' बिन लादेन पेक्षाही अत्यंत क्रूर अशा सैतानाने तब्बल १५ वर्षे भारत सरकारला गुंगारा दिला होता! – InMarathi

बिन लादेन पेक्षाही अत्यंत क्रूर अशा सैतानाने तब्बल १५ वर्षे भारत सरकारला गुंगारा दिला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

९० च्या दशकातील प्रत्येक गोष्टीची मधल्या काळात चर्चा झाली. गाणे, सिरियल्स, सिनेमा सगळ्या गोष्टींबद्दल आपण अगदीच चवीने चर्चा केली आपण.

त्याच दशकात १९९१ मध्ये भारताने अर्थ क्षेत्रात केलेल्या मोठ्या बदलांमुळे प्रायव्हेट सेक्टर आणि सर्विस सेक्टर मध्ये गुंतवणूक वाढण्यात मदत झाली.

सर्व क्षेत्रासाठी तो एक सुवर्ण काळ म्हणता येईल. त्याच दशकात शाहरुख खान सारखा एक सुपरस्टार बॉलीवूड मध्ये उदयास आला. त्याच्या अदाकारीने लोकांना चांगलीच भुरळ घातली होती.

 

90s india inmarathi

 

एकीकडे भारत प्रगती पथावर होता. पण, त्याच वेळी गुन्हेगारी सुद्धा वाढत होती. मुंबई शहरावर अंडरवर्ल्ड चं लक्ष वाढत चाललं होतं. खंडणीसाठी निर्मात्यांना वेठीस धरण्याचं प्रमाण वाढत चाललं होतं.

अंडरवर्ल्डचं वर्चस्व वाढत असताना भारतीय संरक्षण खात्याची जवाबदारी  एका भारतीय दरोडेखोराने सुद्धा वाढवली होती. त्या दरोडेखोराचं नाव होतं ‘विरप्पन’.

त्याच्या जीवनावर आधारित एक चित्रपट सुद्धा बॉलीवूड चे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी २०१६ मध्ये रिलीज केला होता.

एका विसरलेल्या डॉनची माहिती लोकांना ‘विरप्पन’ या सिनेमातून पहायला मिळाली होती. लोकांना ती दहशत दाखवण्यास दिग्दर्शक यशस्वी झाला होता.

विरप्पनचा जन्म १९५२ मध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू च्या सीमेवर असलेल्या गोपीनाथम नावाच्या एका छोट्या गावात झाला.

 

veerappan inmarathi

 

त्याचे वडील हे सेवी गोउंदर या कुख्यात गुन्हेगाराचे साथीदार होते. प्राण्यांची अवैध शिकार करणे आणि चंदन तस्करी करणे हे त्यांचं मुख्य काम होतं.

वयाच्या दहा वर्षाच्याही आधीपासूनच विरप्पन यांनी सेवी गोउंदर यांच्यासोबत काम करून प्राण्यांची अवैध शिकार आणि चंदन तस्करी करण्यास सुरुवात केली.

वयाच्या दहाव्या वर्षी विरप्पन ने पहिला हत्ती मारला होता. या कामाने सेवी गोउंदर हे विरप्पन वर खूप खुश झाला आणि आनंदी होऊन त्याने विरप्पनला पहिली पर्सनल बंदूक दिली.

ज्या दिशेने तुम्ही चालायला सुरुवात केली त्या दिशेने तुमची प्रगती होत जाते. विरप्पन चं सुद्धा तेच झालं. वाढत्या वयाबरोबरच विरप्पन ने गुन्हेगार होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कला अवगत केल्या.

चंदन तस्करी, हस्तिदंत तस्करी या दोन्ही गोष्टींमध्ये विरप्पनने पाहता पाहता त्याच्या सहकाऱ्यांना लवकरच मागे टाकले.

 

hastidant inmarathi

 

वयाच्या १७ व्या वर्षी विरप्पन यांनी जंगल अधिकाऱ्याचा खून केला. ४० वर्षाच्या त्याच्या जंगलराज मध्ये विरप्पन ने १८४ लोकांचा खून केला. हे जवळपास दोन महिन्यात एका व्यक्तीचा खून करण्यासारखं होतं.

विरप्पन ची ओळख राष्ट्रीय पातळीवर तेव्हा झाली जेव्हा झाली जेव्हा त्याने १९८७ मध्ये चिदंबरम नावाच्या एका वन अधिकाऱ्याचं अपहरण करून खून केला.

त्या वेळी केंद्र सरकारने तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारला विरप्पन ला पकडण्याचे आदेश दिले.

त्यांना हे थोडीच माहीत होतं, की हा शोध १५ वर्ष चालेल आणि त्यावर लाखो रुपये खर्च होतील, किती तरी लोक जीव गमावतील आणि तरीही हा शोध संपणार नाही.

विरप्पन हा फार संशयी होता. एकदा त्याने एका माणसाला फक्त या कारणासाठी मारलं कारण त्याला कोणीतरी पोलीसाच्या गाडीसोबत बघितलं होतं. तो त्याच्या गुप्तहेरांसोबत सुद्धा कोणत्याही छोट्या चुकांमुळे कर्दनकाळ ठरायचा.

विरप्पन ने सर्वात मोठा गुन्हा केला जेव्हा त्याने ४१ लोकांच्या पोलीस पथकाला मारले. हे पथक गोविंदापडी च्या जंगलातून एका पोलीस गुप्तहेराच्या खुनाची चौकशी करत होते.

 

veerappan 2 inmarathi

 

४१ लोकांच्या पोलीस पथकाला विरप्पनने ओलीस ठेवले होते आणि त्यातील २२ लोकांना त्याने जागीच ठार मारले होते.

