काय आहे ‘१०८’ या अंकामागे लपलेले गुपीत…?

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

१०८ हा अंक धार्मिक जीवनामध्ये खूप महत्त्वाचा अंक म्हणून ओळखला जातो. १०८ हा अंक खूप धार्मिक गोष्टींशी निगडीत आहे. बंगाली संस्कृतीमध्ये १०८ कमळ आणि १०८ दिवे हे दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गापूजा करण्यासाठी वापरले जातात. हिंदू आणि बौद्ध धर्मांमध्ये जप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जपमाळेमध्ये देखील १०८ मणी असतात. त्यामुळे अश्या अनेक मार्गांनी १०८ हा अंक आंतरिक रूपाने आपल्या संस्कृतीशी आणि जीवनाशी निगडीत आहे.

InMarathi Android App

पण तुम्ही असा कधी विचार केला आहात का – की नेहमी १०८ हाच अंक का वापरला जातो?

धर्म शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनुसार, हा अंक प्राचीन आणि आधुनिक जीवनाशी निगडीत आहे. अर्थात, ह्या गोष्टी “मानल्या” जाणाऱ्या आहेत…आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर ह्या मान्यता उत्तीर्ण होतात का, हा मोठाच प्रश्न आहे.

असो. जाणून घेऊया या अंका विषयी काही वैशिष्ट्यपूर्ण समज.

===
===

१. वैदिक विश्वाच्या मते, १०८ हा सर्व निर्मितीचा पाया आहे.

१०८ या नंबरच्या आधारे असे मानले जाते की, एक हा देवाच्या चेतनेला सूचित करते, तसेच शून्य हे निरर्थक याबद्दल संबोधित करते आणि आठ हा अंक गणिताच्या संदर्भात आहे. म्हणून १०८ हा अंक आपण काय आहोत याबद्दल सर्वकाही सांगतो.

108 marathipizza01
4.bp.blogspot.com

 

२.वेगवेगळ्या धर्मांमध्ये १०८ अंकाचे महत्त्व वेगवेगळे आहे. तिबेटीन भिक्षूंच्या प्राचीन काळातील जपमाळेमध्ये देखील १०८ मणी असल्याचे निदर्शनास आले आहे.

तिबेटन संस्कृतीमध्ये भिक्षूंच्या चिंतन करण्याचे १०८ वेगवेगळे आहेत. तसेच प्रसिद्ध Gandjour मध्ये सुद्धा १०८ ध्यान करण्याच्या १०८ पद्धती आहेत.

108 marathipizza02
photographyblogger.net

 

३.जगातील फक्त प्रमुख धर्मच नव्हे तर चीनमधील गूढ आणि पुरातन समाजही या अंकाला शुभ मानतात.

हंग लीग यामध्ये  सुद्धा १०८ हा क्रमांक शुभ असल्याचे सांगितले गेले आहे.

 

108marathi pizza
archive.org

 

४. विविध धर्मीयांसाठी महत्वाचा आकडा!

 

108 marathipizza03
3.bp.blogspot.com

भारतात हिंदू धर्मातच नाही तर जैन, शीख आणि बौध्द धर्मांमधील बहुतेक धार्मिक विधी या संख्येशी जोडलेल्या आहेत, हे लोक सुद्धा या संख्येला शुभ मानतात.

 

५. हिंदू ज्योतिष शास्त्रामध्ये देखील १०८ या संख्येचे विशेष महत्त्व आहे.

 

108 marathipizza04
punditjunction.com

 

६. बौद्धस्तूपावर १०८ चित्रं

 

108 marathipizza05
holyimages.net

काठमांडू हे शहर तुम्हाला माहित असेलच, या भागात सर्वात जास्त बौध्द धर्माचे लोक राहतात. तेथील बोधनाथ (बौधनाथ) या मंदिराच्या स्तूपावर बुद्धांची १०८ चित्रे काढण्यात आली आहेत.

७. माणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या १०८ भावना असतात असेही गृहीत धरले जाते.

 

108 marathipizza07
az616578.vo.msecnd.net

 

८. देवावर विश्वास असणाऱ्या व्यक्ती मानतात की, देवाला प्रसन्न करण्याचे १०८ मार्ग असतात.

 

108 marathipizza08
blog.onlineprasad.com

 

९.  हिंदू मान्यतेनुसार महादेवाच्या पिंडीवर १०८ बेलपत्रे वाहिल्याने महादेव प्रसन्न होत असल्याचा समज आहे. 

 

===
===
shivling-marathipizza
flickriver.com

 

१०. जगातील सर्वात प्रसिद्ध प्रागैतिहासिक स्मारकांपैकी एक असलेला सार्सेन सर्कल स्टोनहेंजचा व्यास १०८ मीटर आहे.

 

108 marathipizza09
www.anglophile.ru

 

थोडक्यात, १०८ हा आकडा अनेक धर्म, संस्कृतींमध्ये महत्वाचा मानला जातो. असं का – ह्याची सर्वसंमत उत्तरं मात्र अजून कळायची आहेत. कारण – आधी म्हटल्याप्रमाणे – विज्ञान अजूनही ह्या श्रद्धांना “सत्य” मानायला तयार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “काय आहे ‘१०८’ या अंकामागे लपलेले गुपीत…?

  • August 13, 2017 at 12:28 pm
    Permalink

    108 हा एक दैवी आकडा आहे। पण त्यामागे 9 हा आकडा पण दैवी आहे जसे की आपण जर 108 या अंकमधील 1+8 ची बेरीज केली तर आपल्याला 9 हा आकडा मिळतो। 9 ला कोणत्याही संख्येनं गुणले तरी त्याची बेरीज 9 च येते(उत्तरातील संख्येची बेरीज)।

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *