या मंदिरात जो रात्री थांबतो तो दगडाचा होऊन जातो

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतात कित्येक अशी ठिकाणं आहेत जिथलं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही. आपल्या देशात अनेक आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतात. अशाच एका मंदिराबद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जिथे माणसं दगडाची बनून जातात.

InMarathi Android App

 

kiradu-temple-inmarathi03
ajabgjab.com

राजस्थान मध्ये एक असे मंदिर आहे, तिथे जर कोणी रात्री थांबलं तर तो माणूस दगड बनून जातो. यामुळे या मंदिरात दिवसा तर लोकं असतात पण रात्री हे मंदिर पूर्णपणे सुनसान होऊन जाते. या मंदिराची शिल्पकला तुमचं मन मोहून घेईल. एवढी सुंदर शिल्पकला असलेल्या या मंदिराला आजही हवी तेवढी लोकप्रियता मिळालेली नाही.

 

kiradu-temple-inmarathi
sulekhalive.com

या मंदिराला किराडू मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात आहे.

 

kiradu-temple-inmarathi07
buzzaaena.com

या मंदिराची शिल्पकला एवढी आकर्षक आहे की याला राजस्थानचे खजुराहो देखील म्हटले जाते. पण दुर्दैवाने या मंदिराला मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिराएवढी लोकप्रियता नाही मिळाली. हे मंदिर कित्येक वर्षांपासून असंच सुमसाम आहे.

 

kiradu-temple-inmarathi06
speakingtree.iimg.in

या मंदिरात रात्र काढणारा माणूस दगड होऊन जातो, असे मानले जाते. असं म्हणतात की, एका ऋषींच्या श्रापामुळे हे मंदिर आणि येथील गाव हे मागील ९०० वर्षांपासून सुमसाम आहे.

 

kiradu-temple-inmarathi08
gyanpanti.com

शेकडो वर्षांआधी या गावात एक ऋषी त्यांच्या काही शिष्यांसोबत आले होते. या ऋषींनी त्यांच्या शिष्यांना मंदिरात राहण्यास सांगून ते देशभ्रमंती करिता निघून गेले. जेव्हा ते ऋषी या मंदिरात परतले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांच्या शिष्यांची प्रकृती खूप खराब झाली आहे.

त्यांच्या शिष्यांची अशी अवस्था असून देखील गावातील कोणीही त्यांची मदत केली नाही हे बघून ऋषी संतापले. तेव्हा त्यांनी रागात येऊन या गावाला श्राप दिला की,

‘जिथल्या लोकांचे मन दगडाचे आहेत, ते मनुष्य म्हणून राहण्या योग्य नाही, त्यामुळे येथील सर्व लोकं दगडाचे होऊन जातील.’

पण गावातील एका महिलेने ऋषींच्या शिष्यांची मदत केली होती. त्यामुळे ऋषींनी त्या महिलेवर दया दाखवली आणि तिला हे गावं सोडण्यास सांगितले. ते महिलेला म्हणाले की,

‘तू सायंकाळ व्हायच्या आत गावं सोडून दे आणि जाताना मागे वळून बघून नकोस.’

त्या महिलेला ऋषीचे म्हणणे खोटे वाटले म्हणून तिने मागे वळून पाहिले आणि ती देखील दगडाची बनली. त्या महिलेची दगडरुपी मूर्ती आजही त्या मंदिरापासून थोड्या अंतरावर बघायला मिळते. त्यानंतर जो कोणी या गावात सायंकाळ नंतर थांबायचा तो दगड बनून जायचा.

 

kiradu-temple-inmarathi01
lonelyplanet.in

म्हणूनच या मंदिरात दिवसा तर लोकं दिसतील पण येथे रात्री कोणीही थांबत नाही. दगड होण्याच्या भीतीने सायंकाळ होताच हा परिसर पूर्णपणे निर्जीव होऊन जातो.

या किराडू मंदिराची निर्मिती १०-११ शतकात झाली असल्याचं सांगितल्या जातं पण ते कोणी बनवलं याबद्दल काही ठोस माहिती नाही. पण येथे अनेक राजघराण्यांनी राज्य केलं.

 

kiradu-temple-inmarathi04
travelblog.org

इतिहासकारकांच्या मते एकेकाळी या ठिकाणी सर्व सुख-सुविधा होत्या. इतर गावांप्रमाणे हे गावं देखील एक परिपूर्ण गावं होते. पण मुगलांच्या आक्रमणानंतर हे गावं निर्जीव झाले, मात्र मुगलांनी १४ व्या शतकात आक्रमण केले होते असं सांगितलं जातं. पण हे गाव १२ व्या शतकापासूनच निर्जीव होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *