केसगळतीच्या या अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका, नुकसान तुमचंच आहे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नसेल आणि एखाद्या व्यक्तीकडून त्या गोष्टीबद्दल तुम्हाला चुकीची माहिती जरी कळली तरी ती खरी वाटून आपण अगदी हवालदिल होतो. हीच गोष्ट जर केसगळती बाबत असेल तर मात्र आपली रात्रीची झोप देखील उडते. केसगळतीबाबत लोकांच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत आणि हे गैरसमज लोकांच्या मनात अधिक भीती उत्पन्न करतात. केसगळतीच्या अफवांबद्दलची हीच भीती दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या अफवांमागचं सत्य सांगणार आहोत.

 

hair-loss-marathipizza

स्त्रोत

एसी रूम मध्ये बसल्याने केसगळती होते

 

hair-loss-marathipizza01

स्त्रोत

लोकांच्या मनातील हा सर्वात मोठा गैरसमज आहे. पण हे अजिबात सत्य नाही. एसी मुळे  तुमचे केस रुक्ष होतात अथवा कोरडे होतात हे खरे, पण त्यामुळे केसगळती होते असे अजून तरी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

 

दरोरोज केस गळत असतील तर तुम्हाला टक्कल पडणार

 

hair-loss-men02

स्त्रोत

हा जावईशोध कोणी लावला देवच जाणे! दिवसाला १०० केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे हे लक्षात घ्या. हो पण जर त्यापेक्षा जास्त केस गळत असतील तर मात्र तज्ञांना एकदा दाखवेलेले बरे!

 

केस मऊ किंवा सरळ केल्यास (केसांची रचना बदलल्यास) केस गळतात

 

hair-loss-men03

स्त्रोत

केस मऊ किंवा सरळ करण्यासाठी आपण वापरतो हेअर प्रोडक्ट! या हेअर प्रोडक्टच्या वापरामुळे केस गळायला सुरुवात होते हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. अर्थात, चांगल्या प्रतीचं हेअर प्रोडक्टच वापरा. अन्यथा ही गोष्ट सत्यता घडायला जास्त वेळ लागणार नाही.

 

टक्कल केल्यावर चांगले आणि जास्त केस येतात

 

hair-loss-men04

स्त्रोत

ही एक प्रसिद्ध अफवा आहे जी आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळते. पण असं काहीच घडत नाही. टक्कल केल्याने तुम्हाला जास्त केस येत नाहीत. तुम्ही केस जेवढे वाढवाल तेवढे ते वाढतील जसे आहेत तसे!

 

केसगळती थांबवण्यासाठी काहीही उपाय नाही

 

hair-loss-men05

 

तंत्रज्ञान इतकं प्रगत झालय की आता केसगळतीवर कायमचे उपाय करता येतात. त्यामुळे कोणी सांगितलं की केसगळती वर काहीही उपाय नाही, तर त्याच्या बोलण्याने चिंतीत होऊ नका आणि त्याच्या बोलण्याक्कडे अजिबात लक्ष देऊ नका.

आता विचाराल, केस गळतीवर उपाय कोणते?!

ते पुढील लेखात! 🙂

===

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?