रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आयपीएलने अनेक नवोदित खेळाडूंना त्यांच्यातील कामगिरी सिद्ध करून दाखवण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून दिले. आयपीएलच्या गेल्या ९ सिजनमध्ये आपण असे कित्येक खेळाडू पाहिले जे स्थानिक स्तरावर तर उत्तम खेळत होतेच पण त्यांच्या कामगिरीची दाखल घेतली जात नव्हती.

परंतु आयपीएलने त्यांना क्रिकेट प्रेमींपुढेही आणले आणि त्यांना प्रसिद्धी सोबत बक्कळ पैसाही मिळवून दिला.

कित्येक जणांनी तर या सुवर्णसंधीचा फायदा उचलत भारतीय क्रिकेट संघात देखील स्थान पटकावले. नावे घ्यायचीच झाली तर हार्दिक पांड्या, जसप्रीत बुम्रा, यांची नावे दाखले म्हणून घेतली जाऊ शकतात.

मध्यमवर्गीय घरातून वर आलेल्या यांसारख्या अनेक खेळाडूंना आयपीएलने तारले.

 

bumrah-pandya-marathipizza

स्रोत

गेल्या वर्षी आयपीएलच्या १० व्या सिजन साठी खेळाडूंचा लिलाव झाला होता. आणि दरवर्षी प्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा गरीब परिस्थितीतून क्रिकेट खेळत येथवर पोचलेल्या खेळाडूंना आयपीएलने रातोरात करोडपती बनवले. या लिलावामध्ये एकीकडे तामिळनाडूमधील थंगरसू नटराजन या मजुराच्या मुलाला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ३ करोड रुपयांमध्ये खरेदी केले तर –

सनरायजर्स हैद्राबाद संघाने मोहम्मद सिराज याला २.६ करोड रुपयांमध्ये खरेदी करत त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळवून दिले होते.

ह्यावर्षी, IPL 2018 मध्ये सिराज त्याच किमतीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर साठी खेळला.

 

mohammd-siraj-marathipizza03

स्रोत

मोहम्मद सिराज हा फास्ट बॉलर असून हैद्राबादचाच राहणारा आहे. गेल्या २-३ वर्षांतील त्याची स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी पाहून सनरायजर्स हैद्राबाद संघाने २.६ करोड रुपयांची बोली लावत त्याला करारबद्ध केले होते.

मोहम्मद साठी ही संधी म्हणजे एखाद्या लॉटरी पेक्षा कमी नव्हती. अतिशय गरीब परिस्थितीमधून त्याने क्रिकेटर म्हणून स्वत:ला घडवले आणि आता तो थेट करोडपती झाला होता. त्यामुळे त्याच्यासाठी जणू आभाळच ठेंगणे झाले.

 

mohammad-siraj-marathipizza01

स्रोत

या गोड बातमीमुळे त्याच्या आईवडीलांना देखील अश्रू अनावर झाले. मुलाने घेतलेल्या मेहनतीचे हे चीज असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी ह्या वेळेस व्यक्त केले.

या सोन्यासारख्या क्षणाबद्दल व्यक्त होताना मोहमद सिराज म्हणतो,

जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मी चांगला खेळ केला म्हणून, मला ५०० रुपयांचं एक बक्षीस मिळालं होतं. तेव्हा मी २५ ओव्हर मध्ये २० रन्स देऊन ९ विकेट घेतले होते.

माझ्या या कामगिरीमुळे खुश झालेल्या माझ्या मामाने मला ५०० रुपये दिले होते. तो आमच्या टीमचा कॅप्टन होता.

तेव्हा ५०० रुपये मिळाल्याचा तो क्षण आणि आता २.६ करोड रुपये मिळवून देणारा हा क्षण…या दोन क्षणांमध्येच मी घडलो. हे दोन क्षण माझ्या आयुष्यातील अमुल्य क्षण आहेत.

मोहम्मदचे वडील रिक्षा चालवतात. त्या मानाने घरची परिस्थिती बेताचीच आहे. पण त्यांनी कधीही आपल्या मुलाला क्रिकेट पासून दूर केले नाही. त्याला क्रिकेटर म्हणून घडवण्यासाठी जेवढा खर्च आला तो त्यांनी कसाबसा उचलला. जणू त्यांना देखील आशा होती की मोहम्मद पुढे जाऊन नक्कीच काहीतरी मोठं करणार!

आणि त्यांची ही आशा खरी ठरली…!

 

mohammd-siraj-marathipizza02

स्रोत

मोहम्मदने आजवर रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. आता येणाऱ्या आयपीएल सिजनमध्ये तो काय चमत्कारिक कामगिरी करतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये!

  • October 31, 2018 at 1:00 pm
    Permalink

    छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?