‘नेकी की दुकान’- येथे कोणतीही वस्तू केवळ १० रुपयाला मिळते!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखाचं शीर्षक थोडं अविश्वसनीय वाटलं असेल ना? कारण एवढ्या महागाईत एवढी स्वस्ताई येणं तसं मुश्कीलच! पण खरंच असं एक दुकान आपल्या भारतात आहे जेथे कोणतीही वस्तू (त्या दुकानात असणारी बरं का!) केवळ १० रुपयाला दिली जाते. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे कोणाही माणसाला अशीच १० रुपयामध्ये वस्तू दिली जात नाही, ज्या माणसाला खरंच गरज आहे, किंवा जो गरीब आहे आणि ज्याच्याकडे वस्तू खरेदी करायला पैसे अपुरे आहेत अश्या व्यक्तींनाच दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तू १० रुपयाला दिल्या जातात.

लुधियाना इंडस्ट्रीयल एरिया मध्ये एक नूर सेवा केंद्र या सामाजिक संस्थेने हे दुकान उघडलं आहे. कपडे, भांडी, खाद्यपदार्थ आणि इतर गरजेच्या वस्तू या दुकानात उपलब्ध आहेत. असा स्तुप्त उपक्रम चालवणाऱ्या या दुकानाचं नाव देखील अगदी साजेस आहे- नेकी की दुकान!

neki-ki-dukan-marathipizza

स्रोत

लुधियाना इंडस्ट्रीयल एरिया मध्ये काम करणारे गरीब कामगार या दुकानामधून रोजच्या गरजेच्या वस्तू घेऊन जातात. आता तुम्ही विचार करत असलं की एवढ्या कमी पैश्यांमध्ये जर वस्तू विकायला काढल्या तर फायदा काहीच नाही, मग नव्या वस्तू भरणार तरी कश्या?

तर ज्या नूर सेवा केंद्र या सामाजिक संस्थेमार्फत हे दुकान चालवलं जातं, त्यांना अनेक देणग्या मिळतात, तसेच आपल्या सारखे मध्यमवर्गीय लोक देखील वापरत नसलेल्या वस्तू दान करतात. त्यामुळे दुकानातील माल संपला असं कधीच होत नाही.

neki-ki-dukan-marathipizza01

स्रोत

तुम्हाला इराण देशात मशहद शहरामध्ये असणारी मधील ‘नेकी की दिवार’ (दीवार-ए-मेहरबानी) अर्थात मराठीत म्हणायचं झाल्यास माणुसकीची भिंत माहिती आहे का?

या शहरामध्ये एक भिंतआहे. या भिंतीवर शहरातील नागरिक त्यांच्या वापरात नसलेल्या वस्तू गरजू आणि गरीब लोकांसाठी अडकवून ठेवायचे. म्हणजे ज्याला कोणाला गरज आहे तो त्याला हवी ती वस्तू घेऊन जाऊ शकतो. याच संकल्पनेवर आधारलेलं आहे लुधियाना मधील ‘नेकी की दुकान’ अर्थात माणुसकीचं दुकान!

neki-ki-dukan-marathipizza02

स्रोत

या दुकानाचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे गरिबांची निस्वार्थ मनाने सेवा करणे, त्यामुळे दिवसात कोणीही गरजू जाऊन या दुकानातील वस्तू १० रुपयाला खरेदी करू शकतो. हे दुकान जेथे उघडण्यात आले आहे त्या दुकानाचे भाडे देखील जागेचा मालक घेत नाही. त्यांनी स्वत:च्या इच्छेने हे दुकान नूर सेवा केंद्र या सामाजिक संस्थेला दान केले आहे.

जर तुम्हाला देखील या समाजसेवी चळवळीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही 76967 31000 या क्रमांकावर संपर्क साधून काही वस्तू दान देऊ शकता अथवा तुम्हाला जमेल तशी मदत करू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?