सचिनने ६ वर्षांचा पगार पंतप्रधान निधीस केला दान, जाणून घ्या इतर दानशूर भारतीयांबद्दल..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

क्रिकेट म्हटले की, सर्वात आधी सगळ्याच भारतीयांच्या तोंडावर पहिले नाव येते ते म्हणजे सचिन तेंडूलकरचे. क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जाणारा सचिन तेंडूलकर नेहमीच आपल्या दानशूरतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे चर्चेत असलेला आपल्याला दिसतो. अशा या मराठमोळ्या सचिनने नेहमीच आपल्या कर्तुत्वाने मराठी लोकांचा आणि भारतीयांचा मान जगासमोर वाढवला आहे. एकेकाळी आपल्या या सचिन तेंडुलकरला मोठमोठे गोलंदाज घाबरत होते. त्याच्यामुळे कितीतरी गोलंदाजाना आपली कारकीर्द संपुष्टात येण्याची भीती वाटू लागली.

 

Sachin-inmarathi
media3.bollywoodhungama.in

आता परत एकदा हा क्रिकेटचा देव ज्याला भारतानेच नाही, तर संपूर्ण जगाने हे स्थान दिले आहे, तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आपल्या दानशूरपणामुळे सगळ्यांच्याच नजरेत आला आहे. नुकतीच सचिनची राज्यसभेचा खासदार (MP) म्हणून असलेली कारकीर्द संपली आणि त्याच्या निमित्तानेच सचिनने आपले संपूर्ण वेतन आणि भत्ते पंतप्रधानांच्या मदत निधीला (Prime Minister’s Relief Fund) दिले.

गेल्या सहा वर्षामधील सचिन तेंडूलकरने जवळपास ९० लाख रुपये आणि इतर मासिक भत्ते यावेळी काढले. याबाबतीत पीएमओने पोचपावती देखील दिली आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “ पंतप्रधान त्यांच्या या विचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या या विचाराचा मान ठेवत आहेत. या त्याच्या योगदानामुळे संकटात असलेल्या व्यक्तीना सहाय्य करण्यामध्ये प्रचंड मदत होईल.”

 

Charitable Indians.Inmarathi
indianexpress.com

आज आपण अशाच काही दानशूर लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या दानशूर स्वभावामुळे इतर लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया, भारतातल्या अशा काही दानशूर लोकांबद्दल..

१. अझीम प्रेमजी

 

Charitable Indians.Inmarathi1
livemint.com

विप्रो कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांना चीनमधील हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने सर्वात दानशूर भारतीय हा पुरस्कार सलग दोनवेळा दिला आहे. त्यांनी त्यांच्या संपत्तीमधील जवळपास २५ टक्के रक्कम ही दान केल्याचा दावा केला आहे आणि ते मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी वॉरेन बफेट यांच्यासोबत स्थापन केलेल्या ‘गीविंग प्लेज’ या क्लबमध्ये सामील होणारे पहिले भारतीय आहेत. या क्लबमार्फत जगातील धनाढ्य लोकांना दान करण्यासाठी पुढे आणले जाते.

२. अनिल अग्रवाल

 

Charitable Indians.Inmarathi2
nriachievers.in

वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी आपल्या २१००० कोटींच्या संपत्तीच्या ७५ टक्के भाग हा धर्मादाय संस्थाना दान देण्याच्या बाबतीत वचन दिले आहे. अग्रवाल हे आपल्या लोकोपयोगी कामासाठी प्रसिद्ध आहेत आणि भारतातील सामाजिक आणि ग्रामीण विकासाबद्दल ते सर्वात उत्साही आहेत. गेल्या वर्षी त्यांनी जवळपास १७९६ कोटी रुपये दान केले होते.

३. शिव नदर

 

Charitable Indians.Inmarathi3
intoday.in

एचसीएलचे चेअरमन शिव नदर हे उदारमतवादी आणि सर्वाना समान वागणूक देणारे मनुष्य आहेत. त्यांनी आपल्या संपत्तीतून ११३६ कोटी रुपये शिक्षण आणि ग्रामीण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या संस्थाना दान केले. ते नेहमीच देशाला काही न काही आपल्या पद्धतीने देत असतात.

