रात्र नीट जावी असं वाटत असेल, तर ह्या १५ गोष्टी करणे टाळा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

चांगली झोप ही तर सर्वांनाच हवी असते. कारण ती आपल्या मानसिक आणि शारीरक आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. डॉक्टर देखील रात्री ८ तासांची झोप घेण्यास सांगतात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली दिनचर्या एवढी अस्ताव्यस्त झालेली आहे, की आपल्याला ही चांगली झोप मिळणेच कठीण झाले आहे.

कारण आपल्याला हे तर माहित आहे की चांगली झोप आपल्यासाठी आवश्यक आहे पण त्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला ठावूक नसते.

असे अनेक जण आहेत, जे रोज वेळेवर झोपतात. केवळ वेळेवर झोपल्याने चांगली आरोग्यदायी झोप मिळते? तुम्ही कितीही वेळेवर झोपले तरी तुम्हाला त्याच वेळी झोप लागते? कदाचित नाही. आणि याचे कारण म्हणजे तुमच्या चुकीच्या सवयी. ज्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होते. तुम्ही झोपण्याआधी काय काय करता यावर तुमची झोप कशा प्रकारची असेल हे अवलंबून असते.

जर तुम्हाला चांगली आणि शांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वीच्या तुमच्या काही वाईट सवयी तुम्हाला सोडाव्या लागतील. आज आम्ही तुम्हाला तुमच्या त्याच चुकीच्या सवयींविषयी सांगणार आहोत.

१. फोन किंवा लॅपटॉप वर असणे :


 

sleeping-inmarathi03
medium.com

अनेकांना रात्री झोप येत नाही म्हणून ते फोन किंवा लॅपटॉप घेऊन बसतात. पण खरे सांगायचे तर तुम्हाला झोप न येण्याचे कारणच हे स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप म्हणजेच तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत. हे तुमच्या डोक्याला स्टिम्युलेट करतात आणि तुम्हाला जागे ठेवतात. त्यामुळे झोपण्याआधी तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरण्याची सवय बंद करा.

२. रात्री ऑफिसचे ईमेल्स चेक करणे :

 

sleeping-inmarathi04
hbr.org

रात्री कामाचे किंवा ऑफिसचे ईमेल्स चेक केल्याने तुम्हाला तणाव जाणवू शकतो. दुसऱ्या दिवशी आपण जे काम करणार आहोत ते आत्ता इमेल्स वाचल्याने चुकणार नाही हे माहित असूनही आपण इमेल्स वाचतो. हे सवय सोडायला हवी. आणि जर खूप महत्वाचे ईमेल्स असतील तर झोपायच्या किमान एक तासा आधीच ते वाचून घ्या. जेणेकरून तुम्हाला आलेला तणाव कमी करायला तुम्हाला वेळ मिळेल आणि त्यामुळे तुमची झोप खराब होणार नाही.

३. झोपण्याआधी भांडण करू नये :

 

sleeping-inmarathi11
indianexpress.com

कुठलेही भांडण हे सहजासहजी थांबणारे नसते. त्यात पण जर तुम्ही रात्री आपल्या साथीदारासोबत भांडलात आणि मग झोपलात तर तुमची रात्र खराब झाली समजा. यावेळी अनेकदा असे होते की आपण एकतर दुखावलेले असतो, रडत असतो किंवा खूप विचार करत असतो. यामुळे तुम्हाला अश्या स्थितीत चांगली झोप लागणे अशक्यच. त्यानंतर याचा परिणाम तुम्हाला दुसऱ्या दिवशीही जाणवेल. त्यामुळे शक्यतोवर झोपण्याआधी भांडणे टाळा.

४. झोपण्याआधी अंघोळ करणे :

 

sleeping-inmarathi12
fit-corner.com

अनेकांना झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय असते, त्यांच्यामते अंघोळ केल्याने रात्री चांगली झोप लागते. पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. रात्री अंघोळ केल्याने आपल्या शरीराचे तापमान कमी होऊन जाते. आणि जर तुम्ही गरम पाण्याने अंघोळ केली तर तुमच्या शरीराचे तापमान वाढून जाईल.

या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरासाठी चुकीच्या आहेत. यामुळे तुमची झोप प्रभावित होईल.

यासाठी तुम्ही एकतर रात्री अंघोळ करू नका किंवा झोपण्याच्या काही वेळा आधी करा. म्हणजे तुमच्या शरीराला त्याच्या नॉर्मल तापमानात येण्यासाठी वेळ मिळेल.

५. झोपण्यापूर्वी काहीही खाणे :

 

sleeping-inmarathi09
linkedin.com

आजकाल लोकांची दिनचर्या एवढी वाईट झाली आहे की, कितीही ट्राय केले तरी आपण त्यामध्ये समतोल राखण्यात अयशस्वीच ठरतो. एकतर दिवसभर काम करून आपण सायंकाळी घरी जाणार. त्यानंतर घरातील काम आटोपणार किंवा इतर काही कामे करणार आणि मग रात्री जेवण करणार, तेही अगदी झोपायच्या आधी. पण ही सवय आपल्या झोपेकरीताच नाही तर आरोग्याकरिता देखील वाईट आहे. यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. तसेच तुम्हाला अॅसीडीटीची समस्याही उद्भवू शकते.

६. झोपण्याआधी अतिप्रमाणात पाणी पिणे :

 

sleeping-inmarathi08
fit-corner.com

फक्त रात्रीच नाही तर दिवसभर स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप गरजेचे असते. पण म्हणून रात्री झोपण्याआधी अति प्रमाणात पाणी पिणे चुकीचे आहे. स्वस्थ राहण्यासाठी दिवसभरात ६-८ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. पण झोपण्याआधी जास्त पाणी पिऊ नका, त्यामुळे तुम्हाला वारंवार वॉशरूमला जावे लागू शकते. ज्याने तुमची झोप नक्कीच मोडेल.

