' १२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘श्रीकृष्णाचा चेंडू’! – InMarathi

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘श्रीकृष्णाचा चेंडू’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत म्हणजे आश्चर्याचा देश असे म्हटले तर वावगे ठरू नये. भारतात प्रत्येक ठिकाणी काही न काही अद्भुत, अविश्वसनीय असं ऐकायला आणि पाहायला मिळतं. अशीच एक अद्भुत आणि अविश्वसनीय गोष्ट आहे- भारतातील एक दगड!

अहो खरंच हा दगड खूप खास आहे. गेल्या १२०० वर्षांपासून एका सिद्धपुरुषासारखा एकाच ठिकाणी हा दगड टिकून आहे. तेव्हापासून आजपर्यंत एकही सजीव प्राणी या दगडाला हलवू शकलेला नाही. तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरममध्ये ठाण मांडून बसलेला हा दगड आजही तेथे जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो.

या दगडाला स्थानिक भाषेत Vaan Irai Kal (Krishna’s Butterball) अर्थात कृष्णाचा प्रचंड चेंडू म्हणून ओळखले जाते.

 

mahabalipuram-stone-marathipizza01

स्रोत

या भल्यामोठ्या दगडाकडे पाहिल्यावर सर्वप्रथम तुम्हाला वाटेल की तो पडायला आलंय की काय? पण तसं अजिबात नाहीये. अहो ७ हत्ती एकत्र आले तरी हा दगड हलत नाही.

एका उतारावर हा प्रचंड दगड टिकून आहे. हा दगड जवळपास १२०० वर्षे जुना असून त्याची उंची २० फुट आणि रुंदी ५ फुट इतकी आहे. याचे वजन तब्बल २५० टन इतके आहे.

 

mahabalipuram-stone-marathipizza02

स्रोत

इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला एकाच चिंता लागून राहिलेली असते की दुर्दैवाने जर हा गडद कोसळला तर त्यामुळे काय हाहाकार होईल सांगता येत नाही. याच विचाराने १९०८ साली आर्थर हॅवलॉक या ब्रिटीश गव्हर्नरने ७ हत्तींच्या सहाय्याने हा दगड ओढून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, पण सारे प्रयत्न निष्फळ ठरले. हा दगड तसूभरही हलला नाही.

 

mahabalipuram-stone-marathipizza03

स्रोत

असे म्हटले जाते की या दगडाचे संतुलन पाहून दक्षिणेचा राजा चौल इतका प्रभावित झाला की त्यातून त्याने Tanjavur Bommai या कधीही खाली न पडणाऱ्या बाहुलीची निर्मिती केली. म्हणजे जेव्हा तुम्ही तिला पाडायचा प्रयत्न करता तेव्हा ती पुन्हा सरळ होते.

===

 

mahabalipuram-stone-marathipizza04

स्रोत

हा दगड Ollantaytambo and Machu Picchu च्या दगडांपेक्षाही अतिप्रचंड आणि वजनदार आहे. सध्या हे ठिकाण पर्यटकांमध्ये फारच प्रसिद्ध असून रोज शेकडो पर्यटक या दगडाची भेट घेण्यासाठी येतात.

 

mahabalipuram-stone-marathipizza05

स्रोत

काय मग? देणार ना भेट या महाबली दगडाला?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?