जाणून घ्या मासिक पाळीबद्दल काय सांगतात जगातील प्रमुख धर्म!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

या आधुनिक जगात जरी माणसाला विचारांचे स्वातंत्र्य असले, तो स्वत:ला कितीही मुक्त म्हणत असला तरी काही अश्या गोष्टी आहेत ज्यांचा उल्लेख मात्र तो मुक्त वा स्वतंत्रपणे करू शकत नाही. त्यापैकीच एक म्हणजे मासिक पाळी होय. एखाद्या स्त्रीच्या शरीरामध्ये होणाऱ्या या बदलाला कर्मठ मानसिकतेमुळे एखादे पाप असल्यासारखे पाहिले जाते. याचमुळे महिलांना देखील या मासिक पाळीमुळे प्रत्येक ठिकाणी अवहेलना सहन करावी लागते. तुम्हाला माहीतच असेल कि हिंदू धर्मामध्ये मासिक पाळीच्या वेळी महिलांना अनेक ठिकाणी प्रवेश नसतो, त्यांना एका कोपऱ्यात राहावे लागते. कोणीहि त्यांना स्पर्श करू शकत नाही अश्या प्रथा आहेत.

InMarathi Android App

पण फक्त हिंदू धर्मामध्येच मासिक पाळीबद्दल सांगितले आहे असे नाही, तर प्रत्येक धर्माचे मासिक पाळीबद्दल ठराविक नियम आहेत. ते देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे.

 

ख्रिश्चन धर्म:

menstruating-marathipizza0
vice.com

ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म होय. बायबल मध्ये Menstruation अर्थात मासिकपाळीचा उल्लेख तेव्हा सापडतो जेव्हा इव सफरचंद खाते. सामान्यत: ख्रिश्चन धर्मामध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना चर्च मध्ये प्रवेश दिला जातो, पण काही कट्टरपंथीय ख्रिश्चन अश्या वेळेस स्त्रियांना धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ देत नाहीत. परंतु हळूहळू या धर्मातील आधुनिकीकरणाच्या प्रवेशामुळे मासिक पाळीबद्दलचा लोकांचा दृष्टीकोन बदलत चाललाय. पश्चिमेकडील देश जे काही काळापूर्वी मासिक पाळी म्हणजे अपवित्र मानायचे ते आता याच मासिक पाळीकडे पुरोगामी दृष्टीने पाहू लागले आहेत.

 

इस्लाम धर्म:

menstruating-marathipizza02
islam.ru

कुराण मध्ये मासिक पाळीबद्दल अतिशय सखोल अशी माहिती सापडत नाही. परंतु एके ठिकाणी असा धागा सापडतो जेथे स्पष्ट लिहिलेले आहे की, “या काळात पुरुषांनी महिलांपासून दुर रहावे.” परंतु याचे कारण देताना पुढे असेही म्हटले आहे की, “मासिक पाळी अपवित्र आहे म्हणून महिलांपासून दूर राहू नये तर या काळात त्यांना वेदना आणि समस्यांना सामोरे जावे लागते.” पण इस्लाममध्येही या काळात महिलांना धार्मिक कार्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. यामागचे कारण असे दिले जाते की, मुहम्मद यांची पत्नी ‘आयशा’ यांना मासिक पाळीमुळे मक्केची यात्रा करता आली नव्हती आणि तेव्हा मुहम्मदांनी सांगितले होते की, “आदमच्या मुलींसाठी अल्लाहची हीच इच्छा असेल.”

 

हिंदू धर्म:

menstruating-marathipizza03
indiafacts.org

हिंदू धर्मामध्ये मासिक पाळी अपवित्र असल्याचे सांगितले गेले आहे, पण ही अपवित्रता मासिक पाळी संपल्या संपल्या नष्ट होते. हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे या काळात महिलांना घराबाहेर एका झोपडीत राहावे लागते, तेथे त्यांना वेगळ्या भांडयामध्ये जेवण दिले जाते, त्या घरातील कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू शकत नाहीत. या काळात त्या अंघोळ करू शकत नाहीत की केस विंचरू शकत नाहीत. धार्मिक कार्यामध्ये त्या सहभागी होऊ शकत नाही. पण याला अपवाद आहेत दक्षिणेतील काही हिंदू समुदाय, जेथे मासिक पाळीच्या काळ हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मुलीला दुधाचा अभिषेक केला जातो. तिला नवीन साडी आणि दागिने घालून नटवले जाते.

 

यहुदी धर्म:

menstruating-marathipizza04
blogs.ft.com

मासिक पाळीला यहुदी धर्मामध्ये ‘निद्दाह’ म्हटले जाते. मासिक पाळीबद्दल सर्वात सखोल विश्लेषण कोणत्या धर्मात केले गेले असेल तर ते यहुदी धर्मामध्ये! या काळात महिलेचा कोणाला स्पर्श झाला तर तो मनुष्य अपवित्र होतो असे मानले जाते. यहुदी धर्मामध्ये जोवर ती महिला पवित्र होत नाही तोवर तिला अस्पृश्य दर्जाची वागणूक दिली जाते. काही समुदायांमध्ये तर बायकोकडे पाहण्यास किंवा तिचा आवाज ऐकण्यावर देखील मनाई आहे.

 

बौद्ध धर्म:

menstruating-marathipizza05
gbtimes.com

बौद्ध धर्मात मासिक पाळी ही प्रक्रिया नैसर्गिक असल्याचे मानले जाते. जर एखादी बुद्धीस्ट नन मासिक पाळीच्या काळात असेल तर तिने आपले कपडे धुवूनच परिधान करावे असे सांगितले गेले आहे. असे केल्यास ते कपडे पवित्र आणि स्वच्छ मानले जातात.

 

शीख धर्म:

menstruating-marathipizza06
ikhtours.in

शिखांच्या पहिल्या गुरूंनी मासिक पाळी हि केवळ एक सामान्य प्रक्रिया असून त्याकडे सामान्यपणेच पाहायला हवे असे सांगितले आहे. शीख धर्मामध्ये अनेक ठिकाणी असाही उल्लेख आहे की, “आईच्या रक्तानेच जीवनाची सुरुवात होते.” त्यामुळे शीख धर्मामध्ये मासिक पाळी संदर्भात कोणत्याही वेगळ्या प्रथा सांगितलेल्या नाही आहेत. मासिक धर्मामध्ये स्त्रियांनी वापरलेले कपडे ‘खराब’ आहेत असे म्हणणेही उचित नसल्याचे या धर्मात सांगण्यात येते.

असे आहेत प्रत्येक धर्माचे मासिक पाळी बद्दल विचार! पण आपल्या भारतामध्ये एक गोष्ट अतिशय दुर्दैवी म्हणावी लागले की एकीकडे आपण प्रसिद्ध कामाख्या मंदिरामध्ये ‘Bleeding Goddess’ च्या योनीची पूजा करतो तर दुसरीकडे तिचेच रूप असलेल्या स्त्रीला मात्र मासिक पाळीमध्ये हीन दर्जाची वागणूक देतो, देवापासून दुर ठेवतो.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *