‘अंडी’ देणाऱ्या एका खडकाने वैज्ञानिकांची झोप उडवली आहे

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

या जगात रहस्यांची काही कमी नाही. हे संपूर्ण जगच रहस्यमयी आहे… मग तो पृथ्वीच्या पोटातील लाव्हा असो नाहीतर अंतराळातील एलियन. आपला निसर्ग म्हणजे रहस्यांची खाणच. यातील कित्येक रहस्ये आपण सोडवलीत तर कित्येक रहस्ये अजूनही आपल्याला सोडवता आलेली नाही. यातच आणखीन नवनवीन रहस्यांचा समावेश होत चालला आहे. या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही न काही वैज्ञानिक कारण असतं, त्याला विज्ञान जबाबदार असते असे आपण मानतो आणि त्यामागील विज्ञान काय हे स्पष्ट करून देऊन वैज्ञानिक या जगात रहस्यमयी असे काही नसतं हे सिद्ध करत असतात. पण तरीदेखील या निसर्गाने अजूनही आपल्या पोटात अशी काही रहस्ये लपवून ठेवली आहेत ज्याच्या मागील वैज्ञानिक कारण शोधता शोधता वैज्ञानिकांच्या नाकीनऊ आले.

china mysterious cliff04-marathipizza
dwnews.com

आज आम्ही तुम्हाला अश्याच एका रहस्यमयी किंवा न सोडवलेल्या गेलेल्या कोड्याबद्दल अवगत करवून देणार आहोत. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल…

china mysterious cliff03-marathipizza
AsiaWire

चीनच्या कियान्नान बुयेई मियाओ भागात एक असा खडक आहे ज्याने कित्येक वैज्ञानिकांची झोप उडवली आहे.  २० मीटर लांब व ६ मीटर उंचीचा हा खडक दर ३० वर्षांनी दगडाची अंडी बाहेर टाकतो. आता तुम्ही म्हणालं काहीही काय सांगता, तर हे अगदी खरं आहे. आपल्याला माहित आहे की, सजीव प्राणी-पक्षी अंडी देतात पण काय एक खडकही अंडी देऊ शकतो..? तर या खडकाला बघितल्यावर याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. चला तर मग जाणून घेऊ काय आहे या खडकाच्या अंडी देण्यामागील कहाणी आणि त्या कहाणी मागील गूढ रहस्य…

china-mysterious-cliff-marathipizza
AsiaWire

स्थानिक लोक याला दैवीय चमत्कार मानतात. त्यांच्या मते ही अंडी सुरवातीला एका कवचाच्या आत असतात. काही दिवसांनी ही अंडी जमिनीवर पडतात. हे खडक चीनच्या दक्षिण-पश्चिम गुझउ बुइए आणि मिआओ ऑटोनोमू या परिसरात आहेत. या खडकाला ‘Chan Dan Ya’ या नावाने ओळखल्या जात. तसेच याला ‘egg-producing cliff’ देखील म्हणतात. वैज्ञानिक पण हैराण आहेत की दर ३० वर्षांनी कसे काय हे खडक ‘अंड रुपी खडक’ बाहेर टाकते. जेव्हा हे नवीन खडक निघतात तेव्हा गावातील लोक यांना आपल्या घरी घेऊन जातात, त्यांच्यामते याने त्यांच्या घरी समृद्धी येते.

china mysterious cliff01-marathipizza
AsiaWire

वैज्ञानिकांनी लावलेल्या संशोधनानुसार हे खडक ५०० मिलियन वर्षाआधी कैमब्रीयन पिरीयडमध्ये माउंट गैनडेंग पासून  पासून बनले आहे. हे  मुख्यत्वे काळे आणि थंड खडक आहेत, जे जगातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. भू-वैज्ञानिकांच्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. त्यांच्यामते पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे या खडकाच्या संरचना आणि तिच्यातील तत्वांमध्ये बदल घडून आला असेल. हेच कारण आहे की, यावर विविध आकृत्या दिसून येतात. पण, या आकृत्या अगदी अंडाकार कशा बनतात यावर संशोधन चालू आहे.

china mysterious cliff02-marathipizza
AsiaWire

असे ३० वर्षांतून एकदाच होणे हे आश्चर्यकारक आहे. तेथील स्थानिक लोक या खडकांना गुड लक मानून घरी घेऊन जातात म्हणून आतापर्यंत केवळ ७० खडक वाचविण्यात सरकारला यश आले आहे, तर इतर चोरी झालेत आणि काही गायब झालेत असे सांगण्यात येते.

तरी देखील या खडकाच्या अंडी देण्यामागील गूढ अजूनही कायमच आहे… 

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?