रोजच्या वापरातील ‘ही’ औषधं गंभीर लैंगिक समस्यांची कारणं ठरू शकतात…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===


एका चांगल्या सेक्स लाईफसाठी तुमचे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असणे फार गरजेचे असते. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच लक्ष हे आरोग्यावर कमी आणि कामावर जास्त आहे.

त्यामुळे आपल्याला नानाविध आजारांची जडण होते, आणि त्यासाठी आपण औषधांच्या आहारी जातो.

 

medicines-inmarathi01
choice.com.au

नेहमी ही औषधघेत राहिल्याने आपल्यातील कामेच्छा कमी होऊ लागते. अश्यात मग आपण आपली सेक्स लाईफ हवी तेवढी एन्जोय करू शकत नाही आणि त्याचा प्रभाव आपल्या संबंधांवर होतो.

त्यामुळे कुठली औषधे घेतल्याने असं होत हे माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या औषधांपासून दूर राहून आपण आपले जीवन अधिक आनंदाने जगू शकतो.

 

sex-freuency-inmarathi
evanmarckatz.com

ब्लड प्रेशरची औषधे :

आजकाल कमी वयातच लोकांना ब्लड प्रेशरचा आजार जडतो. ब्लड प्रेशरने हृदय विकाराचा झटका, स्ट्रोक, किडनी इत्यादी संबंधीचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधी घ्याव्या लागतात.


 

blood-pressure-inmarathi
healthimpress.com

पण ह्या ब्लड प्रेशरच्या औषधींमुळे ब्लड प्रेशर जरी नियंत्रित होत असले तरी त्यामुळे तुमची कामेच्छा प्रभावित होते. ज्याचा प्रभाव तुमच्या सेक्स लाईफवर होतो.

अॅण्टी डिप्रेशनच्या औषधी :

डिप्रेशन म्हणजेच तणाव..

 

DEPRESSION-marathipizza
huffingtonpost.in

आजच्या जीवनशैलीतील ही सर्वात मोठी समस्या आहे. आज जगातील अनेक लोक तणावाखाली वावरत आहेत. त्यामुळे ह्यातून सुटण्यासाठी अनेकजण हे औषधांचा आधार घेतात. त्यासाठी अॅण्टी डिप्रेशनच्या औषधांचे सेवन करू लागतात.

 

depression-inmarathi
collective-evolution.com

ह्या औषधी व्यक्तीला तणावमुक्त करण्यात जरी मदत करत असल्या तरी खूप काळ ह्या औषधांचे सेवन केल्याने तुमची सेक्स क्षमता कमी होऊ लागते.

पेनकिलर्स :

जरा डोकं दुखलं, हात पाय दुखत असले तरी अनेकजण लगेच पेनकिलर्स घेतात.

 

homeopathyworld.in
homeopathyworld.in

ह्या औषधीने दुखण्यापासून आपल्याला नक्कीच सुटका मिळते. पण त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या कामेच्छेवर होतो.

ह्या औषधींचा आपल्या शरीरातील भावनांवर प्रभाव होतो. ज्यामुळे लैंगिक क्षमता प्रभावित होते.

 

painkillers-inmarathi
vietgiaitri.com

पण जर तुम्हाला एखादा असा आजार असेल ज्यामध्ये तुम्हाला नेहेमीच पेनकिलर्स खाव्या लागत असतील तर त्या तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्या.

निद्रानाशच्या औषधी :

 

incomplete-sleeping-inmarathi03.jpg
timothypope.co.uk

वयाच्या कुठल्याही स्तरावर तुम्हाला निद्रानाश ही समस्या उद्भवू शकते. तसेच वाढत्या वयासोबतच हा आजारही वाढत जातो. त्यामुळे अनेकदा लोक चांगली झोप लागावी म्हणून अनेक प्रकारच्या झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात.

 

sleepspan-inmarathi
youtube.com

पण ही औषध किती हानिकारक असतात आणि त्याचा किती वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो हे काही आपल्याला वेगळ्याने सांगायची गरज नाही, पण त्यासोबतच ह्याचा तेवढाच वाईट परिणाम तुमच्या लैंगिक क्षमतेवर देखील होतो.

त्यामुळे जर तुम्हाला तुमची सेक्स लाईफ नेहेमी चांगली ठेवायची असेल, तर अश्या प्रकारच्या औषधींचे सेवन जमेल तेवढं कमी करा.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.




One thought on “रोजच्या वापरातील ‘ही’ औषधं गंभीर लैंगिक समस्यांची कारणं ठरू शकतात…!

  • October 22, 2019 at 9:47 am
    Permalink

    How is cresting about “sex” intimacy, how many times creating sex of my partner in a week, how the duration of sex, what types of sex creating about me, precautions pre-creating sex & post creating sex and last what is a safe & secured sex.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?