टेस्लाचा हा प्रयोग दुसऱ्या महायुद्धाला कलाटणी देऊ शकला असता, पण…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ड्रोन हा आधुनिक जगातील महत्वाच्या शोधांपैकी एक आहे. आज जगातील शक्तिशाली देशांच्या प्रत्येक सेनेजवळ स्वतःचा ड्रोन आहे. नुकतच राजधानी दिल्ली येथे सरकारने ड्रोनचा व्यावसायिक उपयोग करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजे जर कधी तुम्हाला ड्रोन होम डिलिवरी करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

 

tesla-drone-inmarathi

 

पण जर आम्ही तुम्हाला हे सांगितल की या ड्रोनचा शोध १२० वर्षांपूर्वी लागला होता तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

 

tesla-drone-inmarathi01
aolcdn.com

निकोला टेस्ला याचं नावं तर आपण सर्वांनीच एकले असेल. अल्टरनेटर करंटचा वापर व्यावसायिक करत विजेला जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचविणारा अवलिया म्हणजे टेस्ला. यांनीच आज पासून १२० वर्षांआधी ड्रोन डिझाईन करून त्याचं पेटेंट मिळविले होते.


 

tesla-drone-inmarathi02
twitter.com

मॅथ्यू सचरोयर नावाच्या एका व्यातीने नुकतेच टेस्लाच्या या पेटेंटचा एक भाग ट्वीट केला आहे. ज्यामध्ये टेस्ला ने संचार, वैज्ञानिक अन्वेषण आणि युद्धात वापरण्यात येणारे मानव रहित वाहनांना विकसित करण्यासंदर्भात पेटेंट घेतले होते.

 

tesla-drone-inmarathi03
amazonaws.com

हे पेटेंट टेस्ला यांनी १ जुलै १८९८ साली दाखल केले होते. या पेटेंटमध्ये तपशीलवार धडा आणि आकृती देखील आहेत, ज्याने माहिती पडत की, नावेसारख्या दिसणाऱ्या मशीनला रिमोटने उत्पन्न होणाऱ्या तरंगांनी नियंत्रित केल्या जाऊ शकतं.

टेस्ला या पेटेंटमध्ये त्यांनी डिझाईन केलेल्या मशीन बद्दल सांगताना म्हणतात की,

“या मशीन्सचा उपयोग दुर्गम क्षेत्रात संचार करण्याकरिता तसेच वर्तमान स्थितीचा  शोध घेण्यासाठी केला जाऊ शकतो,तसेच वैज्ञानिक, अभियांत्रिकी किंवा व्यवसाय हेतूसाठी देखील केला जाऊ शकतो. पण माझ्या या शोधाचे सर्वात मोठे मुल्य हे युद्धाच्या परिणामांना प्रभावित करणे असेल.”

 

tesla-drone-inmarathi04
wakingtimes.com

मॅथ्यू सचरोयर यांच्या या ट्वीट नंतर आता एक नवीन वाद उठलाय. जर टेस्ला आपल्या या अविष्काराला मूर्तरूप देऊ शकले असते, तर काय त्यानंतर घडलेल्या विश्वयुद्धाची रूपरेषा वेगळी असती?

टेस्ला आपल्या या पेटेंटमध्ये हे स्पष्ट करतात की,

“त्यांनी शोध लावला आहे, ज्यामुळे ते रेडीओ तरंगांना ज्या की पृथ्वी, पाणी किंवा वातावरणाद्वारे प्राप्त होतात, स्पेसच्या  माध्यमातून तरंगांद्वारेच ‘जहाजां’ना स्थानांतरीत करू शकतात.

आज जेव्हा जगातील कित्येक सेनेच्या हे महत्वाच्या गोष्टींमध्ये ड्रोन समाविष्ट झाले आहे, तर विचार करा जर तेव्हा टेस्ला यांनी आपल्या या शोधावर काम पूर्ण केले असते तर आज दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम काही वेगळेच असते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *