कंडोमचा शोध लागला नव्हता तेव्हा गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या गेल्यात या विचित्र पद्धती !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आधुनिक काळात गर्भधारणा होण्यापासून रोखण्याच्या अनेक टेक्निक आणि साधन उपलब्ध आहेत. पण ज्या काळात हे सर्व साधनं उपलब्ध नव्हते तेव्हा स्त्रिया गर्भवती होण्यापासून वाचण्यासाठी कुठले कुठले उपाय करत असतील? तेव्हाचे लोक गर्भधारणा रोखण्यासाठी खूप विचित्र अश्या पद्धती वापरत असतं.

 

Contraception-inmarathi
thanhthieunien.com

लोखंडाचं पाणी :

 

iron-water-inmrathi
videohive.net

ग्रीसमध्ये स्त्रियांना ते पाणी प्यायला दिल्या जायचं ज्यात लोहार आपले अवजार थंड करतो. ह्यांनी शुक्राणू हे योनीतच नष्ट होऊन जात. एवढचं नाही तर चीनमध्ये स्त्रियांना लेड आणि मर्क्युरीचे मिक्श्चर प्यायला दिले जात होते. हे मिक्श्चर एवढं नुकसान दायक होत की, गर्भाशयच नाही तर किडनी आणि मेंदूला देखील इजा पोहोचत होती.

कोक :

 

COKE-INMARATHI
YOUTUBE

काय कोक पिल्याने शुक्राणू नष्ट होऊ शकतात? १९५० ते १९६० दरम्यान हावर्ड मेडिकल स्कूल ने बर्थ कंट्रोल लॅब मध्ये अनेक प्रकारचे शोध लावण्यात आले. एन्डरसन, हिल आणि एम्पियर नावाच्या वैज्ञानिकांनी चार प्रकारच्या कोकना शुक्राणूसोबत मिक्सकरून बघितले. तर ह्यात असे दिसून आले की, डायट कोक ने सर्व शुक्राणूंना एका मिनिटांत नष्ट केले. तर इतर ४१ टक्के शुक्राणू हे इतर कोक मध्ये नष्ट झाले नाहीत. एन्डरसन ह्यांनी सांगितले की, कोकमधील कार्बोनिक अॅसिड ने शुक्राणूंना मारले.

लिंबू :

 

lemon juice-inmarathi01
postsod.com

गर्भधारणा होण्यापासून थांबिण्यासाठी आधीच्या काळी लोक लिंबाचा वापर देखील करत असतं. असे मानल्या जाते की, ह्यामध्ये सायट्रस अॅसिड हे स्पर्म ला नष्ट करू शकतात. पण हे घातक असू शकते.

अफू  :

 

afim-inmarathi
kolkata24x7.com

इंडोनेशिया च्या सुमात्रामध्ये स्त्रिया अफूच्या झाडाचा वापर संभोग करताना करायच्या जेणेकरून त्या गर्भवती होणार नाहीत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?