जपानी लोकांमधील “अॅनिमेटेड कॅरेक्टर्स” सोबत लग्न करण्याचं खूळ!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आतापर्यंत आपण माणसांची लग्न बघितली असणार. एवढंच नाही तर क्वचित प्रसंगी प्राण्यांची देखील लग्न होताना बघितली असणार. पण यासर्वांना मागे टाकत जपानने आता एक नवीनच लग्न प्रकार अस्तिवात आणला आहे… आता येथील लोक चक्क अॅनिमेटेड कॅरेक्टर्स सोबत लग्न करायला लागले आहेत.

जपान येथे मागील काही वर्षांपासून लोकं लग्न आणि मुलं यांपासून दूर राहायला लागली आहेत. तेथील लोकं या जबाबदाऱ्यांपासून घाबरायला लागले आहेत. पण येथील एका कंपनीने याही गोष्टीचा फायदा कसा उचलायचा याकरिता एक अजबच शक्कल लावली आहे.

 

japan people marrying animated characters inmarathi
asiaone.com

या कंपनीने पुरुष आणि अॅनिमेटेड कॅरेक्टर्स यांच्या लग्नाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.


ओटाकू संस्कृतीनुसार, Waifu एक अशी अॅनिमेटेड मुलगी आहे जिला जपानी पसंत करतात. Waifu हे नाव इंग्रजी शब्द वाईफ यापासून घेण्यात आला आहे. तर हसबंड हा शब्द पुरुषी कॅरेक्टरकरिता वापरण्यात येतो.

एका स्पेशल गेटबॉक्स वेबसाईटनुसार ज्या लोकांना या विचित्र लग्नात इंटरेस्ट असेल ते त्याचं मॅरेज रजिस्ट्रेशन करू शकतात. या साईटवर मॅरेज रजिस्ट्रेशन फॉर्म डाऊनलोड करून तो सबमिट करण्याचं ऑप्शन देखील देण्यात आले आहे.

 

japan-marriage-inmarathi01
asiaone.com

पण अॅनिमेशन आवडणाऱ्यांकडे एका पेक्षा जास्त Waifu असू शकतात, त्यामुळे या कंपनीने या करिता एक अट ठेवली आहे. कंपनीच्या अटीनुसार कोणीही व्यक्ती केवळ एकाच कॅरेक्टर्स ला रजिस्टर करू शकते. मग अश्यात अॅनिमेटेड कॅरेक्टर्सच्या दिवान्यांना त्यांच्या आवडीची Waifu निवडण्यात नक्कीच कठीण जाईल.

 

japan-marriage-inmarathi03
gateboxlab.com

लग्नाकरिता रजिस्टर करण्याव्यतिरिक्त गेटबॉक्स हा जॉब करिता अप्लिकेशन देखील घेतो आहे. जे लोकं या कंपनीमध्ये घेतल्या जातील आणि त्यांनी त्यांच्या Waifu लग्नाकरिता रजिस्ट्रेशन केलं असेल, त्यांना दरमहा ६० डॉलर्सचा स्टाईपेंड देखील देण्यात येईल. या व्यतिरिक्त गेटबॉक्स कर्मचारी त्यांच्या Waifu चा जन्मदिवस साजरा करण्याकरिता एका दिवसाची सुट्टी देखील घेऊ शकतात.

जपान हे अॅनिमेटेड कॅरेक्टर्सकरिता खूप वेडे आहे. तिथले लोकं त्यांच्या आवडत्या अॅनिमेटेड कॅरेक्टर्सचा जन्मदिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करतात.

यासोबतच गेटबॉक्स एक प्रोडक्ट देखील काढतो आहे. ज्याचं नाव गेटबॉक्स वर्चुअल होम रोबोट आहे. या डीवाईसमध्ये अॅनिमेशन गर्लची एक छोटीशी होलोग्राफिक फोटो आहे, जी वॉइस कमांड्सवर प्रतिक्रिया देते. हे कॅरेक्टर्स वर्चुएल असिस्टेंट प्रमाणे काम करतात. हे लाईट लावू शकतात, गाणी वाजवू शकतात तसेच एका स्मार्टफोन अॅपच्या आधारे आपल्या मालकाशी संपर्क देखील साधू शकतात.

या प्रोडक्टमध्ये सध्या दोन अॅनिमेटेड गर्ल्स आहेत, एकीच नाव हिकारी अजुमा आणि दुसरीच Hatsune Miku आहे. Hatsune Miku हिने नुकताच तिचा १० वा वाढदिवस साजरा केला आहे.

Waifu रजिस्ट्रेशन ही एखादी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते, ज्यावरून लोकांना कुठलं कॅरेक्टर जास्त आवडत आणि कुठल्या नवीन कॅरेक्टर ला ते पसंती देतात हे माहिती पडेल, असे काही लोकांना वाटते.

 

japan-marriage-inmarathi

सोशल मिडीयावर या विचित्र प्रकारच्या लग्नालाबाबत अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कोणी म्हणत आहे की हा प्रकार म्हणजे मानवाच्या स्वार्थीपणा कळस आहे, आताच्या काळात लोकं लोकांसोबत नाही तर रोबॉट सोबत राहणे जास्त पसंत करत आहेत, माहित नाही हे जग कुठे चाललंय…तर कोणी म्हणत आहे की, माणूस आता भरवश्याच्या लायकीचा राहिलेला नाही, त्याएवजी जर एखादा रोबॉट असेल तर तो तुम्हाला कधीही दुखवू शकणार नाही…

ह्या लग्नाचा asiaone.come ने दिलेला वृत्तांत ह्या व्हिडीओ मध्ये बघू शकता :

 

 

पण अश्या प्रकारे एखाद्या रोबॉटशी लग्न करणे कितपत योग्य आहे आता हे तुम्हीच ठरवा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *