“शारीरिक संबंधांमुळे ‘पवित्र’ प्रेम’अपवित्र’ होतं” असं वाटणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

प्रेम म्हणजे काय? शारीरिक संबंध म्हणजे काय? पौगंडावस्था, आकर्षण, स्पर्श इत्यादी नाजूक पण महत्वाच्या गोष्टींच्या बाबतीत आपला समाज फार काही सुशिक्षित नाही असे दिसते. या गोष्टी बऱ्याचदा चारचौघात बोलणेही टाळले जाते.

InMarathi Android App

सामाजिक संकेत तर आहेतच पण त्याबरोबर आलेला एक प्रकारचा न्यूनगंडही या मौनाला कारणीभूत आहे. 

एकतर प्रेम म्हणजे पवित्र नातं वगैरे असतं, आणि शारीरिक संबंध म्हणजे काहीतरी घाणेरडी गोष्ट असून असे संबंध ठेवल्याने प्रेमाची पवित्रता नष्ट होते हा अगदीच खुळचट गैरसमज आपल्याकडे रूढ आहे. पण यात कितपत तथ्य आहे?

शारीरिक संबंध ठेवल्याने खरंच प्रेमाचे पवित्र नाते अपवित्र होते का?

या सगळ्या गोंधळाच्या मुलाशी एक अत्यंत चुकीची धारणा आहे आणि ती म्हणजे, शारीरिक संबंध अपवित्र असतात. षड्रिपू म्हणून माणसाचे जे सहा शत्रू सांगितले जातात, “काम क्रोध लोभ मोह मद मत्सर”, त्यापैकी एक “काम” म्हणजे शारीरिक संबंध.

 

The arab country sex culture.Inmarathi2
bbci.co.uk

याचा अर्थ ज्या नैसर्गिक क्रियेमुळे मानव आपले अस्तित्व टिकवून आहे तिला आपण थेट शत्रू म्हणून घोषित केले आहे.

असे असताना शारीरिक संबंध ठेवल्याने पवित्र नाती अपवित्र होतात वगैरे चुकीचे समाज पसरणे साहजिकच आहे. पण हा समाज आपल्यासाठी हितावह नाही. त्यामुळे या विषयावर जास्तीत जास्त लेखन, चर्चचा आणि या माध्यमातून प्रबोधन होणे गरजेचे आहे.

प्रेम या एकाच गोष्टीभोवती सर्व मानवी कृती गुंतलेल्या आहेत असे कुणी म्हटले तर किती जण विश्वास ठेवतील? या प्रश्नाच्या मुळात जाण्याआधी प्रेम म्हणजे काय हे आधी समजून घेतले पाहिजे.

शाळा कॉलेजच्या दिवसात होणारे भावनांचे खेळ म्हणजेच जर कुणी प्रेम समजत असेल तर आधी प्रेम हे किती वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते याचा विचार झालेला बरा.

त्यासाठी प्रेमाची भावना उत्पन्न करणाऱ्या घटकांचा आधी विचार व्हायला हवा. आपल्याकडे नेमके हेच होताना दिसत नाही. प्रेम म्हटले की त्यावर एक सामाजिक सेन्सॉरशिप येऊन बसते जिच्यात या विषयावर उघड बोलणे, ते व्यक्त करणे, नैतिक मार्गाने ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे सगळेच थोड्या फार फरकाने निषिद्ध मानले जाते.

 

fandry-inmarathi
Netflix

आता या सामाजिक नैतिकता देखील बऱ्याचदा अतार्किक असतात बरं..!

म्हणजे प्रेम आणि प्रणय या दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या अस मानण्याची आपल्याकडे एक मोठी दुतोंडी परंपरा आहे.

कामवासना व्यक्त करण्याच्या मानवी सुप्त इच्छेचं सुसंस्कृत रूप म्हणजे प्रेम असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. परंतु जेंव्हा आपण या दोन्ही गोष्टी वेगळ्या करू इच्छितो तेंव्हा गल्लत होत असते. अशा गल्लतीतून मग पवित्र आणि अपवित्र प्रेम असा काहीसा भेद सुरू होतो आणि एका नव्या गोंधळ पर्वाला सुरवात होते.

प्रेम हे पवित्र की अपवित्र हे ठरवायचा निकष हा मुख्यतः शरीरसंबंधांशी जोडलेला असतो. जर विवाहपूर्व स्थितीत शरीर संबंध ठेवले तर ते पाप असे मानण्याची एक सामाजिक प्रथा आपल्याकडे आहे.

आधुनिक विचारांचा स्वीकार करताना आपल्या सोयीचा तेवढा भाग घेणाऱ्या आपल्या समाजाचा हा दांभिकपणा आहे.

आधुनिक समाजात व्यक्ती ही सामाजिक बंधनांची केंद्रबिंदू असायला हवी. पण त्यांने समाजाचे आज पर्यंतचे जे स्थान होते ते ढासळायला लागते आणि मग अशा व्यवस्थेमुळे फायद्यात असणारे लोक समाज नियंत्रणाचा असा अर्धवट प्रयत्न करतात.

 

slumdog-inmarathi
blogs.reuters.com

त्यांच्या हे लक्षात येत नाही की शरीरसंबंध ठेवणे ही पूर्णतः त्या व्यक्तीची खाजगी बाब आहे. जोपर्यंत कायदा आड येत नाही तो पर्यंत त्या व्यक्तीला त्याच्या इच्छेने वागण्याचा पूर्ण अधिकार आहे.

प्रेमाचे पवित्र आणि अपवित्र असे प्रकार करण्यात समाजाचं प्रतीक असलेले चित्रपट देखील कारणीभूत आहेत. त्यामुळे शरीरसंबंध या नैसर्गिक क्रियेला ‘काहीतरी दैवी’ असे स्वरूप देण्यात आले आहे. दैववादावरच पाप पुण्य पवित्र अपवित्र असे थोतांड पोसता येते.

समाजाच्या नियमनासाठी लग्नविषयक कायदे असावेत. त्यात कुणाही एकाचा शारिरीक छळ किंवा कुचंबणा होता कामा नये.

यासाठी अधिकार मिळवून देणारे कायदेही हवेत परंतु व्यवस्थेला समांतर अशी व्यवस्था बनवून लोकांच्या खाजगी बाबीत दखल देऊन त्यांना दैववादी बनवणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिकारांचे चुकीचे नियमन करणे कितपत योग्य आहे?

अशा खुळचट विचारांना थारा देणारी आजची तरुणपिढीही तेवढीच जबाबदार आहे.

 

social-taboos-inmarathi
responsibleanarchist.files.wordpress.com

शरीरसंबंध किंवा कामवासना ही नैसर्गिक बाब आहे हे एकीकडे खाजगीत मान्य करायचे, बहुतेकदा तसे वर्तन देखील करायचे. परंतु जेंव्हा समाजासमोर यायचे तेंव्हा हे सर्व लपवून ‘पवित्र अपवित्र’च्या खेळात सामील व्हायचे हे अत्यंत निराशाजनक आहे.

आज प्रत्येक ठिकाणी आधुनिकतेची गरज बोलून दाखवणारी तरूणपिढी देखील विचारातील आधुनिकतेला मंदिरा बाहेर काढलेल्या पादत्राणांप्रमाणे सोडून समाजात वागत असते.

शारीरिक आवेगातून शरीरसंबंध प्रस्थापित झाले आणि त्यानंतर आपण अपवित्र काहीतरी केले असे मानून आतल्याआत झुरणारे कित्येकजण आपल्या आजूबाजूला दिसतील.

परंतु संवादाचे बंद असलेले मार्ग आणि अशा खुळचट कल्पनांची त्याला असलेली जोड यामुळे तिकडे न पाहता आला दिवस ढकलायची आपली सवय झाली आहे.

 

hidden-love-inmarathii
theartist.me

कामवासनेचा बाऊ न करता तिला इतर नैसर्गिक इच्छांप्रमाणे वागवल्यास प्रेम आणि त्यासंबंधित बऱ्याच गोष्टींची उत्तरे सोपी होऊन जातील. शरीरसंबंधाला अशी फटकून वागवणूक देण्याने, त्याबद्दल उघड संवाद टाळण्याने त्याबद्दल जे अधिकचे कुतूहल निर्माण होते त्याचा उद्रेक आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो.

शरीरसंबंध हे भावनांशी निगडित असतात हे जेवढे सत्य तेवढेच त्या भावना फक्त एकाच व्यक्ती बद्दल निर्माण होतात हे खोटे आहे.

एकाच वेळी अनेक व्यक्तींची शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा माणसाचा स्थायीभाव असल्याने त्याला संस्कृतीची कितीही खोटी कोंदणे लावली तरी त्याच्या मूळ गुणात फरक पडणार नाही.

आज माणूस सर्व सजीवांमध्ये आपली वेगळी ओळख बनवू शकला ते त्याच्या याच गुणामुळे…त्याचा प्रेम करण्याच्या भावनेमुळे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *