“सनस्क्रीन” बाबत प्रचलित असलेले “हे” समज निव्वळ ‘गैरसमज’ आहेत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

इतरांकडून कानावर पडणाऱ्या गोष्टींवर आपण खूप लवकर विश्वास ठेवतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीबाबत समाजात खऱ्या गोष्टी कमी आणि गैरसमज जास्त प्रचलित असतात. पण खरंच ह्या गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या असतात का?

असचं काहीसं सनस्क्रीनबाबतही आहे. सनस्क्रीनबाबतही अनेक असे गैरसमज प्रचलित आहेत ज्यांना लोक खरं मानतात.

 

sunscreen facts-inmarathi05
foreveryoung.perriconemd.com

१. प्रत्येकवेळी सनस्क्रीन लावणे गरजेचे नसते :

 

sunscreen facts-inmarathi01
aarp.org

अनेक लोक असं मानतात की, जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हाच सनस्क्रीन लावायची गरज असते. पण हे सत्य नसून पावसाळ्यात देखील यूव्ही किरणांमुळे आपल्या शरीराला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे प्रत्येक मोसमात सनस्क्रीन लावावे, त्वचेच्या सुरक्षेसाठी हा एक योग्य पर्याय आहे.

२. सनस्क्रीन शरीराला विटामिन-डीने वाचवते :

 

sunscreen facts-inmarathi07
sherwoodwellness.tv

विटामिन-डी हे शरीराला लागणाऱ्या सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी सनस्क्रीन लावल्याने आपल्या शरीराला विटामिन-डी हवा तेवढ्या प्रमाणात मिळत नाही.

वैज्ञानिकांच्या मते माणसाला दिवसातील २५ ते ३० मिनिटांपर्यंत सूर्याच्या संपर्कात राहायलाच हवे.

३. सनस्क्रीन लावल्याने शारीरिक समस्या उद्भवतात :

 

sunscreen-facts-inmarathi06
skincancer.org

Oxybenzone वर करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं होत की, सनस्क्रीन लावल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवतात.

पण त्यानंतर झालेल्या रिसर्चनुसार ह्याला चुकीचे ठरविण्यात आले आहे. सनस्क्रीन लावल्याने कुठल्याही प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवत नाहीत.

४. सावळी त्वचा असलेल्या लोकांना सनस्क्रीनची गरज नसते :

 

sunscreen facts-inmarathi08
pinterest.com

काही लोकांच्या मते डार्क स्कीनमध्ये मेलेनिन असतो, जो त्यांना युव्ही किरणांपासून बचावतो, जे काही अंशी खरं देखील आहे. पण जर डार्क स्कीन असलेले लोक भर उन्हात सनस्क्रीन शिवाय असले तर त्यांना स्कीन कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.

५. मेकअपने देखील चेहऱ्याची निगा राखल्या जाऊ शकते :

 

makeup-inmarathi
intothegloss.com

सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी तुम्ही मेकअपचा आधार घेऊ शकता. पण मेकअप तुम्हाला सनस्क्रीन एवढी सुरक्षा नाही देऊ शकत.

६. सनस्क्रीन लावल्याने शरीर टॅन होत नाही :

 

sunscreen facts-inmarathi09
indiatimes.com

सनस्क्रीन आपल्याला UVA आणि UVB किरणांपासून वाचवते. पण हे आपल्या शरीराला पूर्णपणे टॅन फ्री ठेवू शकत नाही. मग तुम्ही कितीही वेळा सनस्क्रीन लावा.

आपले शरीर टॅन फ्री ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावल्यावर लांब कपडे घालून बाहेर जावे.

७. सर्व सनस्क्रीन एकसारखे असतात :

 

sunscreen facts-inmarathi03
goodhousekeeping.co.uk

जर तुम्हाला असं वाटत असेल की, सर्व सनस्क्रीन एकसारखे असतात तर असं नाहीये.

Titanium Dioxide, Zinc Oxide आणि Ecamsule असणारे सनस्क्रीन UVA आणि UVB किरणांना फिल्टर करण्याचं काम करतात.

तर Avobenzone युक्त सनस्क्रीन अनेक प्रकारच्या सूर्य किरणांना शरीरापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात. तसेच स्पेक्ट्रम पूर्ण सनस्क्रीन मोठ्या प्रमाणात सूर्यापासून आपल्या शरीराची रक्षा करतात.

८. दिवसातून एकदा सनस्क्रीन लावणे पूरेसं आहे :

 

sunscreen facts-inmarathi10
fashionisers.com

अनेकांचा असा गैरसमज आहे की, दिवसातून एकदा सनस्क्रीन लावणे पुरेसे आहे, ह्यामुळे सूर्याच्या घातक किरणांपासून शरीराची निगा राखली जाऊ शकते.

पण उन्हात गेल्यानंतर काहीच वेळात सनस्क्रीनचा असर संपून जातो, त्यामुळे दर २-४ तासांत नेहमी सनस्क्रीन लावत राहावे.

९. सनस्क्रीन कधीही खराब होत नाही :

 

sunscreen facts-inmarathi
intuitivetouchtherapies.com

हा समजही पूर्णपणे चुकीचा आहे. सनस्क्रीन मध्ये असणारे तत्व देखील खराब होतात.

त्यामुळे सनस्क्रीन बाबत कुठल्याही समजावर विश्वास ठेवू नका.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?