जगातील सर्वात महागड्या वेबसाईट्स, ज्यांची किंमत अब्जावधींच्या घरात आहे !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सध्या कोणत्याही गोष्टीचे सोल्युशन इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. बस एक क्लिक केले, की अनेक वेबसाईट्सच्या युआरएल ओपन होतात. त्यातील महत्त्वाच्या आपल्याला शोधता येतात. त्यावर आवश्यक माहिती प्राप्त होते. त्याने आपली समस्या अगदी क्षणात दूर होते.

कोणतीही वेबसाईट म्हटली, की डोमेन नेम सर्वात महत्त्वाचे असते. कोणत्याही वेबसाईटसाठी डोमेन नेम एक ओळख असते. एक चांगले आणि आकर्षक डोमेन नेम युजरला वेबसाईटवर आणत असते.

डोमेन नेम सिस्टिममध्ये (डीएनएस) नोंदवण्यात आलेल्या नावाला डोमेन नेम म्हटले जाते. उदा. इन मराठीचे डोमेन नेम inmarathi.com आहे.

 

domain-name-marathipizza01
brainpulse.com

डोमेन नेम त्या वेबसाईटची अप्रत्यक्ष ओळखच असते. सर्च इंजिनवर वेबसाईट सर्च करताना डोमेन नेम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे हवे ते डोमेन मिळण्यासाठी सर्वांचीच प्रचंड धडपड सुरु असते.

यामुळे अब्जावधी रुपयांपर्यंत किंमत गेली असे जगात काही मोजके डोमेन नेम आहेत.

आज आम्ही सांगणार आहोत अशा डोमेन नेमबद्दल ज्यांच्यावर काही मिनिटांत अब्जावधी रुपयांची बोली लावली गेली.

 

360.COM

domain-name-marathipizza02
mostexpensivedomain.name

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन नेम पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी २०१५ साली बोली लावण्यात आली होती. हे डोमेन तब्बल १०६ कोटी २५ लाख रुपयांना एका चायनीज कंपनीने विकत घेतले.

 

सेक्स डॉट कॉम

domain-name-marathipizza03
gb.fotolibra.com

किमतीच्या बाबती हे जगातील दुसरे महागडे डोमेन आहे. २०१० मध्ये या डोमेनसाठी सर्वात मोठी बोली लावण्यात आली. ह्या डोमेनची किंमत सुमारे ७९ कोटी ८३ लाख रुपये इतके होती.

 

हॉटेल्स डॉट कॉम

domain-name-marathipizza04
img.grouponcdn.com

हे तिसऱ्या क्रमांकाचे महागडे डोमेन आहे. ह्या डोमेनसाठी २०११ साली सुमारे ६८ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.

 

फंड डॉट कॉम

domain-name-marathipizza05
gazettereview.com

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन चौथ्या स्थानावर आहे. २००८ साली ह्या डोमेनसाठी तब्बल ६१ कोटी रुपयांची किंमत मोजली गेली होती.

 

पोर्न डॉट कॉम

domain-name-marathipizza06
2.bp.blogspot.com

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन पाचव्या क्रमांकावर आहे. २००७ साली ह्या डोमेनसाठी सुमारे ५६ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.

 

पोर्नो डॉट कॉम

domain-name-marathipizza07
सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन सहाव्या क्रमांकावर आहे. २०१५ साली तब्बल ५५ कोटी रुपयांना हे डोमेन विकले गेले.

 

एफबी डॉट कॉम

domain-name-marathipizza08
toptenofcity.com

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन सातव्या क्रमांकावर आहे. २०१० साली हे डोमेन सुमारे ५२ कोटी रुपयांना विकले गेले.

 

डायमंड डॉट कॉम

domain-name-marathipizza09
entrepreneur.com

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन आठव्या क्रमांकावर आहे. २००६ साली ह्या डोमेनसाठी सुमारे ४६ कोटी रुपयांची बोली लावली गेली होती.

 

बीयर डॉट कॉम

domain-name-marathipizza10
2.bp.blogspot.com

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन नवव्या क्रमांकावर आहे. १९९९ साली सुमारे ४३ कोटी रुपयांनाहे डोमेन विकले गेले होते.

 

जेड डॉट कॉम

domain-name-marathipizza11
websites-img.milonic.com

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन दहाव्या क्रमांकावर आहे. २०१४ साली सुमारे ४२  कोटी रुपये इतकी ह्या डोमेनसाठी बोली लावण्यात आली होती.

कधी वाटलं होतं का वेबसाईट्सना पण एवढी किंमत असेल असं….!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?