हे आहेत २०१७ चे नवीन कायदे… तुम्हाला माहित आहेत का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

२०१७ मध्ये आपल्या भारतात खूप मोठमोठ्या घडामोडी घडून गेल्या. हे वर्ष अपघातांच्या बाबतीत थोडे निराशाजनक राहिले, कारण या वर्षामध्ये खूप हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. पण या वर्षामध्ये काही चांगल्या गोष्टी देखील घडल्या. मोदी सरकारने या काळामध्ये जुने कायदे काढून, कितीतरी नवीन कायदे अमलात आणले आहेत.

InMarathi Android App

आपण या देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे या नात्याने आपल्याला हे नवीन कायदे माहित असणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री जन – धन योजना, जीएसटी आणि रेरा (रियल स्टेट रेगुलेटरी अॅक्ट) यांसारखे महत्त्वपूर्ण कायदे आले आहेत, जे सध्या लागू करण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नवीन कायद्यांची ओळख करून देणार आहोत, जे तुम्हाला हे वर्ष संपताना समजणे गरजेचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या कायद्यांविषयी…

१. जीएसटी

 

a2ztaxcorp.com/
a2ztaxcorp.com/

गुड्स अँड सर्विस टॅक्स (जीएसटी) १ जुलै २०१७ ला लागू करण्यात आला. जीएसटी काउंसिलने १२०० पेक्षा जास्त वस्तू आणि सेवांसाठी कराचे दर ठरवण्यात आले. वेगवेगळ्या टॅक्स श्रेणी बनवण्यात आल्या, ज्या ५ ते २८ टक्क्यांच्या दरम्यान आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर सेन्ट्रल एक्ससाईज ड्युटी, सर्विस टॅक्स, अॅडीशनल कस्टम ड्युटी (सीवीडी), स्पेशल अॅडीशनल ड्युटी ऑफ कस्टम (एसएडी), व्हॅट / विक्री कर, मनोरंजन कर, ऑक्ट्रॉय आणि एन्ट्री टॅक्स, परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स संपले आहेत. हे स्वातंत्र्यानंतर टॅक्समध्ये सुधारणा केलेले सर्वात मोठे पाऊल आहे.

२. रेरा (रियल स्टेट रेग्युलेटरी अॅक्ट)

 

Laws of 2017.Inmarathi1
kxcdn.com

या कायद्यानुसार, देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला आपली रेग्युलेटरी अथॉरिटी बनवावी लागेल, जी कायद्यानुसार नियम – कायदे बनवेल. घर खरेदी करणाऱ्या लोकांची तक्रार असते कि, त्यांच्या हितांच्या रक्षेसाठी कोणताही कायदा बनवण्यात आलेला नाही, ज्याच्यानंतर वर्ष २०१६ मध्ये संसदेमध्ये रियल इस्टेट (नियमन व विकास) कायदा म्हणजेच रेरा २०१६ मध्ये पास करण्यात आला होता. पण देशामध्ये रेरा कायद्याचे सर्व ९२ कलम १ मे २०१७ पासून लागू केले गेले. या नवीन अॅक्टनुसार बिल्डरला आपल्या प्रकल्पाची नोंदणी करावी लागेल, त्याचबरोबर प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची टाईमलाईन देखील सांगावी लागेल.

३. आयआयआयटी अॅक्ट २०१७

 

Laws of 2017.Inmarathi2
gstindiaguide.com

या वर्षी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी बिल पास झालेला आहे. हा कायदा टेक्निकल भारतीय संस्थानांसाठी राष्ट्रीय महत्त्व संदर्भ प्रदान करते. टेक्निकल क्षेत्रामध्ये प्रगती आणि विस्तृत ज्ञानाच्या विकासाच्या उद्देशाने याला पास करण्यात आले आहे.

४. तीन तलाक

 

Laws of 2017.Inmarathi3
andjusticeforall.org

मुस्लिम स्त्रिया (विवाह अधिकारांचे संरक्षण) विधेयक, २०१७ तीन तलाक किंवा तोंडी घटस्फोट अपराधिक घोषित केले जाते आणि यामध्ये घटस्फोटाच्या या प्रथेचा वापर करणाऱ्या लोकांना तीन वर्ष जेल आणि दंडाची तरतूद आहे.

५. कंपनी अॅक्ट २०१७

 

Laws of 2017.Inmarathi4
netdna-ssl.com

२७ जुलै २०१७ ला या अॅक्टचे संशोधन करण्यात आले. या बिलला २०१३ मध्ये बनवण्यात आलेल्या कायद्याच्या गुंतागुंतीला सोडवण्यासाठी याला पास करण्यात आले होते. कॉर्पोरेट गव्हर्नर्सला अजून सोपे आणि सुलभ व्यवसायाचे काम करण्यासाठी संशोधन करण्यात आले होते.

असे हे २०१७ मधील कायदे काही प्रमाणात लोकांच्या फायद्याचे ठरले आहेत आणि लोकांचा यामुळे काही प्रमाणात ताण कमी झाला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “हे आहेत २०१७ चे नवीन कायदे… तुम्हाला माहित आहेत का?

  • December 27, 2018 at 2:02 pm
    Permalink

    मी एका खासगी कंपनीत काम करत आहे कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे माझे वय ३२ वर्षे आहे जर कंपनी बंद झाली तर मला कंपनी मालकाकडून काय हिशोब मिळू शकतो

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *