पाकिस्तान ज्या संस्थेद्वारे खोट्या भारतीय नोटा छापतो, त्यांनाच नव्या नोटांचा contract?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

De La Rue नावाची एक ब्रिटिश फर्म स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताच्या नोटा छापते आहे. २००९ – २०१० या काळात भारताच्या हे लक्षात आलंय की De La Rue ह्या कंपनीमुळे पाकिस्तान आपली currency छापतोय आणि त्या नोटा अतिरेक्यांना पुरवतोय. म्हणून या कंपनीवर अर्थातच आपण ban लावला होता. परंतु आता अशी माहिती समोर आलीये की ह्याच blacklisted कंपनीला आपण नवीन ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा छापण्याचा contract दिलाय. तसेच ह्या कंपनीला नवीन १० रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा बनवण्याची “polymer note making technology” आपल्याला देण्याचाही contract दिला गेलाय. प्रश्न हा आहे कि या कंपनीवरचा ban का उचलला गेला?

delarue-currency-notes-01-marathipizza

 

 

यावर The Hindu या इंग्रजी वर्तमानपत्रात पुढील statement आलं होतं:

ह्या कंपन्या नोटा छापण्याच्या business मध्ये गेली १५० वर्ष काम करत आहेत. त्या असली कामं करून स्वतःचं नुकसान का करतील!? ह्या कंपन्या अगदी लहान देशांना सुद्धा currency छापून देतात. म्हणून हा ban उचलण्यात आला आहे.

delarue-currency-notes-02-marathipizza

ह्या कंपनीला blacklisted करण्याचा आणखी एक कारण असं की, या कंपनीने defective कागद आपल्याला पुरवला होता जे Security Printing and Minting Corporation of India Ltd (SPMCIL) ने काही tests घेऊन सिद्ध केलं होतं. परंतु “परिस्थिती”मुळे मोदींनी २०१५ मध्ये ban उचलला.

तसेच अशीही माहिती समोर आलीये की नवीन नोटांमध्ये security threads हे “generic ” म्हणजे अत्यंत सामान्य, common वापरण्यात आले आहेत जे इटालियन आणि अमेरिकन – स्वीडिश कंपन्यांकडून मागवण्यात आले आहेत.


delarue-currency-notes-marathipizza

De La Rue ही कंपनी “machine readable earthly metals” असे threads नोटांमध्ये वापरता असे. पण आता SPMCIL च्या सूत्रांकडून असे कळले आहे की नवीन threads ची कुठल्याही प्रकारची चाचणी घेतलेली नाहीये…!

(by the way – मोदींच्या नोट-ban मुळे एका पाकिस्तानी माफिया ने आत्महत्या केलीये बरं का! अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.)

नोटा छापण्यात इतक्या भानगडी असतात हे तर माहीतच नव्हता बुआ!

“आपण आपल्या नोटा स्वतः का नाही छापत?” असा विचार साहजिकच मनात येऊन जातो – पण त्यासाठी तंत्रज्ञान प्रगत असणं आणि त्यासाठी लागणार पोषक वातावरण असणं फार फार महत्त्वाचा आहे.

त्याबरोबरच राजकीय इच्छाशक्ती आणि जागरूक, क्रियाशील नागरिकांचीही तितकीच आवश्यकता आहे…तरच आपले पैसे आणि देश सुरक्षित राहू शकतील.

नाही का!!!?

===
एडिटर्स एडीट :- वरील संपूर्ण माहिती ही अनेक बातम्या, डिस्कशन्स ह्यांच्या अभ्यास आणि निरीक्षणानंतर संकलित केली गेली आहे. इच्छुकांसाठी २ माहिती स्त्रोत पुढे देत आहोत :

Business Today : Your new currency is not 100 per cent ‘Made in India’
The Hindu : No time to add new security features in notes, says official
===

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *