स्त्रियांच्या लैंगिक भावनांबद्दल पुरुषांच्या मनातील काही पुरातन गैरसमज

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

स्त्रियांच्या लैंगिक भावनांशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल अजूनही आपल्या समाजात भरपूर गैरसमज आहेत. मुळात एखादी गोष्ट पहायची/ वाचायची/ बोलायची नाही अशी जेव्हा सक्ती केली जाते तेव्हा त्या गोष्टीबद्दल जास्त चर्चा होते असे म्हणतात. म्हणजे सक्ती अतिरेकाला कारणीभूत ठरते. कारण झाकलेल्या गोष्टीचे जास्त कुतूहल असते. स्त्रियांच्या लैंगिक भावनांच्या बाबतीतही हेच झाले आहे.

लहानपणापासून, लैंगिक समस्या- प्रश्न या वाईट गोष्टी असतात असे बिंबवले गेल्यानंतर माणूस जसा मोठा होत जातो तशी त्याची त्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढू लागते.

आणि मग आपण जी माहिती घेतोय ती खरी आहे की अर्धवट खरी आहे की पूर्णतः खोटी, याचा तो विचार करत नाही. जाणून घेणे ही प्राथमिकता…माहितीची सत्यता आणि निर्दोषता दुय्यम. याचे पर्यवसान अज्ञानात होते. आणि हळू आवाजात चालेल्या गप्पांमध्ये हे अज्ञान, गैरसमज आपल्याला सहज ऐकायला येतात.


 

social-taboos-inmarathi
responsibleanarchist.files.wordpress.com

स्त्री आणि पुरुष यांच्यातील निसर्गदत्त भेदाचा सन्मान करत जर सहजीवन फुलू दिले तर कुतूहल कमी होऊन योग्य माहिती मिळणे शक्य असते. पण ही परंपरा आपल्याकडे नाही हे दुर्दैव आहे. आणि म्हणूनच हे कोणत्या न कोणत्यातरी माध्यमातून हे गैरसमज दूर होणे गरजेचे असते. अशाच काही गैरसमजांची चर्चा आपण या लेखात करणार आहोत…

१. स्त्रियांची लैंगिक इच्छाशक्ती पुरुषांपेक्षा कमी असते.

स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या लैंगिक इच्छाशक्तीची तुलना केल्यास त्यात काहीच फरक नसतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या बाबतीत स्त्रियांच्या बद्दल असलेली विनाकारण “झाकून ठेवण्याची” वृत्ती या गैरसमजाला कारणीभूत असावी. अनेक जोडप्यांवर एकाच वेळी केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.


 

sexual-desire-inmarathi
criticalpages.com

असेही म्हटले जाते की स्त्रीचे लैंगिक आयुष्य पुरुषापेक्षा जास्त भावनाप्रधान असते, त्याची मानसशास्त्रीय संचिते समृध्द असतात, आणि संभोगावेळी तिच्या उत्तेजनाची तीव्रता या भावनिक गुंत्यावरून ठरते, पण या बाबतीतही तज्ञ असहमत आहेत. त्यांच्या मतानुसार, स्त्रीसुद्धा संभोगाच्या वेळी भावनेपेक्षा शारीरिक गरजेला जास्त महत्व देत असते.

तिच्या लैंगिक इच्छा पुरुषाइतक्याच वास्तव असतात आणि शरीरसुख मिळवणे हा त्या वेळचा मुख्य हेतू असतो. भावना वगैरे गोष्टीचा इथे फारसा संबंध येत नाही.

२. स्त्रियांचा लैंगिक प्रतिसादाचा क्रम प्रथम इच्छा, नंतर उत्तेजना आणि त्यानंतर भावनोत्कटता असा असतो.

हाही एक सर्वसाधारण गैरसमज आहे. इच्छेनंतर उत्तेजना हा क्रम चुकीचा आहे असे तज्ञ म्हणतात. कारण उद्दीपनाशिवाय इच्छा निर्माण होऊ शकत नाही. लैंगिक उद्दीपन ही सर्वात पहिली पायरी. कारण स्त्रीच्या मनात इच्छा नसताना पुरुषाच्या सहवासातून उद्दीपन होऊ शकते. आणि इच्छा ही या चक्राच्या कोणत्याही पायरीवर उत्पन्न होऊ शकते.


 

Sexual-response-cycle-inmarathi
wikipedia.com

भावनोत्कटता ही संपूर्ण समाधानाच्या नंतर येत असते. विल्यम मास्टर आणि व्हर्जिनिया जॉन्सन या दोन तज्ञांनी साधारण मानवी लैंगिक प्रतिसादचे चक्र (human sexual response cycle) सांगितले आहे. त्यात उद्दीपन हे सर्वात पहिली पायरी आहे. त्यानंतर पुर्वक्रीडेतून त्या उद्दिपनाचा सर्वोच्च स्तर, त्यानंतर संभोग आणि त्यातून समाधान असा क्रम आहे. प्रथम इच्छा होत असते असे म्हणणे बरोबर कसे?

३. तब्बल ४३ % स्त्रीयांना लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो.

१९९९ साली एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात त्यांनी असा निष्कर्ष नोंदवला की ४३ टक्के स्त्रीयांना लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. पण हा निष्कर्ष चूक आहे असे तज्ञांचे मत आहे. कारण या सर्वेक्षणात मुळात जे प्रश्न विचारले गेले ते “हो किंवा नाही” या स्वरूपाचे अवघे सात प्रश्न होते. पण या प्रश्नांच्या उत्तरातून समस्या आहे की नाही याचा अंदाज लावणेच अवघड होते.


 

sexual-dysfunction-among-women-inmarathii
xsandos.net

मुळात एखादी समस्या लैंगिक आहे की नाही हे आपले आपल्यालाच कळण्याइतकी जागरुकता आपल्याकडे आहे काय? त्यामुळे लैंगिक समस्या नक्की किती टक्के स्त्रीयांना असू शकतात याचा अंदाज लावणे अवघड आहे.

४. एखाद्या स्त्रीला उच्च लैंगिक भावना असणे ही आश्चर्यजनक गोष्ट आहे.

वेन्टलॅड अॅन्ड कलीग या संस्थेने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या एका सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की जवळपास बावन्न टक्के स्त्रियांना उच्च लैंगिक भावना असते. ९३२ स्त्रियांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांतून त्यांनी हा निष्कर्ष नोंदवला आहे.


 

women-sexual-desire-inmarathi
m0.her.ie

स्त्रियांच्या लैंगिक भावना पुरुषांपेक्षा कमी असायला हव्यात आणि पुरुषाने स्त्रीवर शारीरिक वर्चस्व गाजवायला हवे या वर्चस्वाच्या भावनेत या गैरसमजाचे मूळ आहे. पण स्त्री आणि पुरुषांच्या लैंगिक भावनांमध्ये जीवशास्त्रीय पातळीवर काहीच फरक नसतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

५. स्त्रियांच्या उद्दिपनाला तुलनेने जास्त वेळ लागतो.

नव्वद सेकंदाच्या पुर्वक्रीडेतून पुरुष पूर्णतः उद्दीपित होऊ शकतो आणि स्त्रीला जास्त वेळ हवा असतो असे साधारणतः मानले जाते. हा समजही चूक असल्याचे तज्ञ म्हणतात. मॅकगिल विद्यापीठात झालेल्या अभ्यासात दिसून आले की स्त्री आणि पुरुष दोघांच्याही उद्दिपानाला लागणारा कालावधी हा तंतोतंत समान असतो.


 

foreplay-inmarathi
hearstapps.com

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्दीपन होण्याकरिता भावनिक तयारी वगैरे असावी लागते हाही चुकीचा समाज असल्याचे लक्षात आले आहे. पण, स्त्रीयांना उद्दीपित होऊन समाधानाकडे जायला लागणारा काळ पुरुषापेक्षा जास्त असतो ही गोष्ट खरी आहे. स्त्री आणि पुरुषाच्या लैंगिक उद्दिपानामध्ये शास्त्रीयदृष्ट्या वेळेचा फरक असणे कसे शक्य आहे? या गैरसमजाचे समाधान अभ्यासातून झाले आहे.

विशेषतः भारतात या विषयाला सार्वजनिक माध्यमात स्थान नसल्यामुळे हा गैरसमज स्पष्ट दिसून येतो.

एखाद्या पुराणातील कथेच्या बाबतीत असतात तशा स्त्रियांच्या लैंगिक भावनांच्या बाबतीत आपल्याकडे अनेक आख्यायिका आहेत.

सर्व बाबतीत पुढे जाणारा समाज या बाबतीत असा अज्ञानात राहतो ही गोष्ट किती चांगली आणि किती वाईट हे आपले आपण ठरवायचे आणि त्यानुसार कृती करायची आहे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?