' हुकूमशाहीचं चित्र – गडद राजकीय पार्श्वभूमीचा ‘V For Vendetta’ – InMarathi

हुकूमशाहीचं चित्र – गडद राजकीय पार्श्वभूमीचा ‘V For Vendetta’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जुलमी राजवट, जाचक कायदे, हुकुमशाही, वाईट राज्यकर्ते…ह्यांची मानव जातीच्या इतिहासात कधीच कमी नव्हती.

चेंगीज खान पासून ते हिटलर, स्टॅलिन ते सध्या च्या उत्तर कोरियाचे किम जोंग ऊन सारख्या ना वेळोवेळी मानवी समाजा ने आपला नेता म्हणून खपवून घेतलं. ह्या विषया वर अनेक कथा, कादंबर्‍या, चित्रपट असतील पण George Orwell च्या ‘१९८४’ सारखी राजकीय भाष्य करणारी, भविष्याचा अंदाज घेणारी कथा ही त्यांच्यासाठी मोजपट्टी आहे. सर्वंकष सत्ता किंवा Totalitarian Regime अन् तशा प्रवृत्ती ऑर्वेल इतक्या चांगल्या पद्धतीने क्वचितच मांडल्या गेल्या असतील.

याच एकका मध्ये मोजला गेलेला अन् १९८४ शी बरीच साम्य स्थळे असलेला एक चित्रपट म्हणजे २००६ साली आलेला ‘V for Vendetta’.

आधी हे चित्रपटाचं ट्रेलर बघूया : V for Vendetta चं ट्रेलर

 Allen Moore च्या कॉमिक्स-कादंबरी वर आधारित असलेली ही कथा घडते भविष्यातील ग्रेट ब्रिटन मध्ये.

जैविक युद्ध, यादवी….या पार्श्वभूमी वर fascist वृत्तीचा पक्ष सत्तेत आलेला आहे. त्यांच्याकडून सत्ता टिकून राहण्यासाठी राजकीय विरोधक व इतर सर्व नको असलेल्या सर्वांना (जसे कि समलैंगिक, इतर धर्मीय, नास्तिक) आधी कैदेत अन् मग छळ छावण्यांमध्ये टाकले जाणे ओघाने आलेच. शत्रू-राष्ट्र, वंश, इतर संस्कृती, आदर्शवाद यांच्या आक्रमतेमुळे “आपल्याला धोका असल्याची भीती”, ही लोकांना आपले स्वातंत्र्य पणाला लावून fascist नेतृत्वाच्या मागे उभे राहायला लावू शकते – पण भविष्यात ही भीती पुरेशी असेलच असे नाही. म्हणूनच चित्रपटाला जैविक युद्धाच्या भीतीची पार्श्वभूमी आहे.

चित्रपटातील मध्यवर्ती पात्र V खरे तर एका अर्थाने बंडखोर, अराजाकातावादी वाटणारे, दमनकारी सत्तेच्या अन्यायाची प्रतीके असलेल्या इमारती उद्ध्वस्त करणारे आहे. ज्या विशिष्ट मास्कने त्याचा चेहेरा कायम झाकलेला असतो तो मास्क (मुखवटा) क्रांती आणणाऱ्या बंडाचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध झाला.

 

v-for-vandetta02-marathipizza

 

आधीच Gunpowder Plot या ब्रिटनच्या इतिहासातील बंडखोरीच्या सत्य घटने शी निगडीत असलेला हा ‘Guy Fawkes’ मुखवटा, या चित्रपटानंतर अनेक आंदोलन, मोर्चे, इत्यादी मध्ये सांकेतिक निषेध व्यक्त करण्यासाठी वापरला गेला.

त्यात दाखवलेला TV वरून कर्कश, अतिरेकी राष्ट्रवाद मांडणारा एक प्रचारक, माध्यमानांवर असलेले सत्ते चे नियंत्रण, विशेष करून सर्वोच्च नेत्यावर उपहासात्मक टीका सादर करणाऱ्या Talk Show host च्या अटकेचा प्रसंग…हे सगळं तुम्हाला विचारात पाडल्याशिवाय रहात नाही.

सुरूवातीस माथेफिरू वाटणारा हा मुखवट्या मागचा नायक, चित्रपटाच्या शेवटी अक्ख्या लंडनला क्रांती आणण्यासाठी उद्युक्त करण्यात यशस्वी होतो.

 

v-for-vandetta03-marathipizza

 

सर्वंकष सत्ता राबवण्यासाठी fascist वृत्ती कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यातून होणारा स्वातंत्र्याचा संकोच, अन् त्याची असंतोषात झालेली परिणती हे सर्व इतिहासात आहे तसेच भविष्यातही असू शकते – हा या चित्रपटाचा खरा आशय.

हुकुमशाही, fascism, वगैरे असलेल्या अशा प्रकारच्या dystopian स्वरूपाच्या कथा अगदी भविष्याचे भाकीत करून चिंतेत पाडत नसल्या तरी वर्तमानात, तुमच्या सभोवती समाजात अशा वृत्ती “असतात” हा विचार करायला भाग पाडतात.

अतिरिक्त बंधने स्वीकारण्याची किंवा fascist वृत्ती पुढे नमते घेऊन “तिची गरज आहे” असं मान्य करण्याची सुप्त प्रवृत्ती बऱ्याच वेळा दिसून येते. “असं का असावं?”, “मानवी मनाला हुकुमशाहीचं सुप्त आकर्षण का वाटावं?” ह्याचं उत्तर कदाचित मानसशास्त्रज्ञच देऊ शकतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?