भारतीय तिरंग्याशी निगडीत ९ रोचक गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

वाऱ्याच्या झोतात डौलाने फडकणारा तिरंगा पाहून आपली छाती कशी अभिमानाने फुलून येते ना!

विशेषतः स्वातंत्र्यदिनी आणि गणतंत्रदिनी हाच तिरंगा छातीवर लावून मिरवण्यात देखिल एक वेगळाच आनंद असतो.

आपल्या या राष्ट्रीय प्रतीकाशी निगडीत अश्या काही facts आहेत, ज्या अजूनही अनेकांना माहित नाहीत.

चला तर मग जाणून घेऊ या अश्याच काही रोचक गोष्टी!

१) २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संसदेमध्ये तीन रंगाच्या या निशाणाला ‘भारतीय तिरंगा’ म्हणून मान्यता देण्यात आली.

 

tricolor flag marathipizza

 

२) या झेंड्याचे निर्माते आहेत पेंगली वेंकय्या, जे स्वत: एक स्वातंत्र्य सेनानी होते.

 

tricolor flag pengali venkaiyah marathipizza 01

विस्मरणात गेले वेंकय्याजी १९६३ साली अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मृत्यू पावले.

३) भारतीय तिरंगा केवळ खादी कपड्यापासूनच बनवता येतो.

इतर कोणत्याही कपड्यापासून तिरंगा बनवला गेल्यास तो कायदेशीर गुन्हा मानला जातो.

 

jail-inmarathi
mcdonoughcountysheriff.com

४) हा तिरंगा कोणीही बनवू शकत नाही, कारण त्याचा अधिकार फक्त एकाच संस्थेला देण्यात आला आहे ती संस्था म्हणजे ‘कर्नाटका खादी ग्रामाद्योग संयुक्त संघ’ होय.

 

tricolor flag marathipizza 02

स्त्रोत

५) २००२ या वर्षापर्यंत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचा दिवस सोडला तर इतर दिवशी तिरंगा फडकावणे हा कायदेशीर गुन्हा मानला जायचा.

पण २००१ या साली नवीन जिंदल यांनी या विरोधात याचिका सादर केली.

त्यांचं म्हणणं होतं की झेंडा म्हणजे राष्ट्रीयत्वाचे प्रतिक आहे, आमची शान आहे. त्यामुळे झेंडावंदन कधीही करता यायला हवं.

 

tricolor hosting inmarathi
madhyapradesh.org

न्यायालयाने २००४ साली जिंदलजीचं म्हणणं मान्य करत त्यांच्या बाजूने निर्णय दिला.

६) भारताच्या सीमेमध्ये जर तिरंगा अन्य कोणत्याही देशाच्या झेंड्यासोबत फडकवायचा असेल तर भारतीय तिरंगा सर्वांच्या पुढे असायला हवा.

 

tricolor flag marathipizza 03

स्त्रोत

७) जर तिरंगा एखाद्या छताखाली फडकवायचा असेल तर तो नेहमी उजव्या बाजूने फडकवला जातो. आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला तो डाव्या बाजूला फडकताना दिसतो.

८) भारताला भेट देणाऱ्या विदेशी राजकारणी व्यक्तींसाठी पुरवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये भारतीय तिरंगा हा नेहमी उजव्या बाजूला असतो आणि ज्या देशाचे पाहुणे भारतात आले आहेत त्यांचा झेंडा डाव्या बाजूला असतो.

९) आणि शेवटची गोष्ट सर्वांनाच ठावूक असेल की – १९७१ मध्ये अंतराळात गेलेल्या राकेश शर्मांनी भारतीय तिरंगा देखील सोबत नेला होता…!

 

tricolor flag rakesh sharma marathipizza

स्त्रोत

वंदेमातरम् ! जय हिंद ! भारत माता की जय !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 60 posts and counting.See all posts by vishal

One thought on “भारतीय तिरंग्याशी निगडीत ९ रोचक गोष्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?