मंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 


हे अंतरिक्ष मनुष्यासाठी कधीही न सुटणारे कोडे बनले आहे. हे विश्व नेमकं आहे तरी किती मोठं? या विश्वात अजून एखादी जीवसृष्टी आहे का? अवकाशात लकाकणारी प्रत्येक गोष्ट स्वत:मध्ये काय सामावून आहे?

अश्या एक ना असंख्य प्रश्नांची उत्तरे प्रगत झाल्यापासून मनुष्य शोधतो आहे. एखाद्या उत्तराच्या निष्कर्षापर्यंत पोहोचावे तर मार्गात दुसरी एखादी शंका उपस्थित होते आणि संपूर्ण रहस्य उकलीचा बट्याबोळ होतो.

तरीही काही प्रतिभावंत शास्त्रज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या सहाय्याने मानवाने अगदी बेसिक पण महत्वाची अशी अनेक रहस्ये उलगडली आहेत. पण कोण जाणे अजून किती रहस्ये आपल्या पोटात दडवून हे अंतरिक्ष आपल्याला वाकुल्या दाखवतंय.

अश्याच प्रकारे एक ग्रह आपल्यात अनेक चक्रावून टाकणाऱ्या गूढ गोष्टी सामावून आपल्या जिज्ञासू वृत्तीची जणू परीक्षाच घेतोय. हा ग्रह म्हणजे मंगळ ग्रह.

mars-marathipizza01
nationalgeographic.com

या ग्रहावर गेल्या काळापासून अनेक बुचकळ्यात टाकणाऱ्या गोष्टी आढळल्या आहेत आणि मुख्य म्हणजे या गोष्टींचा काडीचाही सुगावा वैज्ञानिकांना लागलेला नाही हे नवल!

 

१) आयताकृती वस्तू


mars-marathipizza02
i.dailymail.co.uk

२०१२ मध्ये एका अंतराळ संशोधकाला विचित्र आयाताकृती वस्तू मंगळाच्या पृष्ठभागावर दिसली होती. त्याचा अजून उलगडा झालेला नाही. ही वस्तू ऑब्जेक्ट सुमारे ५ मीटर लांबीची होती. अशा प्रकारच्या अनेक विचित्र वस्तू मंगळाच्या पृष्ठभागावर आढळून आल्या आहेत.

 

२) मानवी प्रतिकृती

mars-marathipizza03
raphaelonline.com

मंगळाच्या पृष्ठभागावर मानवी आकाराची प्रतिकृती दिसून आली होती. याचेही रहस्य अजून गुलदस्त्यात आहे. त्यावरुन पडदा उघडलेला नाही

 

३) रहस्यमयी आकृती

mars-marathipizza04
huffpost.com

कारच्या आकाराचे नासाचे रोबोटीक रोव्हर जेव्हा मंगळावर उतरले तेव्हा काही मिलिसेकंदांसाठी कॅमेरा सुरु करण्यात आला होता. तेव्हा क्षितिजावर रहस्यमयी आकृती दिसली होती. दोन तासांनी हाय रिझोल्युशन फोटो घेतल्यावर मात्र ही आकृती गायब झाली होती.

 

४) महाकाय बोगदा

mars-marathipizza05
viewzone.com

२००७ मध्ये नासाच्या मार्स ऑरबिटरने हा महाकाय बोगदा शोधून काढला होता. त्यामागचे रहस्य अजूनही रहस्य आहे. तो कसा निर्माण झाला असावा, यासंदर्भात शोध सुरु आहे. सुमारे ४९० फुट रुंदीचा हा बोगदा आहे. यात जीवसृष्टीचे पुरावे सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

५) प्रकाशाची रेघ

mars-marathipizza06
i.dailymail.co.uk

३ एप्रिल २०१४ रोजी क्युरिऑसिटी रोव्हरला क्षितिजावर जमिनीकडून आकाशाकडे झेपावणारी प्रकाशाची रेघ दिसली होती. याचा उलगडा अद्याप झालेला नाही. स्टिरिओ कॅमेऱ्याच्या उजव्या डोळ्याने हा फोटो घेतला होता. परंतु, डाव्या डोळ्याने घेतलेल्या फोटोत प्रकाशाची ही रेघ दिसलेली नव्हती.

या रहस्यांचा सुगावा लावण्यात जगभरातील सर्वच अग्रगण्य अवकाश संस्था गुंतलेल्या आहेत. भारताच्या इस्रोने देखील एक मानवरहित यान मंगळाच्या कक्षेत पाठवले आहे. जे मंगळाची वेगवेगळ्या भागांची छायाचित्रे आपल्याला पाठवत असते.

हे यान पाठवण्यामागे मंगळ ग्रहाच्या लपलेल्या बाजूंचा शोध घेणे हा मुख्य उद्देश आहे. इस्रो प्रमाणे अमेरिका आणि रशिया यांनी देखील आपली याने मंगळ ग्रहावर पाठवून विविध कोनांतून छायाचित्रे मिळवली.

पण होतं असं की ही सर्व छायाचित्रे वेग्वागेली माहिती दर्शवतात. त्यामुळेच मंगळ ग्रहाचे नेमके रहस्य उलगडणे कठीण होऊन बसले आहे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 
One thought on “मंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही!

  • August 15, 2019 at 3:27 pm
    Permalink

    मंगल ग्रहाचे रहस्यं वाचून थक्क व्हायला होतं…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?