरस्तूने जग जिंकण्याच स्वप्न दाखविलं :

 

rochhak.com

सिकंदरचा गुरु अरस्तू जो एक प्रसिद्ध आणि महान दार्शनिक होता. आज जगात जिथे कुठे दर्शनशास्त्र, गणित, विज्ञान आणि मनोविज्ञान शिकविले जाते त्यात कुठे ना कुठे अरस्तूच्या विचारांचा वैज्ञानिक अनुभवांचा उल्लेख नक्की असतो.

सिकंदराला देखील ह्याच अरस्तूने शिकविले. सिकंदराच्या मनात जग जिंकण्याचा विचार देखील अरस्तू ह्यानेच टाकला होता. तर अरस्तूचा भाचा कलास्थनीज हा सिकांदराचा सेनापती होता.

३. अश्या प्रकारे झाली विजयी अभियानांची सुरवात :

 

rochhak.com

सिकंदराने मकदूनियाच्या आजूबाजूच्या प्रदेशांना जिंकून ह्या विजयी अभियानाला सुरवात केली. त्यानंतर तो आशिया मायनर कडे वळला. तुर्की नंतर एक-दोन छोटे राज्य सोडले तर विशाल फारसी साम्राज्य होतं. फारसी राज्य हे मिस्त्र, इराण ते पश्चिमोत्तर भारतापर्यंत पसरलेलं होतं. फारसी साम्राज्य हे सिकंदराच्या साम्राज्याच्या ४० पट मोठे होते.

फारसी साम्राज्याचा राजा शह दारा होता ज्याला तीन युद्धात पराजित करत सिकांदारणे ह्या साम्राज्यावर अधिराज्य गाजवले. पण शाहने सिकंदरशी संधी करत आपल्या एका पुत्रीचा रुखसानाचा विवाह त्याच्याशी केला.

फारसी साम्राज्य जिंकायला सिकंदराला १० वर्ष लागले. ह्यानंतर त्याने एक मोठा जुलूस काढला आणि स्वतःला तो विश्व विजेता म्हणवू लागला.

कारण फारस ला जिकल्यानंतर तो त्याच्या माहितीच्या ६० % जमिनीला जिंकला होता. भारतापर्यंत पोहोचताना त्याला काही आणखी लहान राज्यांशी युद्ध करावं लागलं आणि ते युद्ध तो जिंकलाही.

४. सिंकदरच युद्ध कौशल्य :

 

sikandar-inmarathi07
crawfordand.co

सिकंदर हा खरंच एक महान राजा होता त्यामुळेच त्याची छोटीशी सेना मोठ मोठ्या राज्यांना काबीज करण्यास यशस्वी होत होती.

त्याच्या युद्धनीतींना आजही युरोपातील पुस्तकांत शिकविल्या जाते. सिकंदरच्या युद्ध करण्याची पद्धत इतर राजांपेक्षा वेगळी होती. तो त्याच्या युद्धनीतीत दगड, आगीचे गोळे इत्यादींचा वापर करायचा. जर कधी त्याला त्याची सेना कमी पडताना दिसायची तर तो स्वतः समोर जाऊन लढायचा.

५. सिकांदरचा भारतावर पहिला हल्ला :

इसवीसन पूर्व ३२६ मध्ये सिकंदराने भारतावर पहिल्यांदा हल्ला चढवला. त्यावली भारत हा लहान-लहान राज्य आणि गणराज्यामध्ये विभागलेला होता. राज्यांमध्ये राजा राज्य करायचे तर गणराज्यात प्रमुख हे गणपती असायचे जे प्रजेच्या इच्छेनुसार निर्णय घ्यायचे.

भारतात सिकंदराचा पहिला सामना हा तक्षशीला राज्याचा राजकुमार अंभी ह्याच्याशी झाला पण अम्भीने शरणागती पत्करत सिकंदरची साथ दिली.

