पंडित जवाहरलाल नेहरू आणि CIA मधील गुप्त करार, जो जगाला माहिती नव्हता

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतीय इतिहास आणि राजकारण यांची खडान खडा माहिती ठेवणाऱ्यांना देखील ही गोष्ट माहिती नसेल आणि आता जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेच्या CIA ला काही खास परवानग्या दिल्या होत्या. एक गुप्त करारच जणू.

अजूनही विश्वास बसत नाहीये?

 

Brife History Pandit Nehru InMarathi 13
The Hindu

चला तर मग जाणून घ्या भूतकाळातील ही अज्ञात गोष्ट!

पंडित नेहरुंनी १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या (सीआयए) हेरगिरी करणाऱ्या विमानांना भारतीय हवाई तळ वापरण्याची परवानगी दिली होती. खरं तर या प्रकरणाशी निगडीत काही गोपनीय कागदपत्रे जोवर सार्वजनिक झाली नाहीत, तोवर असं काही घडलं होतं या बाबत कोणालाही माहिती नव्हती.

 

neharu-marathipizaa01
4.bp.blogspot.com

 

‘सीआयए’ने ही कागदपत्रे अचानक जाहीर केली होती. त्या कागदपत्रातील माहितीनुसार, ओडीशातील चारबतीया हा तळ वापरण्यासाठी सीआयएला देण्यात आला होता. भारत-चीन युद्धानंतर अमेरिकेने चारबतीया तळ इंधन भरण्यासाठी वापरला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी व भारताचे राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये याबाबत मंजूरी देण्यात आली होती.

चारबतीया येथील तळ दुसऱ्या महायुद्धानंतर वापरण्या‍त आला नव्हता. मात्र, परवानगी मिळाल्या नंतरही अमेरिकेला या तळाचा फार वापर करता आला नाही. हवाई तळाच्या दुरुस्तीसाठी भारताने बराच वेळ लावला. त्यामुळे थायलंडमधील ताखली येथे सीआयएने नवीन हवाई तळ उभारला.

 

charbatiya-marathipizza01
indiastrategic.in

‘सीआयए’ला यू-2 या टेहळणी विमानांसाठी हवाई तळ हवा होता. या विमानांचा वापर भारतीय भूभागात घुसलेल्या चिनी सैन्याची माहिती देण्यासाठी केला जात होता. या मोहिमेची सुरुवात २९ सप्टेंबर, १९६३ पासून चालू झाली होती. चारबतीया येथील मोहिम मात्र मे १९६४ मध्ये नेहरुंच्या मृत्यूनंतर थांबली. चारबतीया येथून पहिली मोहिम २४ मे १९६४ ला सुरु करण्यात आली.

मात्र यानंतर तीनच दिवसांत पंडित नेहरुंचे निधन झाले.

त्यानंतर डिसेंबर १९६४  मध्ये पुन्हा एकदा भारत व चीनमध्ये सीमारेषेवर तणाव उत्पन्न झाला होता. त्यावेळी ‘सीआयए’ने चारबतीया येथून टेहळणी विमानांद्वारे हवाई सर्वेक्षण करुन आवश्यक माहिती गोळा केली होती.

चीन युद्धानंतर भारताने अमेरिकेकडे मागितलेल्या लष्करी मदतीनंतर या हल्ल्याचे नेमके स्वरूप समजावून घेण्यासाठी ही मोहिम राबविण्यातत आली होती. परंतु, अमेरिकेला प्रत्यक्षात चीनच्या सैन्याने केलेल्या घुसखोरीचा नेमका अंदाज काढता आला नव्हता.

 

charbatiya-marathipizza02
2.bp.blogspot.com

चीन आणि रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेला भारतात हवाई तळ हवा होता. त्यामुळे अमेरिकेने दुहेरी हेतुने या मोहिमेला स्वीकृती दिली होती. वादग्रस्त भूमिचे सर्वेक्षण करण्यसाठी ताखली येथून बंगालचा उपसागर पार करुन यावे लागणार होते.

तत्कालीन ब्रह्मदेशावरुन या विमानांना उड्डाण करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे इंधन भरण्यासाठी चारबतीया तळावर विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली होती, असे सीआयएने जाहीर केलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट‍ करण्यात आले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?