वडिलांनी मुलींसाठी बांधलेल्या या अफलातून “फिरत्या घराची” उपयुक्तता थक्क करणारी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


प्रत्येक वडिलांचं हे स्वप्न असतं की त्याने आपल्या मुलांना जगातील सर्व सुख सोयी द्याव्यात.

त्यांना नेहेमी संकटांपासून दूर ठेवावे म्हणून प्रत्येक पिता आपल्या मुलांसाठी जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतो. अश्याच एका पित्याने आपल्या मुलीसाठी एक ट्रक तयार केला आहे.

पण हा कुठला मालवाहू ट्रक नाही तर चक्क चालतं फिरतं घर आहे.

 

kiravan-inmarathi08

 

एकेकाळी डिझनीसाठी काम करणाऱ्या Bran Ferren ह्याने आपल्या मुलीसाठी एक अतिशय अलिशान आणि सुंदर असा ट्रक तयार केला आहे.

ह्या ट्रकला त्याने KiraVan हे नाव दिले आहे जे त्याच्या मुलीचे नाव आहे. त्याने आपल्या मुलीसाठी हा ट्रक ह्यासाठी तयार केला जेणेकरून ती सर्पूर्ण जग बघू शकेल.

 

 

ब्रान सध्या Applied Minds LLC करता काम करत आहेत. त्यांना ही आयडिया २०१० साली आली आणि आज त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.

ह्या ट्रकसाठी Mercedes-Benz Unimogच्या फ्रेमला री-डिझाईन करून बनविण्यात आले आहे. ह्यावर नक्कीच ब्रान ने खूप मेहनत घेतल्याचं दिसून येते.


 

 


ह्या ट्रकमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एवढचं नाही तर हा ट्रक इको-फ्रेंडली देखील आहे.

ह्या ट्रकमध्ये 260hp Durbo-Diesel Engine चे इंजिन लागलेले आहे. आणि हा ७० मैल प्रती तास ह्या गतीने रस्त्यावर धावू शकतो.

 

 

ह्या ट्रकच्या आत किचन आहे जिथे एक स्टोव्ह आणि एक फ्रीज आहे. तसेच डायनिंग हॉलमध्ये एक टीव्ही आहे, KIRA साठी येथे एक बेडरूम देखील आहे.

 

 

एन्ट्री गेट सोबतच एक बटन देखील बनविण्यात आले आहे. हे बटन दाबले की शौचालयातील वेस्ट ऑटोमेटिकली एका पावडरमध्ये बदलून जाते जे बायोदिग्रेडेबल आहे.

ह्याच्या किचन वर आणखी एक छोटसं बेडरूम आहे. येथे एक लहानसं ऑफिसही आहे जिथे कॉम्पुटर आणि इंटरनेटची सुविधा आहे..

 

 

रात्रीच्या वेळी हा ट्रक ह्यावर लागलेल्या लाईट्सच्या प्रकाशात उजळून निघतो.

ह्यासोबतच ब्रान ह्याने एक मोटारसायकल देखील बनविली आहे. CDI Turbo-Diesel Engine ने बनलेल्या ह्या मोटारसायकलमध्ये तीन सिलेंडर लागलेले आहेत.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?