अंबानीच्या घरचा कचरा फेकला जात नाही. मग काय केलं जातं त्याचं? वाचा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण नेहेमी बघत आलो आहोत की, प्रसिद्ध लोकांच्या लहान-सहान गोष्टींच्या देखील बातम्या होतात, त्यांच्या लहान-लहान गोष्टी देखील चर्चेचा विषय बनतात. तिथेच एका सामान्य माणसाला चर्चेत यायला खूप काही करावं लागतं. पण मोठ्या लोकांची तर गोष्टच वेगळी असते. आता तुम्ही म्हणालं की आम्ही हे सर्व का सांगत आहोत… कारण आम्ही मुकेश अंबानी यांच्या घरच्या कचऱ्या बद्दल बोलत आहोत.

 

anil-ambani-antilia-inmarathi
newstrend.news

हो… कचराच.

तसं तर मुकेश अंबानीच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या लाइफस्टाइल बद्दल तर आपण कुठे ना कुठे वाचलच असेल. पण त्यांच्या घरच्या कचऱ्याचं काय होतं माहिती आहे का?

 

mukesh-ambani-inmarathi02
bollywoodpapa.com

याआधी आपण मुकेश अंबानीच्या ड्रायव्हरची सॅलरी उघड करणारी न्यूज बघितली असेल, तसेच नीता अंबानीच्या शाही राहणीमानाचा देखील आढावा घेतलाच असेल. पण  यावेळी मुकेश अंबानीच्या घरच्या कचऱ्याची गोष्ट वायरल झाली आहे. असे सांगण्यात येत आहे की, मुकेश अंबानीच्या घरचा कचरा हा आपल्या घरच्या कचऱ्याप्रमाणे फेकला जात नसून तो एका विशिष्ट प्रकारे उपयोगात आणला जातो.

 

nita-and-mukesh-inmarathi
newstracklive.com

मुकेश अंबानी हे आपल्या देशातीलच नाही तर जगातील श्रीमंत लोकांमध्ये येतात. ते त्यांच्या शाही राहणीमानासाठी खूप प्रसिद्ध देखील आहेत. याचं घर एंटीलिया जे भारतातील सर्वात आलिशान घरांपैकी एक आहे.

२७ माळ्याच्या या घरात एकूण ६०० नोकरचाकर आहेत, जे घराला सांभाळतात. अंबानीच्या घरात प्रत्येक लहान-सहान गोष्टीकडे लक्ष दिल्या जातं. प्रत्येक गोष्ट प्रॉपर ठेवण्याची जबाबदारी या नोकरांवर असते. अश्यातच सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या घरचा कचरा चर्चेचा विषय बनला आहे.

असं सांगण्यात येत आहे की, त्यांच्या घरचा कचरा हा वाया जातं नाही तर त्यापासून वीजनिर्मिती करण्यात येते जी त्यांच्याच घरासाठी वापरली जाते.

 

mukesh-ambani-inmarathi
newstracklive.com

त्यांच्या घरात एका विशिष्ट पद्धतीने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येते. यासाठी सर्वात आधी सुख आणि ओला कचरा वेगवेगळा करण्यात येतो आणि मग त्यापासून वीज तयार केली जाते. त्यांच्या एवढ्या मोठ्या घरात सर्वात जास्त वीजेचा वापर होतो म्हणून त्यांनी कचऱ्यापासून वीज तयार करण्याची शक्कल लढवली.

 

mukesh-ambani-inmarathi01
bollywoodpapa.com

तसं पाहता कचऱ्याचा हा सर्वात उत्तम वापर आहे. जो मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया मध्ये करण्यात येतं आहे. यावरून दिसून येतं की मुकेश अंबानी हे एक खरे व्यावसायिक आहेत. त्यांना कुठल्या गोष्टीचा कसा वापस करावा हे माहिती आहे.

तसेच मुकेश अंबानीची ही गोष्ट शिकण्यासारखी देखील आहे. जर आपल्या घरचासुद्धा अश्या कामात आणल्या गेला तर देशात सुरु असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?