 

sikandar-inmarathi03
muslimissues.in

सिकांदाराल अंभी ने भेट दिलेल्या वस्तू बघून तो आश्चर्यचकित झाला. त्याला वाटले की जर भारताच्या एका छोट्याश्या राज्याजवळ एवढी संपत्ती आहे तर संपूर्ण भारतात किती असेल? भारतातील धन-संपदाबघून त्याच्या मनात आता भारतावर अधिराज्य गाजविण्याची इच्छा निर्माण झाली.
तक्षशीला विश्विद्यालयातील आचार्य चाणक्य ह्यांना भारतावर कुठल्या परदेशी राजाचं आक्रमण पटल नाही.

त्यामुळे त्यांनी भारताच्या संस्कृतीला वाचविण्यासाठी सर्व राजांना एकत्र येऊन त्याच्या विरोधात लढण्यासाठी विनंती केली. पण आपसातल्या क्लेशामुळे कुणीही राजाएकत्र आले नाही.

त्यानंतर चाणक्य ह्यांनी भारतातील सर्वात महान आणि शक्तिशाली राज्य मगधच्या राजा धाननंदला देखील विनंती केली पण त्यांनी चाणक्य ह्यांना अपमानित केले. त्यानंतर चाणक्य ह्यांनी गणराज्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले ज्यात त्यांना यश आले आणि ह्या गणराज्यांनी सिकंदर परतत असताना त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

६. सिकंदर आणि पोसरचे युद्ध :

झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि पोरस ह्यांच्यामध्ये झालेलं युद्ध हे सिकंदराच्या आयुशाय्तील सर्वात महत्वाच युद्ध होतं. ह्या युद्धाला ‘पित्सताचे युद्ध’ किंवा ‘हायडेस्पेसचे युद्ध’ म्हणून ओळखल्या जाते. महाराज पोरस सिंध-पंजाब सोबतच एका मोठ्या भागाचे राजा होते. ते त्यांच्या शौर्यासाठी खूप प्रसिद्ध होते.

 

sikandar-inmarathi05
webdunia.com

सिकंदरच्या सेनेला झेलम नदी पार करत पोरसशी लढायचे होते. पण पावसामुळे झेलम नदीला पूर आलेला होता, तरी देखील रात्रीच्या वेळी सिकंदरची सेना नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला पोहोचली. नदीच्या त्या बाजूला राजा पोरस आपल्या ३००० पायदळ सैनिक, ४००० घोडेस्वार, ३०० रथ आणि २०० हत्तींच्या सेनेला घेऊन तयार होता.

त्यानंतर सिकंदरने पोरससाठी एक संदेश पाठवला ज्यात पोरसने माघार घ्यावी असे सांगितले गेले होते. पण पोरसने ते मान्य केले नाही. त्यानंतर ह्या दोन्ही सेनांमध्ये युद्ध सुरु झाले.

ह्यावेळी मात्र पोरसची सेना सिकंदरच्या सेनेवर भारी पडली, युद्धाच्या पहिल्याच दिवशी सिकंदरच्या सेनेने पोरसच्या सेनेची शक्ती बघितली आणि ते घाबरले.

सिकंदरालादेखील हे कळून चूकले होते की पोरसच्या सेनेसमोर तो टिकू शकणार नाही. त्यानंतर त्याने पोरसकडे युद्ध थांबविण्याचा संदेश पाठविला जो पोरसने मान्य देखील केला. त्यानंतर ह्या दोन्ही महान राजांमध्ये संधी झाली की, पुढील सर्व युद्धात पोरस सिकंदराची मदत करेल आणि जिंकलेल्या राज्यांवर पोरस शासन करेल.

७. सिकंदराला त्याच्या सैनिकांमुळे परतावे लागले :

 

rochhak.com

पोरस सोबतच्या युद्धानंतर सिकंदरची सेना लहान गणराज्यावर स्वार झाली. पण ह्यावेळी कठ गन्राज्यासोबत झालेल्या युद्धात यवनींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला पण कठ सेना कमी असल्याने अखेर त्यांना पराजय पत्करावा लागला. त्यानंतर सिकंदरची सेना व्यास नदीजवळ पोहोचली.

