या कोरोना टेस्ट किट मुळे आपल्याला मिळू शकतो अवघ्या १५ मिनिटांत रिपोर्ट, काय आहे ही प्रक्रिया?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा वाढत आहे, तसतसं त्याला सामोरं जाण्याचं आव्हान देखील वाढत आहे. भारतासारख्या देशाला त्याचे रुग्ण वाढू देणं परवडणारं नाही.

रुग्ण वाढू नयेत त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. कोरोनचा सामना करताना ज्या अनेक समस्या येत आहेत त्यातीलच एक म्हणजे कोरोनाची चाचणी करणे.

ह्या कोरोना टेस्ट मुळात वेळखाऊ आहेत, म्हणजे रिझल्ट यायला पाच ते सहा तास लागतात.

त्यानंतर जर तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तो किती जणांच्या संपर्कात आला, त्यापैकी किती लोकांना कोरोना झाला हे पाहण्यासाठी त्या लोकांच्याही टेस्ट कराव्या लागतात.

 

corona in india inmarathi
hindustani times

 

या टेस्ट खर्चिक आहेत म्हणूनच यावर काही करता येईल का? हे भारतातल्या आरोग्य व्यवस्थेकडून पाहिलं जात होतं.

आता नवीन टेस्ट करता येऊ शकतात, ज्यातून ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे फक्त पंधरा मिनिटे ते अर्धा तास या कालखंडात कळते.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने covid-19 च्या चाचणी करिता काही नवीन पद्धतीच्या चचण्याकरिता परवानगी दिली असून, त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत.

यातील तज्ज्ञांना असे वाटत आहे की, या झटपट चाचण्या करण्याच्या पद्धतीमुळे एखाद्या विशिष्ट ठिकाणातील रुग्ण किती आहेत हे ओळखण्यास मदत होईल, आणि त्या भागावर लक्ष केंद्रित करून तिकडे covid-19 साठी उपाय योजना करण्यात येतील.

इन्फ्ल्यूंझा ची कोणतीही लक्षणे दाखवणाऱ्या रुग्णाची अशी टेस्ट करणे सोपे जाणार आहे.

सध्या भारतात जी टेस्ट करण्यात येते तिला म्हणतात Polymerase chain reaction (RT-PCR) test त्यानुसार खाजगी लॅबमध्ये ही टेस्ट करण्यासाठी ४५०० रुपये लागतात तर आता नवीन टेस्ट करण्यासाठी तीनशे रुपये लागतील, सरकारतर्फे ही टेस्ट मोफत करण्यात येते.

 

corona doctors inmarathi
CNBC.com

 

PCR चाचणी अंतर्गत व्यक्तीच्या नाकातील आणि घशातील थुंकीचे नमुने तपासणीसाठी वापरले जातात.

ज्या रुग्णांना आधीच ताप- खोकला आहे अशा रुग्णांची चाचणी यांच्या अंतर्गत करण्यात येते. कारण ह्याच रुग्णांना covid-19 होण्याची शक्यता ही अधिक असते. म्हणून या रुग्णांच्या चाचणीला प्राधान्य देण्यात येते.

RT-PCR टेस्ट, ही आपल्या शरीरातील DNA वर काम करते. परंतु covid-19 हा आजार RNA शी संलग्न आहे. म्हणून या टेस्टमध्ये RNA रूपांतर DNA मध्ये करून त्यावर टेस्ट करावी लागते.

ही टेस्ट करायला तज्ञाची आवश्यकता असते. सामान्य लॅब टेक्निशियनला घशातील स्वाब काढता येत नाही. त्यासाठीच PCR या टेस्ट ला वेळ अधिक लागतो.

आणि रुग्णाचा रिपोर्ट येण्यास वेळ लागतो.  त्याच्या संबंधित किती लोक आहेत हेही शोधायला वेळ लागतो. हेच टाळण्यासाठी आता नवीन पद्धत अमलात आणली जाणार आहे.

ही जी नवीन अँटीबॉडी टेस्ट आहे त्यानुसार फक्त पंधरा मिनिटे ते अर्धा तासच वेळ लागणार आहे. यासाठी कोणत्याही तज्ञाची गरज नाही. यामध्ये रक्ताची चाचणी करण्यात येते.

