आपल्या आरोग्याबद्दल आपणच काही धोकादायक गैरसमज करून घेतले आहेत! कोणते, जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अनेकदा असं होतं की, आपण ज्या गोष्टी ऐकत आलो असतो त्यावर विश्वास ठेवतो. पण त्या खरंच किती बरोबर आणि किती चुकीच्या आहेत ह्याची साधी आपण पडताळणी देखील करीत नाही. हे गैरसमज आपण खरे मानून जगत असतो. आणि त्यामुळे मग त्यासंबधी आणखी गैरसमज पसरतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर वश्वास ठेवण्याआधी त्यात किती सत्यता आहे हे एकदातरी पडताळून पाहावे.

मासिक पाळीदरम्यान स्त्रिया गर्भवती राहू शकत नाही :

 

pregnancy-inmarathi
bostonglobe.com

मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध झाल्यास गर्भधारणा होत नाही, हा एक गैरसमज आहे. कारण स्त्रियांच्या शरीरात स्पर्म हे एका आठवड्यापर्यंत राहतात. अश्यात मासिक पाळी दरम्यान किंवा मासिक पाळी संपल्यावर गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


थंडीच्या मोसमात जास्त आजारी पडणे :

 

woman-wearing-winter-scarf-inmarathi
bt.com

हा देखील एक गैरसमज आहे. कारण वातावरण बदल्याने आपल्या शरीरातही तसे बदल घडत असतात. त्यामुळे आपण आजारी पडण्याचं कारण बदलेला ऋतू नाही आपली कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती असते.

अंधारात वाढल्याने किंवा जवळून टीव्ही बघितल्याने डोळे खराब होतात :

 

tv-inmarathi
wikybrew.com

कमी प्रकाशात वाचल्याने किंवा जवळून टीव्ही बघितल्याने डोळ्यांवर जोर पडतो पण त्यामुळे डोळ्यांवर कुठलाही दीर्घकालीन परिणाम होत नाही.

सप्लीमेंट्स आपल्याला हेल्दी बनवतात :

 

vitamin-supplements-inmarathi
faze.ca

रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, विटॅमिन सप्लीमेंट्स ह्यांचा आपल्या शरीराला काहीही फायदा नाही. उलट हे आपल्या शरीरासाठी नुकसानदायक आहे. तर अधिक प्रमाणात विटॅमिन सप्लीमेंट्स घेतल्याने कॅन्सर हा आजार होण्याची शक्यता वाढते.

दिवसातून कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावे :

 

organicfacts.net

८ ग्लास पाणी पिण्याची गोष्ट ही १९४५ साली तेव्हा सांगितल्या गेली जेव्हा नॅशनल रिसर्च कौन्सिलच्या फूड अॅण्ड न्युट्रिशन बोर्डने सांगितलं की, प्रत्येक व्यक्तीने एका दिवसात कमीत कमी २.५ लिटर पाणी प्यायला हवे. कारण २.५ लिटर पाणी हे खाण्यातून आपल्या शरीरात पोहोचत असतं.

अल्सर हे मसाल्याचे पदार्थ किंवा तणावामुळे होतात :

 

mouth-ulcers-inmarahi
revitalizingsmiles.com

आधी डॉक्टरांना वाटायचं की, अल्सर हे तणाव किंवा जास्त मसाल्याचं खाल्याने तसेच चुकीच्या जीवनशैलीमुळे होतात. पण आता त्यांना माहित झालं अधिकांश अल्सर हे हेलीकोबॅक्टर पायलोरी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतात.

पाठदुखी घालविण्यासाठी बेड रेस्ट करावा :

 

back-pain-inmarathi
prevention.com

हा निव्वळ एक गैरसमज आहे. बेड रेस्ट केल्याने कंबर किंवा पाठदुखी बरी होते असे अनेकांना वाटत असते पण खरेतर, रोजचे सामान्य काम करत राहिल्याने, सक्रीय राहिल्याने पाठदुखी लवकर बरी होऊ शकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *