ते गोमुत्राने अंघोळ करतात, इतकचं काय तर तिचं रायफल घेऊन रक्षणही करतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

गायीच्या गोमूत्राला गुणकारी मानले जाते. अनेक आजारांसाठी ते औषध म्हणूनही वापरले जाते.

या गोमुत्राचा उपयोग काही जण घर, वातावरण शुद्धीसाठी करतात. तसेच विविध शुभप्रसंगी ते शिंपडले देखील जाते इतके त्याचे महत्त्व! तर अश्या काही निवडक कार्यांव्यतिरिक्त आपण गोमुत्राचा वापर करत नाही.

पण समजा तुम्हाला म्हटलं की जगात अशी एक जमात आहे, ज्यातील लोक गोमुत्राने अंघोळ करतात तर….? तुमचा विश्वास बसेल का?

नाही ना? अहो पण ही अगदी खरी गोष्ट आहे विश्वास बसत नसले तर जाणून घ्याच!

 

mundari-trube-marathipizza01
photoshelter.com

ही आहे सुदानमधील मुंदारी नावाची जमात!

दक्षिण सूदानमधील युद्धामुळे मुंदारी आदिवासी जमात जगातून जवळपास नष्ट होण्याच्या  मार्गावर आहे. या युद्धात या जमातीचे ५०,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत.

त्यामुळे सध्या ही जमात नदीकिनारी वास्तव्य करून जीवन कंठत आहे. आधी या जमातीचे लोक दक्षिण सुदानची राजधानी झुबामध्ये राहायचे.

 

mundari-tribe-marathipizza02
acordinternational.org

गाय हा या जमातीच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, तर अगोदर सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की या जमातीचे लोक गोमुत्राने आंघोळ करतात.

कारण त्यांचे म्हणणे आहे असे केल्याने स्किन इन्फेक्शन होत नाही. ज्या भागात हे लोक राहतात त्याठिकाणी कडक उन्हामुळे आणि इतर कारणांमुळे स्किन इन्फेक्शनचा धोका असतो.

त्याचबरोबर अति उन्हापासून बचाव करण्यासाठी आणि मच्छर पळवून लावण्यासाठीही या जमातीचे लोक विचित्र पद्धतीचा वापर करतात. हे लोक राख पावडरप्रमाणे संपूर्ण शरिरावर लावतात.

 

mundari-tribe-marathipizza03
thisisafrica.me

गाय आणि बैल हे मुंदारी आदिवासींच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी हे लोक काहीही करू शकतात.

मोठ्या शिंगांच्या गायीचे रक्षण तर हे लोक रायफलने करतात असे ऐकिवात आहे.

 

mundari-tribe-marathipizza04
lifeforcemagazine.com

या जमातीचे लोक सकाळी उठल्यानंतर दात स्वच्छ करतात आणि त्यानंतर थेट गायीच्या कासेला तोंड लावून दूध पितात. त्यानंतर गायीच्या गोमुत्राने आंघोळही करतात.

नंतर ऊन आणि मच्छरांपासून बचावासाठी राख संपूर्ण शरिरावर लावतात. थेट गायीचे दूध पिण्याबरोबरच हे लोक खाण्यापिण्यासाठीही गायीवर अवलंबून असतात.

या जमातीचे लोक जगातील सर्वात उंच लोकांमध्ये गणले जातात. ते त्यांच्या पशुंना अंकोल-वातुसी असे म्हणतात.

 

mundari-tribe-marathipizza05
staticflickr.com

हे पशू पांढऱ्या रंगाचे आणि मोठ्या गोल शिंगांचे असतात. त्यांना कॅटल ऑफ किंगही म्हटले जाते. त्यांची शिंगे अंदाजे ८ फूट एवढ्या लांबीची देखील असतात.

या जमातीत सर्वांची एक फेव्हरेट गाय असते.

या लोकांसाठी पशू हे पैसे कमावण्याचे साधन, स्टेटस सिम्बॉल आणि हुंड्याचे साधन असते. या जमातीतील लोकांना संगीत आणि कुस्तीचीही आवड असते.

परंपरा आणि संस्कृती याचे कठोर पालन हे लोक करतात.

 

mundari-tribe-marathipizza06
lightgalleries.net

असं आहे हे…यावरून हेच दिसून येत की केवळ भारतातच नाही तर जगात देखील गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “ते गोमुत्राने अंघोळ करतात, इतकचं काय तर तिचं रायफल घेऊन रक्षणही करतात!

  • August 24, 2018 at 7:58 pm
    Permalink

    Knowledgeable article, every body should know COW’S role in human being…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?