ज्यामध्ये व्यक्तीचं बोट अल्कोहलने पुसून लॅन्सेट वर ठेवण्यात येतं. त्यावर रक्त घेऊन त्याची टेस्ट केली जाते. साधारण प्रेग्नेंसीची जशी टेस्ट केली जाते तशीच ही प्रोसेस आहे.

 

corona home test kit inmarathi

 

त्या लॅन्सेट वर काही रेषा असतात. त्या वरची G लाईन असते ती IgG (Immunoglobulin G) antibodies, ani M line hi IgM (Immunoglobulin M) antibodies दर्शविते.

एक negative line असते ज्यानुसर शरीरात antibodies नाहीत हे सिद्ध होते. आणि ती व्यक्ती कोरोना positive असते.

अशा पेशंटवर मग उपचार करणे गरजेचे असते. वैद्यकीय उपचारानंतर जेव्हा शरीरातील प्रतिकारशक्ती वाढायला लागते तेव्हा IgM antibodies वाढायला लागतात,आणि पुढे पूर्ण रिकवरीच्या वेळेस IgG antibodies वाढतात.

आणि जेव्हा IgG antibodies वाढतात, तेव्हा अशा पेशंट्सना कोरोना मधून मुक्त झाला असं घोषित करण्यात येतं आणि त्याला घरी जाण्याची, आणि फिरण्याची परवानगी देण्यात येते.

म्हणूनच एखाद्या भागात जर कोरोना रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असेल तर त्या भागातल्या लोकांची अशाप्रकारची टेस्ट करणे गरजेचे ठरतं. कारण या टेस्ट लवकर होतात आणि निदान करणेही सोपे होते.

 

corona home test kit inmarathi 1
financial times

 

IgM आणि IgG किती आहेत हे ओळखण्याचे किट्स अजूनही भारतात नाहीत. आता खाजगी लॅबना देखील या अँटीबॉडी टेस्ट करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

ICMR आता त्या दृष्टिकोनातून पावले टाकत आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यासाठी या राज्यांनी रॅपिड अँटीबॉडी टेस्ट करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती ICMR कडे केलेली आहे.

या किट मुळे ग्रामीण भागातील तसेच शहरांमधील झोपडपट्ट्यांमधील रुग्णांची झटपट तपासणी करणे शक्य होणार आहे. एकूण कोरोना संक्रमण किती झाले आहे याचा अंदाज येऊ शकेल.

लॉक डाऊन नंतर बरेच लोक आपापल्या मूळ गावी जाण्यासाठी धडपडत होते, आणि मिळेल त्या मार्गाने ते आपल्या मूळ गावी गेलेले आहेत. त्यामुळे हे संक्रमण वाढू शकण्याची शक्यता वाढलेली आहे.

 

corona breakdown inmarathi
outlook india

 

ICMR च्या दृष्टीकोनातुन गावी परतलेल्या दहा माणसांपैकी तीन व्यक्तींना कोरोना असण्याची शक्यता अधिक आहे. हे लोक जर त्यांच्या कुटुंबांमध्ये मिसळले तर त्या कुटुंबांना कोरोना होण्याची शक्यता अधिक आहे.

देशातील काही काही भाग आता कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट ठरताहेत. त्यासाठीच अँटीबॉडी टेस्ट महत्वाच्या भूमिका बजावू शकतात. बऱ्याचदा कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीदेखील कोरोनाचा वाहक असू शकते.

मग ती व्यक्ती covid-19 पॉझिटिव्ह आहे की नाही हे या अँटीबॉडी टेस्टमधून कळू शकते. जेव्हा कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल, त्यावेळी समुह संसर्गाची शक्यता अधिक वाढणार आहे.

त्यावेळेस लवकरात लवकर टेस्ट करणे आणि रिपोर्ट मिळवणे गरजेचे असणार आहे म्हणून या अँटीबॉडी टेस्ट उपयोगाचे ठरते.

म्हणूनच भारताच्या आरोग्य खात्याने आता या अँटीबॉडी टेस्ट किट परदेशातून मागवायला सुरुवात केली आहे. बेंगलोर मध्ये असलेल्या एका कंपनीत covid-19 तपासण्या करिता लागणाऱ्या किटचे संशोधन सुरू आहे.

लवकरच अशा किट्स उपलब्ध होतील अशी आशा करूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?