व्यास नदीच्या पलीकडे नंदवंशी राजा होता ज्याच्याजवळ २० हजार घोडेस्वार, २ लाख पायदळ, २ हजार चार घोड्यांचे रथ, आणि जवळपास ६ हजार हत्ती असलेली विशाल सेना होती. हे एकूणच सिकंदरची सेना घाबरली.

सिकंदराला भारतावर विजय मिळवायचा होता पण त्याच्या सैनिकांमुळे त्याला परतावं लागलं.

पण परत जाताना त्याला मालाव आणि क्षुद्रक राज्याच्या विधाला बळी पडाव लागलं. जाताना ह्या लहान क्षेत्रांवर विजय मिळविण्याचा सिकंदराचा विचार होता पण तो काही पूर्ण झाला नाही. ह्या लहान गणराज्यांना एकत्र आणण्यात आचार्य चाणक्य ह्यांचा खूप मोठा हात होता.

८. सिकंदर हा एक क्रूर आणि अत्याचारी होता :

आपल्या अभ्यासातील इतिहासाच्या पुस्तकात सिकंदराला एक महान योद्धा म्हणून सांगितले गेले आहे. तसेच इतिहासात असे देखील लिहिलेलं आहे की, पोरसला त्याने युद्धात पराजित केले पण त्याच्या शौर्याला बघून त्याचं राज्य त्याला परत दिलं.

 

sikandar-inmarathi08
desencyclopedie.wikia.com

पण इतिहासकारांच्या मते सिकंदर हा एक अतिशय क्रूर व्यक्ती होता. त्याने कधीही दया दाखविली नाही. तो त्याच्या सहयोगींना देखील अतिशय क्रूरपणे मारत असे. त्याने त्याच्या सर्वात जवळचा मित्र क्लीटोसला देखील मारून टाकले होते. त्याने त्याचा सेनापती कलास्थनीज ह्याला मारताना देखील विचार केला नाही.

ह्याबाबत प्रसिद्ध इतिहासकार एर्रीयर लिहितात की, जेव्हा बैक्ट्रियाचा राजा बसूस ला बंदी बनविण्यात आले होते तेव्हा सिकंदरने आधी त्यांच्यावर चाबुकाने वार केले त्यानंतर त्यांचे नाक कापून त्यांची हत्या केली.

९. सिकंदराचा मृत्यू :

 

sikandar-inmarathi04
rochhak.com

आपल्या विश्व विजयाच्या स्वप्नाला तुटताना बघून सिकंदर खचून गेला. आणि त्याने मद्यपान करण्यास सुरवात केली. सिकंदर भारतात १९ महिने राहिला. त्यानंतर तो इसवीसन पूर्व ३२३ मध्ये इराण पोहोचला. तिथेच वयाच्या ३३ व्या वर्षी त्याची मृत्यू झाली. त्याच्या मृत्यूचे कारण मलेरिया सांगण्यात आले.

तर हा “महान” समजल्या जाणारा सिकंदर त्याच्या इतिहासकांमुळे महान झाला. वास्तविक तो एक अतिशय क्रूर होता. जरी तो एक चांगला योद्धा असला तरी देखील तो कधीही विश्व विजेता बनू शकला नाही, हेच सत्य आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “सिकंदर खरंच जगज्जेता होता? ह्या ९ गोष्टी सिकंदराबद्दल वेगळंच काहीतरी सांगतात!

 • February 5, 2019 at 2:40 pm
  Permalink

  JAY BHAVANI JAY SHIVRAY JAY SHAMBHURAJE

  Reply
 • February 8, 2019 at 4:00 pm
  Permalink

  nice information

  Reply
 • February 9, 2019 at 8:01 pm
  Permalink

  लेख खूपच माहितीपूर्ण आहे . सिकंदरची जगाला न कळलेली बाजू उलगडून दाखवले .

  Reply
 • February 12, 2019 at 7:48 pm
  Permalink

  चांगली माहिती आहे .

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *