' या मंदिराचा ‘तो’ दरवाजा एक ‘सिद्ध’ पुरुषच उघडू शकतो – नेमकं काय दडलंय त्यामागे? – InMarathi

या मंदिराचा ‘तो’ दरवाजा एक ‘सिद्ध’ पुरुषच उघडू शकतो – नेमकं काय दडलंय त्यामागे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या भारत देशाला देवांचा, संतांचा अद्भुत वारसा लाभला आहे. आपल्या भारत देशात अनेक मंदीरं आहेत, प्रत्येक राज्याच्या मंदीरांची ओळखही वेगळी बघायला मिळते.

त्या मंदीरांची ठेवण, तिथल्या मुर्ती, तिथल्या पुजाअर्चना, पध्दती, अश्या अनेक गोष्टी प्रांत निहाय वेगवेगळ्या असतात.

केरळात असंख्य मंदीरे आहेत, तसेच प्रत्येक मंदीराची आपली एक कहाणी देखील आहे. तिरूवनंतपुरम येथील पद्मनाभ मंदीर देखील एक असेच मंदीर आहे.

हे मंदिर त्याच्या विष्णूच्या भव्य मूर्तीमुळे आणि तेथील अमाप संपत्ती मुळे सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे.

पद्मनाभ मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे ज्याची दखल खुद्द ‘फोर्ब्स’ मॅगझीन ने घेतली आहे.

 

padmanabh mandir inmarathi
outlookindia.com

 

पद्मनाभ मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे जिथे २०० मशीन गन धारी सैनिक २४ तास गस्त घालून असतात.

काय आहे इथल्या खजिन्याचे गूढ? किती आहे इथली संपत्ती? चला तर मग जाणून घेऊया या बद्दल इत्यंभूत माहिती..!

पद्मनाभ मंदिर :

केरळमधील तिरुवनंतपुरम शहरामध्ये भगवान विष्णू चे पद्मनाभ मंदिर आहे. ह्या मंदिरात भगवान विष्णूची शेषनागावर झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे.

ही मूर्ती इतकी मोठी आहे की पूर्ण मूर्ती ही तब्बल ३ खोल्यात असून भगवान विष्णूचे दर्शन एकदम शक्य नाही.

ह्या मंदिराची स्थापना अंदाजे ५००० वर्षांपूर्वी त्रावणकोर च्या महाराजांनी केली होती.

 

padmanabh swamy inmarathi
pinterest.com

 

ह्या मंदिराचा उल्लेख, भागवत पुराण, स्कंद पुराण, मत्स्यपुराण विष्णू पुराण, रामायण आणि महाभारतात आढळतो.

हे मंदिर वैष्णवपूराणात सांगितलेल्या १०८ दिव्य स्थळांपैकी एक मानले जाते.

मंदिरातील संपत्ती :

इसवी सन १९३१ मध्ये ह्या मंदिरातील तळघरात अमाप संपत्ती असल्याचा शोध लागला आणि तेव्हा पासून ह्या खजिन्याची ओढ सर्वांना लागली.

आत किती सोनं असेल, किती हिरे असतील, जड जवाहिर असतील, असा विचार मंदिराची कमिटी आणि गावचे नागरिक करू लागले.

नंतर काही संपत्ती कोणीतरी चोरत असल्याचा संशय आला. त्यानुसार कमिटी वर कायदेशीर चौकशी सुरू झाली.

मग २०११ मध्ये सुप्रीम कोर्टाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करीत असताना ह्या मंदिराच्या संपत्तीचे मोजमाप करण्याचे आदेश दिले.

 

supreme court inmarathi
sci.gov.in

 

केंद्र आणि राज्य सरकार ने या बाबत त्वरित एक कमिटी स्थापन करून इथल्या संपत्तीचे मापन सूरी केले आणि मग जे झाले आणि जे पाहिले त्या नंतर अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

सोनं, हिरे, दाग दागिने यांची खाण :

येथील मंदिराच्या तळघरात ६ खजिने आढळून आले जे लोखंडी दाराने बंद केलेले होते. ह्या दरवाज्याना A, B, C, D, E, F अशी नावे देण्यात आली.

ह्या सहा पैकी ५ दरवाजे उघडून त्यातील खजिना मोजण्यात तज्ज्ञांना यश आले. हा खजिना तब्बल एक लाख करोड च्या घरात आहे.

ह्यात नेपोलियन, डच, मुघल काळातील असंख्य सोन्याचे कॉइन्स, भगवान विष्णूची सोन्याची साडे तीन फुटी भव्य मूर्ती, ह्या मूर्तीवर वेगवेगळे हिरे आणि दागिने आहेत.

१८ फूट लांबीच्या सोन्याच्या कित्येक चैनी, सोन्याचे अनेक ताट, वाट्या, समयी, सोन्या चांदी चे असंख्य भांडे, अनेक दागिने, सोन्याचे मुकुट असा भरमसाट खजिना सापडला.

 

gold inmarathi
forbes.com

 

हा खजिना मोजायला बाहेर काढण्यासाठी १५ माणसं तब्बल दिवसभर काम करीत होते, यावरून तुम्हाला किती मोठा खजिना आहे ह्याचा अंदाज येईल.

हा आजवर सापडलेला सर्वात मोठा असा गुप्त खजिना आहे.

गुप्त दरवाजा आणि न उघडलेला खजिना :

ह्या सात दरवाज्या पैकी ५ दरवाजे यशस्वी रित्या उघडले परंतु सहावा दरवाजा आजवर कुणीही उघडू शकले नाही. सहाव्या तळघराशी संबंधित एक कथा सांगितली जाते.

असे म्हणतात, की सुमारे १३६ वर्षांपूर्वी, तिरुवनंतपुरम येथे भयंकर दुष्काळ पडला.

तेव्हा मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, तळघराच्या आतून पाण्याचा अतिशय गतिमान प्रवाह वाहत असल्याचे आवाज कानी आले.

हे ऐकून कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचे प्रयत्न थांबविले. हे तळघर अरबी समुद्राशी जोडले गेले असल्याची देखील काहींची मान्यता आहे.

 

arabain sea inmarathi
en.wikipedia.org

 

त्यामुळे ह्या तळघराचा दरवाजा उघडला गेला, तर समुद्राचे पाणी तळघरामध्ये शिरून जलप्रलय येईल, आणि सर्व संपत्ती त्यामध्ये वाहून जाईल असा ही समज आहे.

गुप्त दरवाजा, नागबंध आणि गरुड मंत्र :

ह्या न उघडलेल्या तळघराला तीन दरवाजे असून, पहिला दरवाजा लोखंडाचा आहे. दुसरा भक्कम दरवाजा लाकडी असून, तिसरा आणि शेवटचा दरवाजा देखील भक्कम लोखंडाचा बनविलेला आहे.

पहिल्या दरवाजा नागबंधाने बंद केलेला असून तो उघडणे एका सिद्ध पुरुषाला च शक्य आहे. ह्या दरवाजावर सर्प कोरलेले आहेत जे धोक्याचं चिन्ह दर्शवितात.

भारतीय पुराणात असे म्हणतात की गरुड आणि सर्प हे एकमेकांचे शत्रू आहेत. एका सिद्ध पुरुषाने जर अत्यंत शुद्ध वाणीत साळंकृत पणे गरुड मंत्राचा जाप केल्यास हा दरवाजा सहज उघडू शकेल!

 

padmanabh inmarathi
ancientorigins.net

 

मोठमोठ्या साधूंनी अथक प्रयत्न करून ही हा दरवाजा उघडणे अजून ही शक्य झाले नाही.

गुप्त दरवाजा हा मृत्यू चे द्वार? साक्षात शेषनाग करतात खजिन्याचे रक्षण :

हा गुप्त दरवाजा उघडण्याचा कुणी ही साधारण मनुष्याने प्रयत्न केल्यास त्याचा त्वरित मृत्यू होतो असे म्हणतात.

दरवाजा उघडण्याच्या प्रयत्नात अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे बोलले जाते.

ह्या संदर्भातील, १९३० साली एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली हकीकत भयावह आहे.

एमिली गिलख्रिस्ट हॅच ह्या लेखिकेच्या म्हणण्यानुसार १९०८ साली जेव्हा काही लोकांनी सहाव्या तळघरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथे त्यांना अनेक फणे असलेला महाकाय नाग दृष्टीस पडला.

 

sheshnaag inmarathi 2
punjabkeasari.in

 

त्याचबरोबर अनेक लहान मोठे सर्प ह्या तळघरापाशी होते. तो महाकाय नाग बघून सहावे तळघर उघडण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनी घाबरून जाऊन तेथून पलायन केले.

मित्रांनो, हा सहावा दरवाजा, न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक आहे. आम्हाला अभिमान आहे की आपला देश अशा अद्भुत इतिहासाचा आणि अश्या गूढ मंदिराचा वारसा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?