७. झोपण्याआधी कॅफिनयुक्त पदार्थाचे सेवन करणे :

 

sleeping-inmarathi13
fit-corner.com

झोपण्याआधी कॅफिनयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने तुमची झोप बिघडू शकते. कॅफिनयुक्त पदार्थ म्हणजे केवळ कॉफी नाही तर चहा किंवा चॉकलेट हे देखील असतात. तुम्हाला भालेळी चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर चांगली झोप लागते असं वाटलं असल तरी तुमच्या झोपेकरिता हे कधीही चांगले नाही.

८. झोपण्याआधी मद्यपान किंवा धुम्रपान करणे :

 

sleeping-inmarathi10
huffingtonpost.in

मद्यपान हे तर सहसा झोपण्यापुर्वीच केले जाते. पण हे देखील तुमच्या झोपेकरिता चांगले नाही. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागणार नाही. मद्यपानासोबतच झोपण्याआधी धुम्रपान करणे हे देखील चांगली झोप न येण्याचं एक कारण आहे. त्यामुळे झोपण्याआधी धुम्रपान करणे शक्यतोवर टाळायला हवे.

९. खोलीचे तापमान जास्त ठेवून झोपणे :

 

sleeping-inmarathi06
thelist.com

अनेकांना त्यांच्या खोलीचे तापमान जास्त ठेवून झोपणे आवडत असेल. पण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. रात्री खोलीचे तापमान थोडे कमी ठेवा आणि अंगावर चादर घेऊन झोप यामुळे तुम्ही चांगल्या आणि शांत झोपेचा अनुभव घेऊ शकाल.

१०. जास्त विचार करणे :

 

sleeping-inmarathi14
publichealthwatch.wordpress.com

झोपण्याआधी अति विचार करणे किंवा विचार करत करत झोपणे हे देखील चुकीचे आहे. कारण चांगली झोप लागण्याकरिता तुमचे चित्त हे अगदी शांत असणे खूप गरजेचे असते. जर तुमच्या डोक्यात अनेक प्रकारच्या चिंता घर करून बसल्या तर तुम्हाला नीट झोप येणार नाही. म्हणून झोपण्यापूर्वी स्वतःला शांत करा आणि डोक्याला जरा विश्रांती द्या.

११. रात्री जीमिंग करणे :

 

sleeping-inmarathi07
fit-corner.com

कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणे हे शरीरासाठी कधीही चांगलेच. पण तो व्यायाम कधी करावा हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. काही लोकांना रात्री जिमला जाने आवडते तर काहींना वेळेअभावी ते करावे लागते.

पण झोपण्यापूर्वी जीमिंग करणे हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुमचा पल्स रेट वाढतो.

अश्या स्थतीत झोपणे हे चुकीचे आहे. यापासून वाचण्यासाठी जमल्यास रात्री जिम ला जाऊ नका नाहीतर आल्यावर एक कोल्ड शॉवर नक्की घ्या.

१२. दुपारी झोपणे :

 

sleeping-inmarathi15
thesun.co.uk

या सवयीचा आपल्या झोपेवर खूप परिणाम होतो. दुपारी झोपल्याने तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी एकतर दुपारी झोपणे टाळा किंवा झोपायचे असेल तर तुम्ही एक पावर नॅप नक्कीच घेऊ शकता. पण ही पावर नॅप २० मिनिटांपेक्षा जास्त नको.

१३. सकाळी जास्त वेळ झोपणे :

 

sleeping-inmarathi05
thelist.com

हे देखील आपण रात्री झोपण्याआधी नाही करत तरी त्याचा प्रभाव तुमच्या रात्रीच्या झोपेवर होतो. सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे रात्री वेळेवर झोपा आणि सकाळी वेळेवर उठा…

१४. झोपण्याआधी टीव्ही पहाणे :

 

sleeping-inmarathi16
gettyimages.co.uk

अनेकांना रात्री झोपण्याआधी टीव्ही बघण्याची सवय असते. दिवसभराचा थकवा विसरण्यासाठी जेवण झाले की लगेच अंथरुणावर पडून आपण टीव्हीवर आपला आवडता कार्यक्रम बघत असतो. पण ही सवय चुकीची आहे. यामुळे तुम्ही तुमचा आवडता कार्यक्रम बघण्यात व्यस्त होऊन जाता आणि तुम्हची झोप नाहीशी होते. त्यानंतर तुम्हाला लवकर झोप येणार नाही.

१५. पाळीव प्राण्यांना जवळ घेऊन झोपणे :

 

sleeping-inmarathi17
google.com

पाळीव प्राण्यांना जवळ घेऊन झोपणे बंद करा. ही सवय तुमच्या झोपेकरिता चांगली नाही. पाळीव प्राणी जसे की कुत्रा, मांजर हे रात्रभर हालचाल करत असतात, त्यामुळे त्यांना जवळ घेऊन झोपल्याने तुमची झोपमोड होत राहील आणि तुम्हाला हवी तेवढी आणि चांगली झोप मिळणार नाही.

सुखाची आणि शांत झोप हे देखील आपल्याआरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे वरील गोष्टी टाळा आणि निवांत झोपेचा आनंद घ्या…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “रात्र नीट जावी असं वाटत असेल, तर ह्या १५ गोष्टी करणे टाळा

  • January 31, 2018 at 12:57 pm
    Permalink

    धन्यवाद खुप चांगली माहिती मिलाली

    Reply
  • October 22, 2018 at 8:48 pm
    Permalink

    धन्यवाद खूप चांगली माहिती सांगितली आपण

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *