' भारताला गवसलेली नवी “वेटलिफ्टिंग विनर” : मीराबाई चानू – InMarathi

भारताला गवसलेली नवी “वेटलिफ्टिंग विनर” : मीराबाई चानू

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये ४८ किलो वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्ण पदक मिळवून भारताची मान उंचावली आहे. तिच्या ह्या कामगिरीमुळे आजवर अनोळखी असलेलं मीराबाई चानूचं नाव आज प्रत्येक भारतीयाच्या ओठावर आहे.

वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात १९६ किलो वजन उचलले. ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु आहेत.

 

mirabai-chanu-inmarathi02
business-standard.com

स्नॅच कॅटेगरीमध्ये तिने पहिले ८० किलो, त्यानंतर ८४ किलो आणि त्यानंतर ८६ किलोचा भार उचलून सुवर्ण पदक कमावले. ८६ किलो एवढे वजन उचलून तिने कॉमनवेल्थ खेळांमध्ये एक नवीन रेकॉर्ड केला आहे.

स्नॅच कॅटेगरीनंतर क्लीन अॅण्ड जर्क राउंडमध्ये मीराने पहिल्या प्रयत्नात १०३ किलो वजन उचलले. दुसर्या वेळी तिने १०७ किलो वजन उचलून स्वतःचाच कॉमनवेल्थ खेळांचा रेकॉर्ड तोडला आहे. तर तिसर्या प्रयत्नात तिचे ११० किलो एवढे वजन उचलले.

 

mirabai chanu-inmarathi05
newsx.com

कॉमनवेल्थ खेळांच्या आधिकारिक ट्विटर हॅण्डल वरून ट्विटद्वारे ही माहिती दिल्या गेली की, मीराबाई चानुने ६ प्रयत्नात ६ रेकॉर्ड तोडले. एवढचं नाही २०१८ सालच्या पद्म पुरस्कारांमध्ये २३ वर्षीय चानूला देखील पद्म श्री देऊन सन्मानित करण्यात आले.

पण एक वेळ अशी देखील होती जेव्हा चानुने ह्या खेळाला नेहेमीकरिता सोडण्याचा विचार केला.

 

CWG 2mirabai-chanu-inmarathi04
business-standard.com

२०१६ सालच्या ऑलिम्पिक खेळांत मीराबाई चानुने क्वालिफाय तर केले पण ती तिथे पदक मिळविण्यात अयशस्वी ठरली होती. ज्यानंतर तिने हताश होऊन नेहेमिकरिता खेळापासून दूर व्हायचा निर्णय घेतला होता.

मीराने Anaheim येथे झालेल्या World Championships मध्ये १९४ किलो वजन उचलून केवळ सुवर्ण पदकच जिंकले नाही तर एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड देखील आपल्या नावे केला आहे.

 

mirabai chanu-inmarathi
thehindu.com

मीराबाई चानू हिचा जन्म इम्फाल येथून २० किलोमीटर दूर असलेल्या Nongok Kakching नावाच्या गावात झाला. ती ६ भाऊ-बहिणींमध्ये सर्वात छोटी आहे. एक वेळ होती जेव्हा मीरा ही आपल्या भावासोबत पहाडांवर लाकडं जमा करायला जायची.

तिचा भाऊ Saikhom Sanantomba Meitei याने PTI ला सांगितले की,

एका दिवशी मी लाकडांच एक बंडल उचलू शकत नव्हतो कारण ते खूप वजनी होतं, पण मीराने त्या बंडलला अगदी सहजपणे उचलून घेतलं आणि एवढंच नाही तर तिथून २ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या आमच्या घरपर्यंत देखील घेऊन आली. तेव्हा ती केवळ १२ वर्षांची होती.

 

mirabai chanu InMarathi

Saikhom Sanantomba Meitei ने हे देखील सांगितलं की, कुटुंबाची परिस्थिती बेताची असताना देखील स्वतःच्या मेहनतीच्य जोरावर मीराने हे यश गाठलं आहे. आम्ही कधीही ह्याचा विचार कला नव्हता की ती एवढी पुढे जाईल.

मीराबाई चानुच्या ह्या यशानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी तिला २० लाख रुपये पुरस्कार म्हणून घोषित केले आहे.

मीराबाई चानू हिने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की जिद्द असेल तर कोणीही त्यांना हवं ते ध्येय साध्य करू शकतो..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?