एका भारतीय महिला डॉक्टरने तयार केलेत कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करणारे नॅनो-पार्टिकल्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

कॅन्सर हा एक अतिशय घातक असा आजार आहे. आणि ज्याच्या आयुष्यात हा आजार येतो त्याचं जीव अस्ताव्यस्त होऊन जातं. जगभरात ह्या कॅन्सर आजाराने अनेक लोक आपला जीव गमावतात. वेळ असता ह्या आजाराची माहित होत नसल्याने दिवसेंदिवस कॅन्सर ने जीव गमावणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे.

 

cancer-inmarathi01
chronicles.com

भारतात दरवर्षी कॅन्सर ह्या आजाराने मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या ही १० लाखाच्या वर पोहोचली आहे. एवढचं नाही तर नुकत्याच एक रिपोर्टनुसार २०३० सालापर्यंत कॅन्सर हा आजार जगभरातील ५५ लाख स्त्रियांना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

Breast-Cancer-Inmarathi
momjunction.com

म्हणूनच जगातील मोठमोठे संशोधक ह्या आजाराचा उपचार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी कित्येक प्रयोगही आजवर केले गेले. ज्यात सर्जरी, किमोथेरेपी आणि रेडीएशन इत्यादी समाविष्ट आहेत. पण ह्या उपचारांनी रोज्याच्या शरीरावर अनेक साईड इफेक्ट्स होत असल्याचे दिसून आले. ज्याचा ह्या रोग्यांना आजार बरा झाल्यावर देखील भोगावा लागतो.

 

banaras-hindu-university-inmarathi
visittnt.com

ह्यातच आता भारतात ह्या कॅन्सर रोगावर एक उपचार शोधण्यात आला आहे ज्याचा रोग्याच्या शरीरावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. ह्या शोधात केळीची पाने कॅन्सर रोगावर उपयोगी असल्याचं सिद्ध झालं आहे. हा रिसर्च BHU च्या डिपार्टमेंटल ऑफ मॉलिक्यूलर अॅण्ड ह्यूमन जेनेटिक्स च्या डॉ. गीता राय ह्यांच्या नेतृत्वात करण्यात आला. ह्या रिसर्चमध्ये असे सिद्ध झाले आहे की, नव्या पद्धतीने कॅन्सरचे सेल्स संपविल्या जाऊ शकतात आणि रोग्याचा जीव वाचविला जाऊ शकतो.

डॉ. गीता राय ह्यांनी केळीची पाने आणि सिल्व्हर नायट्रेट ह्यांच्यापासून असे नॅनो पार्टिकल्स तयार केले आहेत, जे कॅन्सरला ४० % नष्ट करण्यात सक्षम असतील. ह्या प्रयोगात नॅनो पार्टिकल्सला तयार केल्या नंतर तीन भागांत रिसर्च करण्यात आली.

 

cancer-inmarathi
d2v4vjmuxdiocn.cloudfront.net

सर्वात आधी ह्या नॅनो पार्टिकल्सला कॅन्सर सेल्समध्ये सोडण्यात आले. ह्या प्रयोगात नॅनो पार्टिकल्सने २४ ते ४८ तासांत ४० टक्के कॅन्सर सेल्स नष्ट केले होते. ह्यानंतर नॅनो पार्टिकल्सना नॉर्मल सेल्समध्ये टाकण्यात आले, ह्यावरून हे दिसून आले की, ह्या नॅनो पार्टिकल्समुले नॉर्मल सेल्सना कुठल्याही प्रकारचे नुकसान पोहोचले नाही.

डॉ गीता राय ह्यांच्या नुसार हे नॅनो पार्टिकल्स रोग्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम घडवून आणणार नाही.

कॅन्सर सेल लाईन आणि कॅन्सर ट्युमर वर करण्यात आलेली ही रिसर्च एक सकारात्मक रिझल्ट घेऊन आली. आता ह्या रिसर्चचा कॅन्सरशी लढण्याकरिता बनविण्यात येणाऱ्या औषधींमध्ये नक्की उपयोग होऊ शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?