सृष्टीसौंदर्याचा अप्रतिम नमुना : जगातील १० सर्वात सुंदर सापांच्या प्रजाती !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
जीवसृष्टीत आपल्याला विविध प्रकारचे प्राणी पाहण्यास मिळतात. जसे प्राणी तशी त्यांची वैशिष्ट्ये देखील वेगवेगळी आहे. त्यातीलच एक सरपटणारा प्रसिद्ध प्राणी म्हणजे साप. साप हा सरपटणाऱ्या प्राण्यांमधील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो, कारण तो कसा आणि कधी आपल्यावर हल्ला करेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. पण साप हा प्राणी जेवढा धोकादायक असतो, तेवढाच तो आकर्षक देखील असतो. त्याचे वेगवेगळे चमकणारे रंग आणि खवल्यासारखी त्वचा दिसायला खूप सुंदर दिसते.
पण दिसायला जेवढे सुंदर असतात, तितकेच ते चपळ देखील असतात. आज आपण अशाच काही सापांची माहिती घेणार आहोत. जे त्यांच्या रंगामुळे आणि त्यांच्या अंगावर असणाऱ्या नक्षीमुळे खूपच उठून दिसतात.
१. रेड हेडेड क्रेट

रेड हेडेड क्रेट हा साप अत्यंत विषारी सर्प आहे, जो जंगलातील टेकड्यांमध्ये राहतो ज्या जवळपास ४०० मीटर ऊंच असतात. हा सर्प मुख्यत: थायलंडच्या दक्षिण भागामध्ये आढळतो. रेड हेडेड क्रेट हा जवळपास ६.९ फुटांपर्यंत वाढतो. या सापाचे सौंदर्य त्याचे फिकट शरीर आणि लहान लालसर शेपूट आणि तेजस्वी नारंगी – लाल डोक्यामुळे खुलून दिसते.
२. ओरिएंटल व्हिप साप

ओरिएंटल व्हिप साप एक मृदू आणि विषारी सर्प आहे. त्याचे तोंड टोकेरी असते आणि हा साप बारीक असतो. तसेच, हा वृक्षाच्छादित क्षेत्रांमध्ये आणि ग्रामीण कृषी भागांमध्ये पाहिला जातो. त्याचे शरीर अत्यंत बारीक आहे आणि त्याचा रंग हलका तपकिरी असतो, जो पिवळ्या किंवा हिरव्या रंगामध्ये बदलू शकतो.
३. ब्लॅक स्पीटिंग कोब्रा

ब्लॅक स्पीटिंग कोब्रा हे बहुतेक उप –सहारा भागात आफ्रिकेमध्ये आढळतात. हा साप ७.२ फुटांपर्यंत वाढतो. त्याला जेव्हा वाटते की, आता आपल्याला एखाद्यापासून धोका आहे तेव्हा तो आपल्या फण्यामधून विष बाहेर फेकतो. त्याच्या शरीर पूर्णपणे काळे आणि चकाकणारे असते.
४. ग्रीन ट्री पायथन

ग्रीन ट्री पायथन हा प्रामुख्याने न्यू – गिनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. हा साप सहा फुटांपर्यंत वाढू शकतो. हा सर्प झाड, छोटे वृक्ष आणि झुडुपे असलेल्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा साप हिरव्या रंगाचा असून त्यावर पांढरे ठिपके असतात आणि त्याचे डोळे देखील खूप आकर्षक असतात.
५. ब्लीझर्ड कॉर्न स्नेक

ब्लीझर्ड कॉर्न स्नेक हा अॅमेलांस्टिक जीन आणि चारकोल जीन यांचे मिश्रण आहे. ब्लीझर्ड कॉर्न स्नेकचा रंग गडद पांढरा असतो. हा साप काहीही करत नाही, तो पूर्णपणे निरुपद्रवी असतो. काही लोक तर या सापाला पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवतात.
६. ब्लडर्ड कॉर्न स्नेक

ब्लडर्ड कॉर्न ससाप हा उत्तर अमेरिकेत आढळतो. हा साप थोडेसे जंगल असलेल्या भागांमध्ये, तसेच उजाड पडलेल्या इमारतींमध्ये आणि शेतात आढळतात. हा साप धान्य साठवून ठेवलेल्या ठिकाणी जास्त पाहिला जातो. हा साप भडक लालसर रंगाचा असून थोड्या तपकिरी रंगाची चमक त्याच्यामध्ये आढळते. हा साप पाहायला खूपच आकर्षक वाटतो.
७. अल्बिनो बॉल पायथन

अल्बिनो बॉल पायथन हा साप पश्चिम आफ्रिकेत निर्माण झाला. हा साप पाळीव प्राण्यांच्या व्यवसायामध्ये सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी आहे. हा साप हा जवळपास सहा फुटांपर्यंत वाढू शकतो. त्याचे शरीर सर्व साधारणपणे पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा असतो, जो गडद नसतो. तसेच, त्याच्याकडे एक प्रभावी असा लाल डोळा देखील असतो.
८. ब्लू रेसर स्नेक

ब्लू रेसर स्नेक हा अत्यंत सक्रीय साप म्हणून ओळखला जातो. हा साप खूप वेगाने सरपटतो. रोपे, दलदलीचा प्रदेश, खुली झाडे आणि दाट झाडे असलेला पाण्याचा प्रदेश सर्वच ठिकाणी हा आपल्याला पाहायला मिळतो आणि या सगळ्याच ठिकाणी तो वेगाने सरपटतो. हा साप मुख्यत: पेनिन्सुलाच्या दक्षिण भागामध्ये जास्त आढळतो. मोठ्या ब्लू रेसर सापाचे शरीर हे हलक्या निळ्या रंगाचे असते, तर लहान पांढरे आणि चमकदार असतात.
असे हे आणि इतर काही जगातील सर्वात सुंदर आणि आकर्षक साप आहेत. ज्यांच्याकडे पाहिल्यावर नेहमी त्यांच्या त्या रूपाची स्तुती करावीशी वाटते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved