मोबाईल गेम्स जरी ‘फ्री’ असले तरी त्यातून निर्माते ‘अब्जावधी’ रुपये कमावत आहेत!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मोबाईल गेम्स तर आपण सर्वच खेळतो. पजल गेम्स, स्ट्रेटेजी गेम्स, शूट गेम्स, स्पाेर्ट‌्स गेम्स, वार गेम्स, वर्ड गेम्स आणि क्विज आणि ते आपल्याला उपलब्ध देखील होतात अगदी मोफत. पण कधी तुम्ही विचार केलाय का जर गेम फ्री मध्येच द्यायचे तर लोक गेम्स बनवतातच का? त्यातून त्यांना काय कमी होते? चला जाणून घेऊया मोबाईल गेम्स मागचं अब्जावधींच जग!

मोबाईल गेम बनवणे अपेक्षेनुसार सोपे आणि कमी खर्चीक आहे आणि जर तुमचा गेम यशस्वी ठरला तर त्याद्वारे तुम्ही भरघोस कमाई करू शकता.

android-games-marathipizza01
lh3.googleusercontent.com

याचे प्रामाणिक उदाहरण फ्लॅपी बर्ड हे आहे. या साध्या गेममध्ये एक छोटा हिरव्या रंगाचा पक्षी मोठ्या पाईपमधून धक्का न लागता उडण्याचा प्रयत्न करत असते. फ्लॅपी बर्डची निर्मिती हनोईच्या २८ वर्षीय डोंग नग्युयेनने २०१३ मध्ये केली होती. तो पाच कोटी वेळा डाउनलोड केला गेला आहे. तो जवळपास ३२ लाख रूपये प्रतिदिन कमावत होता. पण नग्युयेनने गेम बंद केला कारण तो गेमच्या यशस्वीतेच्या दबावाला सामोरा जाऊ शकला नाही.

काही गेम त्यापेक्षाही अधिक यशस्वी आहेत. अॅप डाटा साइट थिंक गेमिंगच्या म्हणण्यानुसार

पजल गेम कँडी क्रश सागा सरासरी दरदिवशी पाच कोटी ९० लाख रुपये कमाई करतो. स्ट्रेटेजीक गेम क्लॅश ऑफ क्लॅन्सची कमाई प्रतिदिन नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गेम बनवणारी फिनलँडची कंपनी सुपरसेलचे मुल्य ३२० अब्ज रुपयांपेक्षा अधिक आहे.

android-games-marathipizza02
lh3.googleusercontent.com

हे आकडे फक्त अॅपल स्टोरचे आहेत. गुगल प्ले, अमेजन अॅप स्टोर आणि विंडोज फोन स्टोरचे आकडे यात समाविष्ट नाहीत. गेल्या वर्षी मोबाइल गेमद्वारे ग्लोबल कमाई १६०० अब्ज रुपये होती. ही २०१३च्या तुलनेत ४२ टक्के अधिक आहे.

यावर्षी मोबाईल गेमची कमाई १९०० अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ते पहिल्यांदाच कंसोल गेम एक्स बॉक्स, प्ले स्टेशनला मागे टाकू शकतात. तसे, मोबाईल गेम जुन्या पीढीच्या कंसोल गेमपेक्षा वेगळे आहेत. काल ऑफ ड्यूटी किंवा असेसिन्स क्रीड सारख्या धमाकेदार कंसोल गेमच्या निर्मितीचे डझनावारी लोक अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्याचे बजेट ६०० कोटी रुपयापेक्षा अधिक आहे.

मात्र, मोबाईल गेम कमी किचकट आहेत. तुम्ही त्याची निर्मिती कमी खर्चीत तुमच्या बेडरुममध्ये करू शकतात. डूडल जंपला दोघे भाऊ आणि मार्को पुसेनजकने २००९ मध्ये तीन महिन्यात बनवले होते. हा सर्वाधिक डाउनलोड केलेलेे तिसरे अॅप आहे. टाइनी विंग्सला एक जर्मन प्रोग्रामरने बनवले होते. ते ८८ देशांत एक नंबर होते.

android-games-marathipizza023jpg
images-amazon.com

काय म्हणताय? कळलं ना लोक उगाच मोबाईल गेम्स बनवण्यात वेळ वाया घालवत नाहीत…!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?