मोदींच्या मुद्रा योजनेमुळे निर्माण झाल्यात साडे पाच कोटी नोकऱ्या?!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मोदी सरकारने गेल्या ३ वर्षात एका मागे एक योजना आणल्यात. त्यांच्या यश-अपयशाबद्दल नेहेमीच चर्चा, वाद झाडत आले आहेत. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया ह्या योजनांमुळे रोजगार वृद्धी होईल असं फार विश्वासाने सांगितलं जात असे. पण भारतातील बेरोजगरीचा दर वाढतच जातोय. सरकारच्या “मुद्रा” योजनेमुळे देखील चित्र बदलेल असं विश्वासाने सांगितलं जात होतं. एका रिपोर्टमध्ये, ते चित्र खरोखरच बदलल्याचं म्हटलं गेलं आहे.

 

narendra-modi-marathipizza
indianexpress.com

Financial Express ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार

SKOCH ह्या गुरगाव स्थित थिंक टॅंक ने एक रिपोर्ट तयार केला आहे. हा रिपोर्ट ८ एप्रिल २०१५ रोजी घोषित झालेल्या “प्रधान मंत्री मुद्रा योजना” च्या परिणामकारकतेचा अभ्यास करतो.


रिपोर्ट नुसार :

लघु उद्योगांना अर्थसहाय्य पुरवणाऱ्या मुद्रा योजने मुळे साडेपाच कोटी नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. ह्या नोकऱ्या वृद्धीचा लाभ औद्योगिकरण झालेल्या राज्यांना अधिक झालाय. कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्राला ह्या योजनेचा सर्वाधिक लाभ झाला आहे असं ह्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे.

एप्रिल २०१५ पासून आज पर्यंत, सुमारे ८ कोटी लोकांना ३.४२ लाख कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य पुरवण्यात आलं आहे. ह्यातील बहुतांश लाभधारक लघु उद्योजक आहेत.

अर्थात, हा SKOCH ह्या थिंक टॅंक ने तयार केलेला रिपोर्ट आहे. ह्याची विश्वासार्हता काय, हे आकडे फसवे तर नाहीत ना – ह्याची खात्री व्हायला हवी. लवकरच ह्यावर प्रकाश पडेल अशी आशा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

One thought on “मोदींच्या मुद्रा योजनेमुळे निर्माण झाल्यात साडे पाच कोटी नोकऱ्या?!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *