ह्या आहेत जगातील सर्वात महाग प्राचीन वस्तू

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काही वस्तू ह्या खूप अनमोल असतात. काळानुरूप त्याचं मुल्य हे देखील वाढत जातं. अनेकांना अश्या वस्तू जमा करण्याचा छंद असतो. त्यामुळे अश्या प्राचीन वस्तू जमा करण्यासाठी लोक त्या लिलावातून विकत घेतात. ह्या लिलावात लोक त्या वस्तूवर बोली लावतात. ज्याने सर्वात जास्त बोली लावली ती वस्तू त्याची. जगात अश्या अनेक प्राचीन आणि मौल्यवान वस्तू आहेत ज्यांच्या अश्याप्रकारे लिलाव केल्या गेला. आज आम्ही तुम्हाला अश्या ७ प्राचीन वस्तू सांगणार आहोत ज्याला विकत घेण्यासाठी लोकांनी करोडो रुपये खर्च केले.

१. Pinner Qing वंशाची फुलदानी – ८०.२ मिलियन डॉलर

 

mostexpensiveantique-inmarathi

 

ह्या फुलदाणीला जगातील सर्वात अँटिक वस्तू असण्याचा दर्जा मिळाला आहे. ही फुलदाणी १८ व्या शतकात बनविण्यात आली होती. ह्याचा लिलाव युनायटेड किंग्डम येथे २०१० साली करण्यात आला होता.

२. लियोनार्डो डा विंची चे दस्तएवज – ३०.८ मिलियन डॉलर

 

mostexpensiveantique-inmarathi01

प्रसिद्ध पेंटर लियोनार्डो डा विंची ह्यांचे काही कागदपत्र हे त्यांच्या उल्लेखनीय कामाचा संग्रह आहेत. ह्याच्या प्रत्येक पणावर त्यांची स्वाक्षरी आहे, ज्यावरू हे कळून येते की हे त्यांचेच आहेत. ह्याचा लिलाव होताना ह्यावर सर्वात जास्त बोली ही, बिल गेट्स ह्यांनी लावली होती.

३. Badminton Cabinet – २८.८ मिलियन डॉलर

 

mostexpensiveantique-inmarathi02

 

३० कारागिरांनी ६ वर्ष काम करून हे कपाट तयार केले होते. हे इटली येथे बनविण्यात आले होते. सध्या ह्या कपाटाला Liechtenstein संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

४. Olyphant- १६.१ मिलियन डॉलर

 

mostexpensiveantique-inmarathi03

 

हे एक शिंग आहे. ज्याला शिकारी करिता तसेच युद्धादरम्यान लढण्याकरिता वापरले जायचे. ११ व्या दशकात ह्यावर नक्षी काम केले गेले.

५. मूनफ्लास्क- १५.१ मिलियन डॉलर

 

mostexpensiveantique-inmarathi04

ह्या फ्लास्क ला १८ व्या शतकात बनविण्यात आले होते. ह्याचं सारखा आणखी एक फ्लास्क हा टोकियो येथील कला संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. ह्यावरील कारीगरी ही अप्रतिम आहे. मूनफ्लास्कला हॉंगकॉंग येथे २०१० साली विकण्यात आले.

६. मिंग वंशाचे सोन्याचे भांडे – १४.२ मिलियन डॉलर

 

mostexpensiveantique-inmarathi05

 

चीनी कारीगरीचं सर्वात अप्रतिम उदाहरण म्हणजे हे सोन्याचं भांड. ह्या भांड्यावर दोन ड्रॅगन आणि तीन पाय बनलेले आहेत. ह्यावर मोती देखील जडलेले आहेत. ह्या भांड्याचा लिलाव एप्रिल २००८ साली करण्यात आला.

७. नेपोलियन तृतीयच्या पत्नीचे मुकुट – १२.१ मिलियन डॉलर

 

mostexpensiveantique-inmarathi06

 

हा मुकुट फ्रान्सीसी राजा नेपोलियन तृतीय ह्यांच्या पत्नीचा होता. ह्यावर अमुल्य असे रत्न आणि हिरे जडलेले होते. ह्या मुकुटाचा लिलाव २०११ साली करण्यात आला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on “ह्या आहेत जगातील सर्वात महाग प्राचीन वस्तू

  • June 25, 2018 at 7:43 am
    Permalink

    छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?