विरप्पन कायम सरकारला स्वतःसमोर झुकवण्यात धन्यता मानायचा. तो प्रत्येक वेळी कोणत्या तरी प्रसिद्ध व्यक्तीचं अपहरण करायचा.

त्याने २००० साली कन्नड च्या सुपरस्टार राजकुमार याचं अपहरण केलं. राजकुमार हे एका वास्तूशांतीसाठी प्रवास करत होते तेव्हा विरप्पन च्या सहकाऱ्यांनी त्यांचं अपहरण केलं.

लोकांनी हे अपहरण खूपच मनावर घेतलं होतं आणि त्यांनी या घटनेविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. राजकुमार यांना जंगलामध्ये १०८ दिवस घालवावे लागले होते.

राजकुमार यांच्या सुटकेसाठी विरप्पनने ५० करोड रुपयांची मागणी केली होती जी की आतापर्यंत कोणत्या गुन्हेगाराने सरकारला केलेली सर्वात मोठी मागणी आहे.

 

virappan rajkumar inmarathi

 

प्रत्येक वेळी विरप्पन ने फक्त पैशाचीच मागणी केलेली आहे असंही नाहीये. १९९४ मध्ये विरप्पन च्या पत्नी ला पोलिसांनी अटक केली होती.

त्यावेळी आपल्या पत्नीचा आवाज ऐकण्यासाठी त्याने काही वन अधिकाऱ्यांचं अपहरण केलं होतं. विरप्पनने ही अट ठेवली होती की,

त्याचा एक सहकारी पोलिसांसोबत त्या जेल मध्ये जाईल, जिथे विरप्पनच्या पत्नीला ठेवलं आहे आणि तिच्या आवाजात एक ऑडिओ कॅसेट रेकॉर्ड करेल आणि ती विरप्पनला परत आणून देईल.

काम झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना विरप्पन ने परत सुखरूप सोडून सुद्धा दिलं होतं, पण त्याने अपहरण केलेले सगळेच असे नशीबवान नव्हते.

२००२ मध्ये विरप्पन ने कर्नाटकच्या एका मंत्री H.Nagappa यांचं अपहरण त्यांच्या राहत्या घरातून केलं. त्यांना सोडण्याची बोलणी सरकार सोबत सुरू झाली.

पण, गोष्टी विरप्पनला पाहिजे तश्या घडत नव्हत्या. तेव्हा त्याने हे प्रकरण स्वतःच्या हातात घेतलं आणि श्री नागप्पा यांना ठार मारलं आणि त्यांचा मृतदेह कर्नाटक च्या जंगलामध्ये फेकून दिला.

 

h nagappa inmarathi

 

काही वर्षांनी कर्नाटक सरकारच्या हे लक्षात आलं की त्यांच्या जंगलातील हत्ती कमी होत चालले आहेत. ह्याचं कारण विरप्पन ने सुरू केलेली हस्तिदंताची तस्करी हे होतं.

४० वर्षांच्या त्याच्या दहशती मध्ये त्याने २००० पेक्षा जास्त हत्तींची हत्या केली आणि जवळपास ८८ हजार पौंड्स च्या हस्तिदंताची विक्री केली आणि जवळपास १०००० टन इतक्या चंदनाची तस्करी केली.

त्याची ही प्राण्यांच्या रक्तातून कमावलेली संपत्ती २२ मिलियन पौंड्स पर्यंत पोहोचली होती.  पैसे आले, की त्यासोबतच येतात ते म्हणजे मोठ्या आणि वरच्या लोकांपर्यंतच्या ओळखी. विरप्पन चं सुद्धा तेच झालं.

असं म्हटलं जातं, की स्पेशल टास्क फोर्स (STF) ने एकदा विरप्पन ला जंगलामध्ये पकडलं होतं.

ते त्याला मारणारच होते तेवढ्यात विरप्पन ने त्याच्याकडे असलेला एक फोन काढला आणि एका वरिष्ठ मंत्र्याला फोन केला. काही क्षणातच STF माघारी परतली.

जेव्हा रामगोपाल वर्माचा सिनेमा ‘विरप्पन’ चा ट्रेलर येत होता त्यामध्ये एक लाईन अशी होती की,

“अमेरिकेला १० वर्ष लागले ओसामा बिन लादेन ला शोधण्यात आणि त्याला मारण्यात. पण, भारतीय सरकारला २० वर्ष लागली विरप्पनला पकडायला आणि मारायला.”

 

veerappan movie inmarathi

 

अर्थात, या गोष्टीला त्याची कारणं आहेत. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे विरप्पन ला तामिळनाडू आणि कर्नाटक च्या जंगलाच्या कान कोपऱ्यांची असलेली माहिती.

त्याला जमीन कुठे संपते आणि कोणती नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते आणि कोणत्या भागात जास्त प्राणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या.

विरप्पनच्या एका साथीदाराने सांगितलं होतं, की फक्त झाडांच्या पानांच्या हलण्याच्या आवाजाने सुद्धा त्याला कोणता प्राणी येतोय हे कळायचं.

हा एकमेव असा गुन्हेगार होता ज्याने की प्रसिद्ध अभिनेते, राजकीय लोकांना त्यांच्या राहत्या घरातून इतकी सेक्युरिटी असताना सुद्धा त्यांचं अपहरण केलं,

आणि त्यांना निर्मनुष्य ठिकाणी नेण्यात आलं आणि तरीही कोणत्याही वन खात्याकडे त्याचा एकही पुरावा सापडत नाही याचाच अर्थ आपली एकूणातच यंत्रणा किती कमकुवत आहे याचा अंदाज येतो.

विरप्पन इतकी भयानक व्यक्ती या पृथ्वीवर कोणती झाली नव्हती हे मान्य करावंच लागेल. अशी व्यक्ती परत जन्माला येऊ नये इतकीच आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?