चंद्रावर व्यवसाय करू बघणारा माणूस म्हणतोय: उद्योजकांनी स्वतःला देव समजावं!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अपयशी होणं म्हणजे शेवट नव्हे. आज हार पत्करावी लागल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पुढचा मार्ग कसा उभारावा आणि कंपनी कशी वाढवावी. जर तुम्ही इतिहास पहिला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक यशस्वी कंपनीला अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो.

हे बोलताहेत नवीन चंद्र जैन.

उत्तर प्रदेशामधील शामली जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला मुलगा आता चंद्राला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

नवीन चंद्र जैन हे सहसंस्थापक असलेली “मून एक्सप्रेस” कंपनी चंद्रावर आपलं रोबोट यान उतरवणार आहे…!

खाजगी कंपनीने चंद्रावर ‘पाय’ ठेवण्याची ही पहिलीच वेळ!

अमेरिकन सरकारने यासाठी कंपनीला लायसन्स देखील जारी करून दिलं आहे.

 

Navin Jain marathipizza 01

स्त्रोत

त्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांना विचारण्यात आलं असताना त्यांनी हा कंपनीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे असं सांगीतलं.

त्यांच्या या मुलाखती दरम्यान त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला:

“तुमच्या मते सर्वात यशस्वी उद्योजक कोण आहे?”

त्यांनी दिलेले उत्तर एकदम वेगळ्या धाटणीचं होते.

ईलॉन मस्क, रिचर्ड ब्रॅनसन, बिल गेट्स आणि मार्क झुकर्बर्ग ही सर्व अशी व्यक्तिमत्वं आहेत जी भविष्याची निर्मिती करत आहेत. त्यांच्यासारखे यशस्वी होण्याकरिता उद्योजकाला “परमेश्वर गंड” हवा. म्हणजेच परमेश्वरापेक्षा स्वत:वर विश्वास ठेवा. यशस्वी उद्योजक कधीच देवाचा धावा करीत नाही. त्यांना असं कधीच वाटत नाही की ‘आपण अपयशी झालो आहोत’, ते कधीही हार पत्करत नाही.

 

अश्या आत्मविश्वासी, धाडसी नवीन जैनजींच्या चंद्र-मोहिमेबद्दल थोडंसं जणू घेऊ या:

 

moon express marathipizza

 

मून एक्स्प्रेस.  २०१० साली, Bob Richards (अंतराळ उद्योजक) आणि Barney Pell (पूर्वाश्रमीचे NASA चे शास्त्रज्ञ!) ह्यांच्यासोबत स्थापन केलेली कंपनी.

ह्याच कंपनीतर्फे त्यांनी चंद्रावर बिझनेस सुरू करण्याची मोहीम आखली आहे.

मोहिमेचा खर्च : ५० मिलियन – म्हणजे ५ कोटी डॉलर्स.

म्हणजे, साधारण ३३५ कोटी रुपये.

कशाला करायचा एवढा खर्च?

ह्याचं उत्तर मोठं रोचक आहे.

नवीन म्हणतात :

आम्ही चंद्रावर जातो आहोत कारण तिथून भरपूर नफा मिळणार आहे…!

चंद्रावर सोनं, platinum च्या खाणी सुरू होऊ शकतात.

चंद्रावर हेलिअम-३ आहे, जो ऊर्जेचा स्वच्छ स्त्रोत आहे.

चंद्रावर पाणी आहे…जे अंतराळ सफरींसाठी अत्यंत आवश्यक असतं. आपण अंतराळयान, रॉकेट्स इ साठी इंधनचा साठा म्हणून चंद्राच्या किंवा चंद्राजवळ पृथ्वीच्या कक्षेचा (orbit चा) वापर करू शकतो. (ज्यामुळे इंधन, पैसा, वेळ ह्या सगळ्याचीच प्रचंड बचत होईल.

 

हे झालं बिझनेस लॉजिक – पण ह्या मागे एक मोठं आंतरराष्ट्रीय गणित आहे.

चंद्रावरील साधन-संपत्तीवर खाजगी हक्क दाखवता येऊ शकतो का?

उत्तर आहे – होय!

१९६७ च्या आंतरराष्ट्रीय करारानुसार, चंद्रावर कुठल्याही देशाचा हक्क नाहीये. पण – अमेरिकेने बनवलेल्या एका कायद्यानुसार, तुम्हाला चंद्रावर जे काही सापडेल – ते तुमचं असेल…!

ह्याचा आधार घेत नवीन म्हणतात –

चंद्र हा पृथ्वीचा आठवा खंड किंवा आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र असणार आहे. जिथे खाजगी उद्योजक तेल शोधतील किंवा मासेमारी करतील.

ह्या व्हिडिओमधे ह्या प्रोजेक्टची भव्यता कळते:

 

कुणासाठी भयावह…तर…कुणासाठी प्रेरणादायी…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 204 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?