“पकोडे” प्रचार : क्षुद्र मनोवृत्ती आणि श्रम-अप्रतिष्ठेची लाजिरवाणी साक्ष

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सदर विषयाची पार्श्वभूमी वेगळी सांगण्याची गरज नाही. पण ह्या विषयावर सोशलमिडियावर उभ्या राहिलेल्या वाक्युद्धातून आपण राजकीय टीका-टिपण्या किती विचित्र थराला नेल्या आहेत हे नमूद करणं आवश्यक आहे. त्याचवेळी – “पकोडे तळणारा” म्हणजे कुणीतरी “निकृष्टच” हा हेटाळणीयुक्त स्वर किती चुकीचा आहे हे कळणं देखील आवश्यक आहे.

ह्या विषयावर चपखल अन मार्मिक भाष्य करणारी फेसबुक पोस्ट्स इथे शेअर करत आहोत.

===

मनरेगा योजने अंतर्गत खड्डे खणणे म्हणजे रोजगार असू शकतो तर चहा विकणे/भजी/वडापाव विकणे म्हणजे रोजगार का असू शकत नाही?!

परवा नरेंद्र मोदी कुठल्याश्या मुलाखतीत (मी पाहिली नाही) म्हणाले म्हणे की पकोडे विकणे म्हणजे सुद्धा इनफॉर्मल सेक्टरमधली रोजगार निर्मिती आहे. ह्यावर बऱ्याच लोकांना पोटशूळ उठलाय.रोजगाराच्या नावाखाली म्हणे लोकांना पकोडे विकायला लावता का?

 

modi-interview-inmarathi
i2.wp.com

का रे बाबा? पकोडे विकणे मेहनतीचे काम नाही का? चहा विकणे, नारळपाणी, वडापाव विकणे, रिक्षा चालवणे म्हणजे कमीपणा आहे का?

बरं हे पोटशूळ चॅम्पियन किती कमावतात? बँकेत, शाळेत, ऑफिसात, शेतात, दुकानात, मल्टी नॅशनल कंपनीत बसून हे आज आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे समाधानी आहेत का? तुम्ही कोण टाटा-बिर्ला-अदानी-अंबानी आहात काय?

आज प्रत्येक तरुण आर्थिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असतोच असे नाही. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार तो काम करतो. मग छोटं मोठं भांडवल त्याला मिळत असेल तर का पकोडे विकू नयेत त्याने? का रिक्षा चालवू नये?

जय महात्मा गांधी म्हणत खड्डेच खणले पाहिजेत असं काही आहे का? मजुरीच करायला हवी अशी सक्ती आहे काय?

 

MGNREGA-inmarathi
ruralmarketing.in

आज अनेक तरुण हाताला काम नाही म्हणून फ्रस्ट्रेट होतात. शिक्षण नाही, स्किल नाही, कुठे काम उपलब्ध नाही…अश्यावेळी काही भांडवल उपलब्ध होऊन जर लहान सहान धंदा उभा होत असेल तर काय वाईट आहे?

त्या कामाला तुम्ही डिस्कार्ड करणार का?

उठसुठ कशावरही आक्षेप घेणारे हार्दिक पटेल, ओमर खालिद, कन्हैय्या कुमार, आमदार होण्याआधी मेवाणी आणि अल्पेश हे तरुण कितीसे कमवायचे/कमावतात? ह्यांचा काम धंदा काय? युवा लोकांना रोजगार देण्याविषयी ह्यांच्या डोक्यातल्या उपाय योजना काय?

हे आयतखोर फुकटे सबसिडी मिळवून मजा मारणार आणि तरुणांना कसे काम मिळावे ते शहाणपण शिकवणार का?

 

livemint.com

हे सर्व असू देत. काही उदाहरण देतो. डोकं ठिकाणावर ठेवून वाचा!

हैदराबादला जामबागजवळ कराची बेकरीपाशी एका राम नावाच्या पोराने इडली डोश्याची गाडी टाकली होती काही वर्षांपूर्वी. “राम की बंडी” नाव होतं. बंडी म्हणजे गाडी. हैदराबादमध्ये वडापाव-भाजीपाव सारखं इडली-डोसा-बोंडा (मैसूर बज्जी) देखील गाडीवर मिळतो. आम्ही नेहमी ह्या रामकडे डोसा खायला जात असू. तुरळक गर्दी असे.

हळू हळू चवीमुळे राम बऱ्यापैकी लोकप्रिय होत गेला.

आम्ही हैदराबाद सोडलं तेंव्हा ‘राम की बंडी’ संपूर्ण हैदराबादमध्ये प्रसिद्ध झाली होती.

 

ram-ki-bandi-inmarathi
chaibisket.com

आज ज्युबिली हिल्स ह्या हैदराबादच्या सर्वात महागड्या एरियात केबीआर पार्कजवळ “राम्स डोसा हाऊस” मोठ्या दिमाखात उभं आहे. आणि हा राम मराठी आहे बरं… राम शिंदे त्याचं नाव!!

ह्यातून – आपण कोण व्हायचंय – पकोडे तळणाऱ्याला “निकृष्ट” समजणारे अविचारवंत की पकोडे तळणाऱ्यांचा होरा बाळगणारे? आपलं आपण ठरवा.

लोकांना काम हवं आहे. ते त्यांना मिळालं पाहिजे. मिळत नसेल तर मोदीना वेठीला धरलंच पाहीजे! पण केवळ मोदीच्या नावाने मुरडा उठतो म्हणून एखाद्या कामालाच डिग्रेड करणे…ही खऱ्या अर्थाने महानीच मानसिकता आहे!

: सूरज उदगरीकर

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?