मॅकडोनल्ड मधला c हा नेहेमी स्मॉल का असतो? जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मॅकडोनल्ड (McDonald’s) हे एक असे नाव आहे जे आज सर्वच लहानापासून ते मोठ्यांच्या आवडीचे खादाडायचे ठिकाण आहे. भूक लागली की मॅकडोनल्ड, ट्रीट घ्यायची असली की मॅकडोनल्ड, द्यायची असेलं तर मॅकडोनल्ड, कुठलं कारण नसेल तरी मॅकडोनल्ड… कारण मॅकडोनल्ड ला जायला कुठलही कारण लागत नसतं. आणि ह्याचं कारण म्हणजे मॅकडोनल्डचे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज…

 

McDonald-inmarathi02
desdelaplaza.com

मॅकडोनल्डने १९९६ साली भारतात आपला व्यवसाय करण्यास सुरवात केली. त्याची पहिली फ्रेन्चायझी ही दिल्ली येथे उघडण्यात आली. पण बघता बघता त्यांचा व्यवसाय हा संपूर्ण भारतभर पसरला. आज २० वर्षांनंतर मॅकडोनल्डचे भारतात अनेक आउटलेट आहेत.

 

McDonald-inmarathi01
rumble.com

आजवर तुम्ही अनेकदा ह्या मॅकडोनल्डला गेले असाल, तेव्हा कधी तुम्ही ह्याच्या नावावर म्हणजे ते ज्या प्रकारे लिहिलेलं असते त्यावर लक्ष दिले आहे काय ? जर तुम्ही बघितलं असेल तर M आणि D च्या मध्ये असणारा c हा नेहेमी स्मॉल असतो. पण तो स्मॉल का असतो ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

 

McDonald-inmarathi
topyaps.com

बरं, हेच नाही तर प्रसिद्ध दारू ब्रान्ड McDowell आणि प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू McGrath ह्यांच्या नावात देखील असचं काहीतरी दिसून येतं म्हणजे त्यांच्या नावातील c हा देखील स्मॉलअसतो. पण असं का? आणि त्यात स्पेस का नसते?

तर ह्यामागे एक वेगळं कारण आहे. c हा स्मॉल लिहिण्यामागे आणि स्पेस न देण्यामागील कारण म्हणजे शब्दावलीत मॅक (MAC) ह्याचा अर्थ म्हणजे “son Of”  म्हणजेच “त्याचा मुलगा” असा आहे. मॅकडोनल्ड मधील Mc हा मॅक (MAC) चा शोर्टफॉर्म आहे. म्हणजेच McDonald’s चा अर्थ म्हणजे डोनल्ड चा मुलगा. कारण डोनल्ड हे एक नाव आहे म्हणून ह्याचं पहिलं अक्षरं कॅपिटल लिहिलेलं असतं. पण मॅक हे काही नाव नाही.

 

McDonald-inmarathi03
rvcj.com

McDonald’s सोबतच McDowell’s मध्ये देखील डॉवेल्स हे एक नाव आहे. पण नेहेमी त्यानंतर लागणारं नावं हे पित्याचचं असावं गरजेचं नाही. तर अनेकदा हा त्यांचा व्यवसाय देखील असू शकतो. जसे की जॉन मॅकमास्टर, इथे मास्टर हे नाव नसून व्यवसाय आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जॉन हा मास्टरचा मुलगा, म्हणजेच जॉनचे वडील हे मास्टर असू शकतात.

तर हे आहे मॅकमधील त्या छोट्या c चं कारण, आपण एवढ्यांदा मॅकडोनल्ड ला गेले असाल पण नक्कीच तुम्ही त्या छोट्या c मागील करणापासून अज्ञात असाल…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?