नेपाळमधे “Energy Emergency” – भारत भागवणार नेपाळची विजेची अर्धी गरज

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

nepal-pm-k-p-sharma-oli-bccl-marathipizza
खड्ग प्रसाद शर्मा ओली, नेपाळचे पंतप्रधान (स्त्रोत, Economic Times)

नेपाळमधे वीज टंचाई निर्माण झाली आहे. इतकी – की रोज 13 तासांचं भार नियमन (लोडशेडिंग) करावं लागत आहे. परिणामस्वरूप – नेपाळमधे उर्जा-आणीबाणी, Energy Emergency, लागू करण्यात आली आहे.

नेपाळचे ऊर्जामंत्री टोपबहादुर रायमाझी म्हणाले आहेत :

“ऊर्जा टंचाईवर मात करण्यासाठी ही आणीबाणी लागू करण्यात आली आहे.”

गेल्या 8 वर्षात ऊर्जा आणीबाणी लागू करण्याची ही तिसरी वेळ आहे.

ह्यावर तातडीने उपाय म्हणून नेपाळ सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत, ज्यातील एक आहे – भारताकडून गरजेच्या ५०% वीज आयात करणे.

नेपाळ प्रशासनाच्या आखणीनुसार येत्या दोन वर्षात सौर आणि पवन ऊर्जेच्या स्त्रोतांद्वारे ऊर्जेची टंचाई संपवण्यात येणार आहे. त्याच बरोबर जल-विद्युतद्वारे वीज निर्मितीत भर घालण्यात येणार आहे.

ह्याच plan नुसार, गरजेच्या 50% वीज भारताकडून आयात करून येत्या वर्षभराची विजेची भूक भागवण्यात येणार आहे. नेपाळी सरकारनुसार पुढील 2 वर्षात नेपाळ भार नियमनापासून पूर्णपणे मुक्त होणार आहे.

nepal marathipizza

स्त्रोत

सध्या नेपाळला 1400 MW इतकी विजेची गरज आहे. त्यांची जल-विद्युत निर्मिती फक्त 300 MW आहे – परंतु तब्बल 83,000 MW एवढी जलविद्युत निर्मिती करण्याची नेपाळची क्षमता आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 203 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?