४. रतन टाटा

 

ratan-tata-marathipizza
firstpost.com

रतन टाटांनी असा दावा केला आहे की, त्यांनी आपल्या कंपन्यांमधून निर्माण केलेली सुमारे ६० ते ६५ टक्के संपत्ती शिक्षण, औषधे आणि ग्रामीण विकासाच्या स्वरूपात लोकांना दान केली जाते.

५. मुकेश अंबानी

 

Mukesh-Ambani-marathipizza
kashmirlife.net

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले आणि रिलायन्स ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गेल्यावर्षी ६०३ कोटी रुपये दान केले होते. तसेच, त्यांची पत्नी नीता अंबानी देखील नेहमीच परोपकारी उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचे आपल्याला दिसून येते.

६. नंदन आणि रोहिणी निलेकणी

 

Charitable Indians.Inmarathi4
indiatvnews.com

नंदन आणि रोहिणी निलेकणी दोघेही नेहमीच सामाजिक कार्यांबद्दल उत्साही असतात. हे दोघे नेहमीच गुंतवणूकदारांपासून दूर राहतात. या दोघांनी गेल्या वर्षी जवळपास ५०० कोटी रुपयांचा निधी दान केला होता. नंदन हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन आणि इन्फोसिसचे सह संस्थापक असून रोहिणी ह्या पूर्णवेळ सामाजिक कामे करून लोकांना योग्य ती मदत पुरवण्याची कामे करतात आणि त्यासाठी त्यांनी आपल्या २७ मिलियन यूएस डॉलर शेअर्सची विक्री देखील केली.

७. कवितार्क राम श्रीराम

 

ram-shriram-google-founder-marathipizza02
rediff.com

शेर्पालो वेंचर्सचे संस्थापक आणि गुगलमधील सर्वात पहिले असलेले गुंतवणूकदार श्रीराम हे कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफर्डला लोककल्याणासाठी सर्वात जास्त दान करणारे मनुष्य आहेत. तसेच, श्रीराम हे विविध शिक्षणावर आधारित असलेल्या भारतातील शिक्षण संस्थावर देखील खर्च करतात. त्यांच्या असा दावा आहे की, ते फक्त नॉन प्रॉफिट संस्थांनाच मदत करतात, कारण त्यांच्यामुळे गरजू लोकांना थेट आणि जलद लाभ मिळतो.

८. रॉनी आणि झरिना सक्रेुवला

 

Charitable Indians.Inmarathi5
scoopwhoop.com

बॉलीवूडमधील खान सोडले तर दुसरे कुणीही पैश्यांचे दान करण्यासाठी सहसा पुढे येत नाही. पण हे काही खान नाहीत, तरीही ते दान करण्यास कधीही मागे नसतात. यूटीव्ही (UTV) ग्रुपचे संस्थापक आणि प्रोड्युसर रॉनी आणि त्यांची पत्नी झरिना सक्रेुवला हे परोपकारी उपक्रमांमध्ये सर्वात पुढे आहेत. गेल्या वर्षभरामध्ये देशात सामाजिक आणि ग्रामीण विकासासाठी या दोघांनी जवळपास ४७० कोटी दान म्हणून दिले आहेत.

असे हे आणि आणखी काही भारतीय आपल्या संपत्तीपैकी काही भाग नेहमीच लोकांना दान करण्यासाठी तयार असतात आणि लोकांची मदत करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “सचिनने ६ वर्षांचा पगार पंतप्रधान निधीस केला दान, जाणून घ्या इतर दानशूर भारतीयांबद्दल..

 • April 4, 2018 at 8:57 am
  Permalink

  What a great deed done by the master blaster. He is the first bharat ratna who still asked people to buy water purifier and to drink aerated drinks of foreign company by charging hefty fees. What if he donated his entire salary which is peanuts for him. Please also look at his overall presenty in Rajya Sabha during his tenure. Praise the real good deeds of real good people and not the bharat ratna who is super rich and wealthy.

  Reply
  • October 30, 2019 at 3:34 pm
   Permalink

   Sir What about Customduty Waiver obtained from Government on Farari along with interest till date.How much proportion of slaray surrender.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?